सौंदर्य संस्कृती सामाजिक प्रथा

तरुणी टिकली का लावतात? तरुणींनी टिकली का लावावी?

2 उत्तरे
2 answers

तरुणी टिकली का लावतात? तरुणींनी टिकली का लावावी?

2
*_का लावावी तरुणींनी टिकली ?_*

सोळा प्रमुख श्रृंगारांपैकी टिकली एक आहे. भारतीय महिला वेशभूषा केल्यावर टिकली आवर्जून लावतात. यामुळे सौंदर्यात भर पडते. हिंदू धर्मात यास सौभाग्याचे प्रतिकदेखील मानले जाते. टिकली सौंदर्यात भर घालत असली तरी तिचे आरोग्याच्या दृष्टीनेही अनेक फायदे आहेत. टिकली लावल्यानंतर कोणते फायदे होतात ते जाणून घेवूयात.

👩🏻‍🦰 *_चेहऱ्याला लकव्यापासून वाचवते_*
टिकली लावल्याने चेहऱ्याचा लकवा येण्याची शक्यता कमी होते. कारण टिकली लावल्याने दोन्ही भुवयांच्यामध्ये ताण येतो. आयुर्वेदीक पंचकर्ममध्येसुध्दा याचा उल्लेख आहे.

👩🏻‍🦰 *_ऐकण्याची शक्ती वाढते_*
चेहऱ्याच्या नसांमध्ये एक नस कानाच्या नसांना जोडते. त्यामुळे टिकली लावल्यास ऐकण्याची शक्ती वाढते. चक्रावर दबाव राहिल्याने ऐकण्याची शक्ती वाढते.

👩🏻‍🦰 *_डोक्याला थंड ठेवते_*
टिकलीच्या चक्रावर हलक्या दबावाने मानसिक शांती मिळते. तसेच भिती वाटण्याची समस्या दूर होते.

👩🏻‍🦰 *_शांत झोप_*
टिकली लावण्याने मानसिक शांतीसह शांत झोपसुध्दा लागते.

👩🏻‍🦰 *_एकाग्रता वाढते_*
टिकली आज्ञा चक्रावर म्हणजेच दोन्ही भुवईच्या मध्ये लावली जाते. हे चक्र मनाला नियंत्रित करते. ध्यानस्त बसल्यावर याकडेच लक्ष केंद्रीत होते. मनाला एकाग्र करण्यासाठी यावर लक्ष दिले जाते. म्हणून टिकली लावल्याने एकाग्रता वाढते.

👩🏻‍🦰 *_डोकेदुखी थांबते_*
अॅक्युप्रेशरच्या सिध्दांतानुसार, डोकेदुखीची समस्या असेल तर या चक्रावर मालिश केल्यास किंवा त्याची नस जोरात दाबल्यास रक्त वाहिन्यांचा तणाव कमी होतो आणि डोकेदुखीच्या त्रासापासून आराम मिळतो.

👩🏻‍🦰 *_डोळ्यांसाठी फायदेशीर_*
टिकली ज्या ठिकाणी लावली जाते ते आज्ञाचक्र डोळ्यांच्या मांसपेशी आणि त्वचेशी जोडलेले असते. हे चक्र डोळ्यांची नजर वाढवते.

👩🏻‍🦰 *_सायनसपासून मिळतो आराम_*
आज्ञा चक्रावर दबाव टाकल्यास नाकाच्या नसचा संबंध येतो. यामुळे सायनसच्या रुग्णांसाठी टिकली लावणे फायदेशीर ठरते.

👩🏻‍🦰 *_सुरकुत्या नष्ट होतात_*
टिकली लावणे त्वचेसाठीसुध्दा फायदेशीर आहे. आज्ञाचक्रावर दबाव टाकल्यास रक्त प्रवाहाची गती वाढते आणि त्वचा दिर्घकाळ टवटवीत राहते. सुरकुत्या पडत नाहीत.
उत्तर लिहिले · 6/8/2019
कर्म · 569225
0

तरुणी टिकली लावण्याची अनेक कारणे आहेत, त्यापैकी काही येथे दिले आहेत:

  • सौंदर्य: टिकली हे भारतीय संस्कृतीत सौंदर्याचे प्रतीक मानले जाते.
  • परंपरा: अनेक घराण्यांमध्ये टिकली लावण्याची परंपरा आहे.
  • धार्मिक कारण: टिकली हे तिसऱ्या डोळ्याचे प्रतीक आहे आणि ते ज्ञान आणि बुद्धी दर्शवते.
  • सामाजिक ओळख: टिकलीमुळे महिलेला सामाजिक ओळख मिळते.
  • आरोग्य: असे मानले जाते की टिकली लावल्याने चेहऱ्यावरील स्नायू सक्रिय होतात आणि रक्ताभिसरण सुधारते.

शेवटी, टिकली लावावी की नाही हे पूर्णपणे वैयक्तिक आवडीवर अवलंबून असते.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 980

Related Questions

अरबी कल्याणम ही केरळमधील प्रथा काय आहे?
सण सोहळे, उपास, व्रत वैकल्ये तसेच आदर सत्कार, पूजाअर्चा यांनी परंपरेचा साज चढवला आहे, त्यात भर म्हणून वाढदिवस, मुंज, बारसे हे उत्सव साजरे करत रितीरिवाज तयार झाले, यात्रा, जत्रा, रौप्य, अमृत, हिरक महोत्सव साजरे होतात. हे चित्र प्रेमाभक्तीने निर्मळ, निरंकुश, निरागस असावे असा मनुष्य स्वभाव धर्म आवश्यक वाटतो काय?
त्याच्या कुटुंबातील आणखी किती जणींना सती जावे लागले होते?
भारतीय मुली व स्त्रिया कपाळावर टिकली किंवा कुंकू का लावतात?
आपल्या जावांसाठी (जाऊ) सती जाणारी स्त्री कोण?
तळी उचलण्याची प्रथा काय आहे, यामागील कारण काय आहे?
महिलांचे व पुरुषांचे शर्टाचे बटन कोणत्या बाजूला असतात?