Topic icon

सामाजिक प्रथा

0

अरबी कल्याणम ही केरळमधील एक प्रथा आहे. या प्रथेनुसार, आखाती देशांतील (अरब राष्ट्रांतील) पुरुष केरळमध्ये येतात आणि गरीब घरातील तरुण मुलींशी लग्न करतात. बहुतेक वेळा हे विवाह अल्प कालावधीसाठी असतात आणि या विवाहांचा उद्देश केवळ शारीरिक संबंध प्रस्थापित करणे किंवा काही आर्थिक लाभ मिळवणे असतो.

या प्रथेमुळे अनेक समस्या निर्माण होतात, जसे की:

  • मुलींचे शोषण: अल्पवयीन मुलींना फसवून त्यांच्याशी विवाह केला जातो, ज्यामुळे त्यांचे शोषण होते.
  • सामाजिक समस्या: अशा विवाहातून जन्मलेल्या मुलांचे भविष्य असुरक्षित असते, कारण त्यांचे वडील बहुतेक वेळा त्यांना सोडून निघून जातात.
  • मानবাধিকার उल्लंघन: या प्रथेमुळे मानवी हक्कांचे उल्लंघन होते, कारण महिलांना वस्तू म्हणून वापरले जाते.

या प्रथेवर अंकुश लावण्यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि संस्था प्रयत्न करत आहेत. तसेच, शासनाने या विरोधात कठोर कायदे करण्याची आवश्यकता आहे.

अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 6/4/2025
कर्म · 980
0
तुम्हां आम्हां सर्वांना मनुष्य जन्म मिळाला हे पूर्व संचिताचे फळ आहे. ते सफल करण्यासाठी मला प्रभु परमात्म्याने भूतलावर पाठविले आहे. सर्व जन्माच्या पाठी मनुष्य जन्म पावे पोटी याउपरी किरीटी निर्मिली नाही.
म्हणजे विश्वासाने आपण म्हणू शकतो की, मी सर्व योनीतून फिरफिरुन या देही आलो . आता मात्र मला सर्वांचा स्वभाव माहित आहे.कसे चालावे वागावे बोलावे बसावे संवाद साधावा ही दृष्टी मनुष्याला लाभली . मनुष्य स्वभाव धर्म कसा आहे ? तो एकमेकांसाठी अनुरूप अशी कृती प्रिती शांती शिस्त आणि समाधान अंगी बाळगून विवेक वृत्तीने पुढे जात आहे की, षडविकारात अडकला आहे ... याची मीमांसा करत करत तो हा दिवस वर्तमान समोर आहे.
तो समन्वय ऋणानुबंध जोडत समतोल साधत एकमेकां साह्य करू असा विश्वास व्यक्त करतोय किंवा नाही.. मनुष्याची मनस्थिती कशी आहे व परिस्थिती काय बोलते आहे हे यांची देही याची डोळा मी पाहिला आहै हा जन्ममृत्युचा सोहळा ...
तर आपल्यापुढे विषय आहे... आपण कसे जगावे ? 
आपले मन मोकळे खुलं करून सहजतेने या वर्तमानी सर्वोत्तम प्रेम कामगिरी करत एकनिष्ठ राहण्याची किमया साधली पाहिजे.
आपण आपल्या सक्षमतेने या वर्तमानी एकमेकांना समजून उमजून सतत कार्यरत रहावे .कोणाही जीवाचा ना घडो मत्सर ...
शेवटी जे उपजे ते नाशे परी पुनरपि दिसे ... हे चक्र चालू राहते. हे खरं असेल तर आजचं वास्तव कसे आहे व ते प्रेमानं जगणं सुंदर करण्यासाठी मला याचि जन्मी साधी नारायण नाहीतर हीन पशुहून  ...
मला वाटतं सर्व काही सुरळीत चालू ठेवण्यासाठी आपले कौशल्य समाजसेवेतील चातुर्य संघटन वाढीसाठी जगाला प्रेम अर्पावे हा संदेश मिळाला आहे.. यासाठी अवघाचि संसार सुखाचा करीन...
मला भ्रमित करण्यात जे माझे विकार आहेत ते मलाच पूर्ण निर्मूलन करावयाचे आहेत.
मनुष्य हा समाज प्रिय आहे व तो समूहाने गुण्यागोविंदाने एकत्र राहतोय. हे सत्कृत्य आचरण नीतीत उतरणारा जीवभाव सर्वांठायीं असावा याकरिता तो समन्वय समन्यायी पद्धतीने पूर्ण समर्पित आहे.
तो समन्वय ऋणानुबंध जोडत प्रेम प्रेरणा नम्रता सहनशीलता करूणा दया क्षमा शांती शिस्त समाधान अंगी सद्गुणांची दिव्य रास निर्माण करीत जन हेचि जनार्दन एका जनार्दनी भजन करत उघडा डोळे बघा नीट.. हे सत्य अबाधित राखत आहे.
हे सत्कृत्य आचरणातून सिद्ध करण्यासाठी तो रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी असा समभाव एकरूपता ही साधत बहोत सुकृताची जोडी तेणें विठ्ठली आवडी.. म्हणत वारी वारी जन्ममरणांते वारी,हारी पडलो आता संकट निवारी ...याची जाणीव ही आहे .
या जाणीवेतून पुढे जात एकत्व सत्य प्रेम यांचे चिरंतन ध्यान करत आहे. ही एक नजर एक तत्व दृढ धरी मना हरिसी करुणा येईल तुझी... याची प्रचिती घेतोय. जीवनात सुंदर आविष्कार प्रकटन करतोय . आणि म्हणूनच तो सण उत्सव उपास तापास वर्तवैकल्य करीत पूजा अर्चना अत्यंत विनम्रपणे करीत आहे. हे जनमाणसं अंतर्बाह्य दुध जैसी सफेदी घेत आत बाहेर एकच ,जे आहे ते वास्तव प्रेमानं करीत दोषांचे निवारण करीत पुढे पुढे जात आहे . अखेर हे सर्व सर्वांचे भलं व्हावं यासाठी समर्पित आहे. हीच खरी ओळख खरी मैत्री खरी भक्ती खरी शक्ती आहे हे तो जाणतो व एकवटतो आणि समाजहित समाजकल्याण ही नम्रतेची पूजा पवित्र अंतःकरणाने करत आहे.
आपण आपल्या वाणीतून देहबोलीतून कर्मातून मानविय सद्गुणांनी युक्त अशी जीवनशैली तयार करत आहोत.
आपली सत्संग देशाटन कशी चालू आहे किंवा नाही याबाबत आपली ओळख समाजपटलावर आवश्य रहावी म्हणून सणवार लग्नकार्य उत्सव वाढदिवस जयंत्या पुण्यतिथी साजरी करतोय.तसेच समाजाभिमुख कामातून सेवाभावी ओळख म्हणून रौप्य अमृत हिरक महोत्सवात ही सहभागी होत राहतो .
हे सर्व आनंदी वृत्तीने व्हावे . सुख दुःखात ही जे करणे आवश्यक आहे तसे आचरण रहावे .
आणि म्हणूनच जनजागृतीसाठी परोपकारी विवेकी पालकत्व हवे. संवेदनशीलता ठेवून माणुसकी धर्म वाढवत जाणे उचित आहे.
संस्कृती सुसंगत ठेवून संयमी संवेदनशील समाजमन बांधिलकी जोडत आपण वागत रहावे . आपल्या परंपरा रितीरिवाज कायमदायम समर्थपणे चालवल्या तरच चांगल्याला चांगलं म्हणण्याची प्रथा सुरू राहील.  
माणसाला माणूस प्रिय असावा. यासाठी समर्पित भावनेने सेवा व्हावी आणि जगाला प्रेम अर्पावे. 
प्रेमभाव निर्मल निरंकुश निरागस निर्मोही निर्व्याज निर्लेप रहावा .. हेच जीवन सत्य आहे कारण देवानेच सर्वकाही आपणाला बहाल केले आहे.
आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे... मग काय खावे प्यावे..सगळं जाणतेणं करावं ... व्रतवैकल्ये उपवास कशाचा करायला हवा हे सत्कृत्य आचरण नीतीत उतरणारा रस्ता आहे तो चोखंदळ राखावा .. तुच तुझ्या जीवनाचा शिल्पकार...आणि हे देवकण सुशोभित करणारे कर्म बोलते करावं लागेल... कारण देवाचेच देणं जे शुभ आहे ते प्रेमानं जगणं सुंदर करीत आहे असा विश्वास दृढ धरावा व स्थिरमन शुभ शकुन आहे हेच आपले जीवनमान उंचावते, धन्यवाद जी.
 
उत्तर लिहिले · 16/7/2024
कर्म · 475
0

माहिती नाही.

