संस्कृती रूढी परंपरा पूजा सामाजिक प्रथा

तळी उचलण्याची प्रथा काय आहे, यामागील कारण काय आहे?

2 उत्तरे
2 answers

तळी उचलण्याची प्रथा काय आहे, यामागील कारण काय आहे?

3
खंडोबाच दर्शन झाल्यावर तळीभरण हा नैमित्तिक स्वरूपाचा कुळाचार आहे. यात पाच पुरुषांद्वारे बेल, भंडारा ,सुपारीने देवतेला ओवाळले जाते. 
तांब्याचे ताम्हनात खंडोबाचा टाक अथवा कलश ठेऊन त्या ताम्हनात भंडार घेऊन दिवटी पेटवली जाते अनेक जण मिळून ते ताम्हन दिवटी बरोबर घेऊन उचलतात व येळकोट चा गजर करतात. व ती आधारावर ठेऊन देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळतात व प्रसाद वाटतात. पुन्हा येळकोट चा गजर करत तळी उचली जाते व मस्तकाला लावून दिवटी हातात घेऊन ताम्हन खाली ठेवले जाते. या विधीस तळी भंडार असे म्हणतात हा तळीचा विधी रविवारी, अमावस्या, पोर्णिमा, व खंडोबाचे देवकार्य प्रसंगी करण्याचा प्रघात आहे.

तळी भंडार गीत

हरहर महादेव…..चिंतामणी मोरया…….आनंदीचा उदे उदे

भैरोबाचा चांगभले बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट…….
येळकोट येळकोट जय मल्हार
खंडेराव महाराज की जय
अगडधूम नगारा सोन्याची जेजुरी देव आले जेजुरा….
नीळा घोड़ा….पायात तोडा.. कमरी करगोटा….
बेंबी हिरा… मस्तकी तुरा….अंगावर शाल सदा ही लाल
आरती करी म्हाळसा सुंदरी….देव ओवाळी नाना परी
खोब्रयाचा तुकडा….. भंडाराचा भड़का…….
सदानंदाचा येळकोट…….येळकोट येळकोट जय मल्हार
खंडेराव महाराज की जय
अड्कल के भड्कल……. भड्कल के भंडार…….बोल बोल हजारी….
वाघ्या मुरूळी…….खंडोबा भगत सलाम सलाम………
सदानंदाचा येळकोट…….येळकोट येळकोट जय मल्हार
खंडेराव महाराज की जय…….

तळी भंडाराचा विधी करताना म्हणले जाणारे गीत यात स्थान परत्वे अनेक पाठभेद आढळतात
उत्तर लिहिले · 15/12/2018
कर्म · 99520
0
तळी उचलण्याची प्रथा:

तळी उचलणे ही महाराष्ट्रातील लग्नसमारंभातील एक प्रथा आहे. या प्रथेमध्ये वधू आणि वर एकमेकांच्या डोक्यावर अक्षता टाकतात आणि एकमेकांना घास भरवतात. त्यानंतर वधू आणि वर एकमेकांच्या हातांनी एकमेकांचे तळवे उचलतात.

यामागची कारणे:
  • तळी उचलणे म्हणजे एकमेकांना साथ देण्याचे वचन देणे.
  • तसेच एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचे वचन देणे.
  • या प्रथेमुळे वधू आणि वरांमधील प्रेम आणि आपुलकी वाढते.

तळी उचलण्याची प्रथा ही वैवाहिक जीवनातील एक महत्त्वपूर्ण भाग आहे. या प्रथेमुळे वधू आणि वरांना एकमेकांबद्दल आदर आणि प्रेम व्यक्त करण्याची संधी मिळते.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 3000

Related Questions

मृत्यूनंतर काही मराठा समाज सात दिवसांचे विधी का करतात? सातटाव म्हणजे काय आणि दसपिंड का करत नाहीत?
अरबी कल्याणम ही केरळमधील प्रथा काय आहे?
सण सोहळे, उपास, व्रत वैकल्ये तसेच आदर सत्कार, पूजाअर्चा यांनी परंपरेचा साज चढवला आहे, त्यात भर म्हणून वाढदिवस, मुंज, बारसे हे उत्सव साजरे करत रितीरिवाज तयार झाले, यात्रा, जत्रा, रौप्य, अमृत, हिरक महोत्सव साजरे होतात. हे चित्र प्रेमाभक्तीने निर्मळ, निरंकुश, निरागस असावे असा मनुष्य स्वभाव धर्म आवश्यक वाटतो काय?
त्याच्या कुटुंबातील आणखी किती जणींना सती जावे लागले होते?
भारतीय मुली व स्त्रिया कपाळावर टिकली किंवा कुंकू का लावतात?
आपल्या जावांसाठी (जाऊ) सती जाणारी स्त्री कोण?
तरुणी टिकली का लावतात? तरुणींनी टिकली का लावावी?