रूढी परंपरा सामाजिक प्रथा इतिहास

आपल्या जावांसाठी (जाऊ) सती जाणारी स्त्री कोण?

2 उत्तरे
2 answers

आपल्या जावांसाठी (जाऊ) सती जाणारी स्त्री कोण?

4
मुळात सतीची व्याख्याच चुकीची केली गेली आहे..

सती हा शब्द संस्कृतवाणीतून आला असल्याने पवित्र स्त्री असा अर्थ होय. सहगमन करण्यासाठी हा शब्द नाही आहे. पण आजही सतीला सहगमन हा सामायिक शब्द दिला गेला आहे, याची खंतच! सहगमन म्हणजे स्त्री वर लादलेला एक अघोरी घृणास्पद नियमच. अर्थात पतीच्या अंत्यसंस्कारवेळी पत्नीस जिवंत जाळले जाते.

पद्मावत चित्रपट अनेकांनी पाहिलं असेलच!!
त्यात चित्तोडची राणी पद्मावती यांनी जौहर केले. चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांनी सती गेली या सोप्या शब्दात प्रतिक्रिया दिल्या. पण मुळात त्या सती गेल्याच नाहीत. त्यांनी जौहर केले म्हणजे सती जाणे नव्हे, तर आपल्या शृंगाररुपात पतीच्या मृत्यूनंतर स्वमनाने  स्वतःचं रक्षण करण्यासाठी तसेच सन्मानप्रती अग्नीत स्वतःला समर्पित करणे होय.



ऐतिहासिक पुस्तकात आपणास प्रचिती येईल की, जेव्हा शत्रू देशातील राजांचे पराभव करून कपटाने, युद्धाने राज्य मिळवीत तेव्हा तेथील राणींना गुलाम बनवीत. आणि त्यांचे शोषण केले जाई. तेव्हा आपली स्वरक्षा आणि सन्मानप्रती स्त्रिया शत्रूच्या तावडीत न येण्यासाठी आपल्या शृंगारसहित आगीत उडी टाकायच्या. पतीच्या मृत्यूनंतर शत्रूचे गुलाम राहणं आणि प्रत्येक दिवस आपलं शोषण होईल असं रोजच्या मरणपेक्षा अग्नीत जीव देणं राजपूतातील राणींना उचित वाटले. यास जौहर म्हटलं जायचे. सती जाणे म्हणत नाहीत.


​पण अश्याच अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक गोष्टींचा फायदा घेत काही प्रकांडपंडित यांनी सतीची भाषाच बदलवून टाकली. पतीच्या अंतिमसंस्कारात पत्नीने पती सोबत जावं(यांच्या शब्दात सती जाणं) ही जणू एक प्रथाच निर्मित केली. सती प्रथा काहींनी चुकीच्या पद्धतीसाठी वापर केला गेला. जसे, मृतव्यक्तीनंतर मृताच्या पत्नीस मृताची संपत्ती न मिळावी म्हणून सती प्रथेच्या नावाखाली पत्नीस जिवंत जाळलं जायचे.

लोकसत्तेतून वाचताना काही बाबी..
मुघल काळात म्हणजे सन १३३३-३४ मध्ये भारतभेटीला आलेला जगप्रवासी आणि लेखक इब्न बतुताने आयुष्यात प्रथमच सतीचा भयंकर प्रकार बघितला आणि तो तिथेच बेशुद्ध पडला. त्यानंतर मात्र बतुताने अशा प्रसंगी जाणं जाणीवपूर्वक टाळलं.

चित्र(विकिपीडियावरील)

सोर्स:-
https://images.app.goo.gl/o4cFdG4my24fm6yk9

फॅनी पर्कस ही ब्रिटिश गृहिणी ७ नोव्हेंबर १८२३ रोजी उत्तर प्रदेश येथे घडलेल्या घटनेचा उल्लेख करते. एका श्रीमंत बनियाची तरुण पत्नी कुटुंबीयांच्या दबावाखाली सती जाण्यास तयार झाली. पण चिता पेटताच वेदना असह्य़ होऊन तिने चितेबाहेर उडी मारली अन् तीरासारखी गंगेच्या दिशेने धावत सुटली. घटाघटा पाणी पिऊन तिने गंगेच्या थंडगार पाण्यात लोळण घेतली. एवढय़ात तिला पकडण्यासाठी नातलग मंडळी धावली. पण तिथे हजर असलेल्या एका ब्रिटिश मॅजिस्ट्रेटने त्यांना अटकाव केला व त्या स्त्रीला पालखीत घालून इस्पितळात नेलं. एका ब्रिटिश अधिकाऱ्यामुळे त्या अभागिनीचे प्राण वाचले. अधिक माहिती पुढील लिंक वर वाचू शकता.
https://www.loksatta.com/chaturang-news/marathi-blog-sati-281982/lite/

जावेसाठी कुठली स्त्री सती गेली असे कुठेही लिहिले नाही..





उत्तर लिहिले · 15/10/2020
कर्म · 458560
0

आपल्या जावांसाठी (जाऊ) सती जाणारी स्त्री कान्होपात्रा होती.

कान्होपात्रा ही 15 व्या शतकातील एक मराठी कवयित्री आणि संत होती. ती विठ्ठलाची भक्त होती.

कान्होपात्रा ही एका गणिकेची मुलगी होती आणि तिला तिच्या सौंदर्यामुळे लग्नाचे अनेक प्रस्ताव आले. मात्र, तिने लग्न करण्यास नकार दिला आणि आपले जीवन विठ्ठलाला समर्पित केले.

अखेरीस, कान्होपात्रा विठ्ठलाच्या मूर्तीमध्ये विलीन झाली.

अधिक माहितीसाठी, आपण खालील दुवे पाहू शकता:

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 980

Related Questions

अरबी कल्याणम ही केरळमधील प्रथा काय आहे?
सण सोहळे, उपास, व्रत वैकल्ये तसेच आदर सत्कार, पूजाअर्चा यांनी परंपरेचा साज चढवला आहे, त्यात भर म्हणून वाढदिवस, मुंज, बारसे हे उत्सव साजरे करत रितीरिवाज तयार झाले, यात्रा, जत्रा, रौप्य, अमृत, हिरक महोत्सव साजरे होतात. हे चित्र प्रेमाभक्तीने निर्मळ, निरंकुश, निरागस असावे असा मनुष्य स्वभाव धर्म आवश्यक वाटतो काय?
त्याच्या कुटुंबातील आणखी किती जणींना सती जावे लागले होते?
भारतीय मुली व स्त्रिया कपाळावर टिकली किंवा कुंकू का लावतात?
तरुणी टिकली का लावतात? तरुणींनी टिकली का लावावी?
तळी उचलण्याची प्रथा काय आहे, यामागील कारण काय आहे?
महिलांचे व पुरुषांचे शर्टाचे बटन कोणत्या बाजूला असतात?