मला माफ करा, या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 980
1
पूर्वजांकडून आलेल्या अशा अनेक प्रथा आहे ज्याचे आज देखील पालन केले जाते त्यामधीलच एक म्हणजे कपाळावर लावले जाणारे कुंकू  आणि टिकली. कुंकू लावल्याने ताण दूर होतो : कुंकात मर्क्युरी म्हणजे पारा असतो. कुंकवामध्ये पाण्यासारखा धातू भरपूर प्रमाणात असल्यामुळे कुंकू लावल्याने ताण कमी होतो आणि डोकं शांत राहते.

हिंदू स्त्रिया कपाळावर कुंकू किंवा टिकली का लावतात ?

भांगामध्ये कुंकू
हिंदू स्त्रिया कपाळावर कुंकू भांगामध्ये कुंकू का लावतात हिंदू स्त्रिया किवा बायका लग्नानंतर आपल्या कपाळावर लाल टिळा का लावतात,लग्न झालेली बाई आपल्या भांग मध्ये कुंकू का भरते असे खूप प्रश्न आज कालचा युवा पिढीला पडले आहेत.

कपाळावर कुंकू का लावतात ?
भांगामध्ये कुंकू
कपाळावर कुंकू
तर मित्रांनो आज मी तुम्हाला सांगू इच्छितो कि महिला आपल्या भांगा मध्ये कुंकू लावणे हे सुहासिन स्त्रीयानां सूचक आहे.

हिंदू धर्मा मध्ये केवळ विवाहीत स्त्रियाच केवळ कुंकू लावतात. कुमारिका किव्हा विधवा स्त्रियांना कुंकू लावणे वर्जित आहे.

कुंकू लावल्याने महिलांचा सौंदर्या मध्ये अजून भर पडते अर्थातच महिलांचे सौंदर्य कुंकू लावल्याने खुलून उठते.

विवाहाचा वेळेस वर वधूच्या म्हणजे नवरा मुलगा नवरी मुलीच्या मस्तकावर मंत्रोच्चारात पाच वेळा किवा सात वेळा कुंकू भरतो.त्यावेळेलाच विवाहकार्य संपन्न होते त्यादिवसापासून ती स्त्री आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी दरदिवशी नियमित कुंकू लावते.

मस्तकावर चमकणारा दागिना म्हणून स्त्रियांचा कुंकू ला सौंदर्या चा प्रमुख अंग म्हणून ओळख आहे.

कपाळावर कुंकू लावण्याचे वैज्ञानिक कारण:
भांगामध्ये कुंकू लावणे हे केवळ रूढी परंपरा आहे कि त्या मागे काही वैज्ञानिक कारण आहे जानुया, ब्रम्हरंध आणि अध्मि नावाचे मर्मस्थान बरोबर वरच स्त्रियां कुंकू लावतात. त्यालाच सामान्य भाषे मध्ये भांग असे बोलतात. पुरुषांपेक्षा स्त्रियांचा भांग ची जागा खूप कोमल असते.

कुंकू मध्ये पाण्यासारखा धातू अधिक प्रमाणात असल्याने कुंकू लावल्याने महिलांच्या शरीरात विद्युत उर्जा नियंत्रित करतो.

कपाळावर कुंकू लावण्याचे फायदे:
कुंकू लावतांना आपल्या भांगाच्या आज्ञाचक्र वर दाब दिला जातो त्यामुळे तेथील बिंदू दाबले जाऊन चेहर्‍याच्या स्नायूंना चांगला रक्तपुरवठा होतो.

हिंदू स्त्रियांसाठी सोळा श्रुंगार असून त्यामध्ये कुंकुवाचे स्थान खूप महत्वाचे आहे. लग्नाचा आधी मुली कुंकू लावतात किव्हा टिकली सौंदर्य वाढवण्यासाठी वापरतात परंतु लग्नानंतर कुंकू लावणे म्हणजे सौभाग्याची निशाणी असते.

योग विज्ञानाच्या दृष्टीने कुंकवाचा संबंध थेट आपल्या मनाशी जोडला गेलेला आहे. मुली कपाळावर ज्या ठिकाणी कुंकू लावतात त्याठिकाणी आज्ञा चक्र असते. हे चक्र महिलांच्या मनाला नियंत्रित करत असते.

जेव्हा आपल्या आज्ञा चक्रावर दबाव पडतो तेव्हा मन एकाग्र केले जाते .आज्ञा चक्रावर स्त्रिया कुंकू लावतात त्यामुळे त्यांचे मन एकाग्र राहण्यास मदत होते.

