2 उत्तरे
2 answers

पॅनकार्ड नंबरचा अर्थ काय आहे?

3
ओळखपत्र म्हणून अनेक ठिकाणी पॅनकार्डचा वापर केला जातो. पैशांची मोठ्या प्रमाणात देवाणघेवाण, तसेच करसंबंधित गोष्टींसाठी पॅनकार्डचा वापर केला जातो. बँकेतूनही मोठी रक्कम काढायची असल्यास पॅनकार्ड नंबर अनिवार्य असतो. मात्र या १० अंकी पॅननंबरचा अर्थ तुम्हाला माहीत आहे का?
१० अंकी पॅननंबरला पाच भागांमध्ये विभागण्यात आलेय. ज्यातील पहिले पाच आणि शेवटचा अंक अक्षरे असतात तर उरलेले अंक संख्येत लिहिलेले असतात.♍
https://bit.ly/2I2t8Gt
१. समजा एखाद्याचा पॅननंबर ADEPH6548C असा आहे. यातील पहिले तीन अंक हे AAA ते ZZZ यादरम्यानची तीन अक्षरे असतात.२. चौथा अंक पॅनकार्डधारकाची स्थिती दर्शवतो. हा सर्वात महत्त्वाचा अंक असतो. अनेक पॅनकार्डवर चौथा नंबर म्हणून p हे अक्षर असते. याचा अर्थ पर्सन म्हणजेच व्यक्ती. याशिवाय चौथा नंबर म्हणून C,H,F,A,T,B,L,J आणि G ही अक्षरेही असतात.
या अक्षरांचा अर्थ खालीलप्रमाणे.
C – कंपनी
H – संयुक्त हिन्दू कुटुंब
F – फर्म
A – व्यक्तींचा समूह
T – ट्रस्ट
B – एका व्यक्तीची संस्था
L – स्थानीय प्राधिकरण
J – कृत्रिम विधिक व्यक्ति
G – सरकार
३. पाचवा अंक हा पॅनकार्ड धारकाचे नाव अथवा आडनावातील पहिले अक्षर असते. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचे नाव अमित गोएल असे असेल तर पाचवा नंबर G हा असेल.
४. पाच अक्षरांनंतर पुढील चार अंक संख्येत असतात. हे चार अंक 0001 ते 9999 यादरम्यानच्या अनुक्रमे संख्या असतात.


५. पॅननंबरमधील शेवटचा अर्थात दहावा अंक एक अक्षऱ असते जे सुरुवातीच्या नऊ अंकाचा वापर करुन एका विशिष्ट फॉर्म्युल्याअंतर्गत निर्धारित केले जाते.♍
➖➖➖➖➖➖➖ ➖➖    
            ● *संकलन*
            *📞@9890875498*
0

पॅन (PAN) हे एक १० अक्षरी अल्फान्युमेरिक (Alphanumeric) क्रमांक आहे, जो आयकर विभागातर्फे (Income Tax Department) जारी केला जातो.

पॅनकार्ड नंबरचा अर्थ:

  • पहिले ३ अक्षरे: ही अक्षरे अक्षरांची मालिका आहेत.
  • ४ थे अक्षर: हे पॅनकार्ड धारकाचा प्रकार दर्शवते:
    • P - वैयक्तिक (Personal)
    • F - फर्म (Firm)
    • C - कंपनी (Company)
    • A - असोसिएशन ऑफ पर्सन (Association of Person)
    • B - बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल (Body of Individual)
    • G - सरकारी संस्था (Government Organisation)
    • H - हिंदू अविभक्त कुटुंब (Hindu Undivided Family)
    • L - लोकल अथॉरिटी (Local Authority)
    • J - कृत्रिम न्यायिक व्यक्ती (Artificial Juridical Person)
    • T - ट्रस्ट (Trust)
  • ५ वे अक्षर: हे पॅनकार्ड धारकाच्या आडनावाचे पहिले अक्षर असते.
  • पुढील ४ अंक: हे अंक मालिकेचा भाग असतात.
  • शेवटचे अक्षर: हे अक्षर एक यादृच्छिक अक्षर असते.

पॅनकार्ड हे एक महत्त्वाचे ओळखपत्र आहे. याचा उपयोग आर्थिक व्यवहारांसाठी आणि कर भरण्यासाठी होतो.

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 1040

Related Questions

पॅनकार्ड काढण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?
पॅनकार्ड हरवले असल्यामुळे जुना पॅन नंबर कसा मिळवावा?
पॅनकार्ड वरती वडिलांचे नाव बदलायचे आहे, ते कसे होईल?
कुणाला पॅनकार्ड काढायचे असल्यास माझ्याशी संपर्क साधा, फक्त 5 मिनिटात मिळेल? ₹49 किंवा मोफत.👍
माझे पॅनकार्ड हरवले आहे. झेरॉक्सवरून दुसरे काढता येईल का?
पॅनकार्ड बद्दल तुम्हाला माहीत नसलेल्या गोष्टी?
पॅनकार्ड वरील शब्द-अक्षरे व अंकांचा अर्थ काय?