त्यामुळे महिलांनी आपल्या कपाळावर किव्हा भांग मध्ये कुंकू लावायलाच हवा केवळ एक परंपरा म्हणून नाही तर त्याने आपल्याला आपले मन एकाग्र करण्यास पण फायदा होईल आणि कुंकू लावणे केवळ आपल्या भलाई साठीच लाभदायक आहे.


उत्तर लिहिले · 6/5/2022
कर्म · 53720
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
4
मुळात सतीची व्याख्याच चुकीची केली गेली आहे..

सती हा शब्द संस्कृतवाणीतून आला असल्याने पवित्र स्त्री असा अर्थ होय. सहगमन करण्यासाठी हा शब्द नाही आहे. पण आजही सतीला सहगमन हा सामायिक शब्द दिला गेला आहे, याची खंतच! सहगमन म्हणजे स्त्री वर लादलेला एक अघोरी घृणास्पद नियमच. अर्थात पतीच्या अंत्यसंस्कारवेळी पत्नीस जिवंत जाळले जाते.

पद्मावत चित्रपट अनेकांनी पाहिलं असेलच!!
त्यात चित्तोडची राणी पद्मावती यांनी जौहर केले. चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांनी सती गेली या सोप्या शब्दात प्रतिक्रिया दिल्या. पण मुळात त्या सती गेल्याच नाहीत. त्यांनी जौहर केले म्हणजे सती जाणे नव्हे, तर आपल्या शृंगाररुपात पतीच्या मृत्यूनंतर स्वमनाने  स्वतःचं रक्षण करण्यासाठी तसेच सन्मानप्रती अग्नीत स्वतःला समर्पित करणे होय.



ऐतिहासिक पुस्तकात आपणास प्रचिती येईल की, जेव्हा शत्रू देशातील राजांचे पराभव करून कपटाने, युद्धाने राज्य मिळवीत तेव्हा तेथील राणींना गुलाम बनवीत. आणि त्यांचे शोषण केले जाई. तेव्हा आपली स्वरक्षा आणि सन्मानप्रती स्त्रिया शत्रूच्या तावडीत न येण्यासाठी आपल्या शृंगारसहित आगीत उडी टाकायच्या. पतीच्या मृत्यूनंतर शत्रूचे गुलाम राहणं आणि प्रत्येक दिवस आपलं शोषण होईल असं रोजच्या मरणपेक्षा अग्नीत जीव देणं राजपूतातील राणींना उचित वाटले. यास जौहर म्हटलं जायचे. सती जाणे म्हणत नाहीत.


​पण अश्याच अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक गोष्टींचा फायदा घेत काही प्रकांडपंडित यांनी सतीची भाषाच बदलवून टाकली. पतीच्या अंतिमसंस्कारात पत्नीने पती सोबत जावं(यांच्या शब्दात सती जाणं) ही जणू एक प्रथाच निर्मित केली. सती प्रथा काहींनी चुकीच्या पद्धतीसाठी वापर केला गेला. जसे, मृतव्यक्तीनंतर मृताच्या पत्नीस मृताची संपत्ती न मिळावी म्हणून सती प्रथेच्या नावाखाली पत्नीस जिवंत जाळलं जायचे.

लोकसत्तेतून वाचताना काही बाबी..
मुघल काळात म्हणजे सन १३३३-३४ मध्ये भारतभेटीला आलेला जगप्रवासी आणि लेखक इब्न बतुताने आयुष्यात प्रथमच सतीचा भयंकर प्रकार बघितला आणि तो तिथेच बेशुद्ध पडला. त्यानंतर मात्र बतुताने अशा प्रसंगी जाणं जाणीवपूर्वक टाळलं.

चित्र(विकिपीडियावरील)

सोर्स:-
https://images.app.goo.gl/o4cFdG4my24fm6yk9

फॅनी पर्कस ही ब्रिटिश गृहिणी ७ नोव्हेंबर १८२३ रोजी उत्तर प्रदेश येथे घडलेल्या घटनेचा उल्लेख करते. एका श्रीमंत बनियाची तरुण पत्नी कुटुंबीयांच्या दबावाखाली सती जाण्यास तयार झाली. पण चिता पेटताच वेदना असह्य़ होऊन तिने चितेबाहेर उडी मारली अन् तीरासारखी गंगेच्या दिशेने धावत सुटली. घटाघटा पाणी पिऊन तिने गंगेच्या थंडगार पाण्यात लोळण घेतली. एवढय़ात तिला पकडण्यासाठी नातलग मंडळी धावली. पण तिथे हजर असलेल्या एका ब्रिटिश मॅजिस्ट्रेटने त्यांना अटकाव केला व त्या स्त्रीला पालखीत घालून इस्पितळात नेलं. एका ब्रिटिश अधिकाऱ्यामुळे त्या अभागिनीचे प्राण वाचले. अधिक माहिती पुढील लिंक वर वाचू शकता.
https://www.loksatta.com/chaturang-news/marathi-blog-sati-281982/lite/

जावेसाठी कुठली स्त्री सती गेली असे कुठेही लिहिले नाही..





उत्तर लिहिले · 15/10/2020
कर्म · 458560
2
*_का लावावी तरुणींनी टिकली ?_*

सोळा प्रमुख श्रृंगारांपैकी टिकली एक आहे. भारतीय महिला वेशभूषा केल्यावर टिकली आवर्जून लावतात. यामुळे सौंदर्यात भर पडते. हिंदू धर्मात यास सौभाग्याचे प्रतिकदेखील मानले जाते. टिकली सौंदर्यात भर घालत असली तरी तिचे आरोग्याच्या दृष्टीनेही अनेक फायदे आहेत. टिकली लावल्यानंतर कोणते फायदे होतात ते जाणून घेवूयात.

👩🏻‍🦰 *_चेहऱ्याला लकव्यापासून वाचवते_*
टिकली लावल्याने चेहऱ्याचा लकवा येण्याची शक्यता कमी होते. कारण टिकली लावल्याने दोन्ही भुवयांच्यामध्ये ताण येतो. आयुर्वेदीक पंचकर्ममध्येसुध्दा याचा उल्लेख आहे.

👩🏻‍🦰 *_ऐकण्याची शक्ती वाढते_*
चेहऱ्याच्या नसांमध्ये एक नस कानाच्या नसांना जोडते. त्यामुळे टिकली लावल्यास ऐकण्याची शक्ती वाढते. चक्रावर दबाव राहिल्याने ऐकण्याची शक्ती वाढते.

👩🏻‍🦰 *_डोक्याला थंड ठेवते_*
टिकलीच्या चक्रावर हलक्या दबावाने मानसिक शांती मिळते. तसेच भिती वाटण्याची समस्या दूर होते.

👩🏻‍🦰 *_शांत झोप_*
टिकली लावण्याने मानसिक शांतीसह शांत झोपसुध्दा लागते.

👩🏻‍🦰 *_एकाग्रता वाढते_*
टिकली आज्ञा चक्रावर म्हणजेच दोन्ही भुवईच्या मध्ये लावली जाते. हे चक्र मनाला नियंत्रित करते. ध्यानस्त बसल्यावर याकडेच लक्ष केंद्रीत होते. मनाला एकाग्र करण्यासाठी यावर लक्ष दिले जाते. म्हणून टिकली लावल्याने एकाग्रता वाढते.

👩🏻‍🦰 *_डोकेदुखी थांबते_*
अॅक्युप्रेशरच्या सिध्दांतानुसार, डोकेदुखीची समस्या असेल तर या चक्रावर मालिश केल्यास किंवा त्याची नस जोरात दाबल्यास रक्त वाहिन्यांचा तणाव कमी होतो आणि डोकेदुखीच्या त्रासापासून आराम मिळतो.

👩🏻‍🦰 *_डोळ्यांसाठी फायदेशीर_*
टिकली ज्या ठिकाणी लावली जाते ते आज्ञाचक्र डोळ्यांच्या मांसपेशी आणि त्वचेशी जोडलेले असते. हे चक्र डोळ्यांची नजर वाढवते.

👩🏻‍🦰 *_सायनसपासून मिळतो आराम_*
आज्ञा चक्रावर दबाव टाकल्यास नाकाच्या नसचा संबंध येतो. यामुळे सायनसच्या रुग्णांसाठी टिकली लावणे फायदेशीर ठरते.

👩🏻‍🦰 *_सुरकुत्या नष्ट होतात_*
टिकली लावणे त्वचेसाठीसुध्दा फायदेशीर आहे. आज्ञाचक्रावर दबाव टाकल्यास रक्त प्रवाहाची गती वाढते आणि त्वचा दिर्घकाळ टवटवीत राहते. सुरकुत्या पडत नाहीत.
उत्तर लिहिले · 6/8/2019
कर्म · 569225