Topic icon

पॅनकार्ड

1
पॅनकार्ड काढण्यासाठी आधारकार्ड व २ फोटो लागतात. किंवा फक्त आधारकार्डने देखील काढता येते. पॅनकार्ड काढण्याच्या २ पद्धती आहेत. १. आभासी (Only e-PAN Card) जे आधारकार्ड द्वारे फक्त डिजिटल स्वरुपात ईमेल मध्ये उपलब्ध होते. २.Physical PAN Card & e-PAN Card म्हणजे ते प्रत्यक्ष आपल्या पत्त्यावर व ईमेल मध्ये येते. पॅनकार्ड काढण्यासाठी जवळच्या ऑनलाईन सेवा केंद्राला भेट देऊन प्रत्यक्ष फॉर्म भरून काढू शकतात. किंवा आधारक्रमांकानुसार ऑनलाईन काढता येते, त्यासाठी आधारकार्डला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे.
उत्तर लिहिले · 3/6/2022
कर्म · 11785
1
आपला पॅन नंबर विसरलात? आपण ते ऑनलाइन कसे शोधू शकता ते येथे आहे. तथापि, नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL) चोरी किंवा पॅनकार्ड हरवल्यास डुप्लिकेट कॉपी मिळवण्याचा पर्याय देते. पॅन मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.
खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

https://www.uttar.co/answer/6023e7bd8e66106d0f98cc87
उत्तर लिहिले · 11/2/2021
कर्म · 14895
0
पॅनकार्डवर वडिलांचे नाव बदलण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:

ऑनलाइन प्रक्रिया:

  1. NSDL च्या वेबसाइटवर जा: NSDL.
  2. 'Application Type' मध्ये 'Changes or Correction in Existing PAN Data' हा पर्याय निवडा.
  3. 'Category' मध्ये 'Individual' हा पर्याय निवडा.
  4. तुमची माहिती भरून अर्ज सबमिट करा.
  5. ओळखपत्र, पत्ता आणि जन्मतारखेचा पुरावा अपलोड करा.
  6. अर्ज सबमिट करा आणि शुल्क भरा.

ऑफलाइन प्रक्रिया:

  1. NSDL च्या वेबसाइटवरून फॉर्म डाउनलोड करा: NSDL Form.
  2. फॉर्म व्यवस्थित भरा.
  3. आवश्यक कागदपत्रे जोडा.
  4. जवळच्या NSDL कार्यालयात अर्ज जमा करा.

आवश्यक कागदपत्रे:

  • पॅन कार्डची प्रत
  • ओळखपत्राचा पुरावा (आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट)
  • पत्त्याचा पुरावा (आधार कार्ड, utility bill, बँक स्टेटमेंट)
  • जन्मतारखेचा पुरावा (जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, पासपोर्ट)

शुल्क:

  • भारतात अर्ज केल्यास: रु 110 (GST सह)
  • भारताबाहेर अर्ज केल्यास: रु 1020 (GST सह)

टीप:

  • अर्ज भरताना सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करा.
  • कागदपत्रे योग्यरित्या अपलोड करा.
उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 1040
3
ओळखपत्र म्हणून अनेक ठिकाणी पॅनकार्डचा वापर केला जातो. पैशांची मोठ्या प्रमाणात देवाणघेवाण, तसेच करसंबंधित गोष्टींसाठी पॅनकार्डचा वापर केला जातो. बँकेतूनही मोठी रक्कम काढायची असल्यास पॅनकार्ड नंबर अनिवार्य असतो. मात्र या १० अंकी पॅननंबरचा अर्थ तुम्हाला माहीत आहे का?
१० अंकी पॅननंबरला पाच भागांमध्ये विभागण्यात आलेय. ज्यातील पहिले पाच आणि शेवटचा अंक अक्षरे असतात तर उरलेले अंक संख्येत लिहिलेले असतात.♍
https://bit.ly/2I2t8Gt
१. समजा एखाद्याचा पॅननंबर ADEPH6548C असा आहे. यातील पहिले तीन अंक हे AAA ते ZZZ यादरम्यानची तीन अक्षरे असतात.२. चौथा अंक पॅनकार्डधारकाची स्थिती दर्शवतो. हा सर्वात महत्त्वाचा अंक असतो. अनेक पॅनकार्डवर चौथा नंबर म्हणून p हे अक्षर असते. याचा अर्थ पर्सन म्हणजेच व्यक्ती. याशिवाय चौथा नंबर म्हणून C,H,F,A,T,B,L,J आणि G ही अक्षरेही असतात.
या अक्षरांचा अर्थ खालीलप्रमाणे.
C – कंपनी
H – संयुक्त हिन्दू कुटुंब
F – फर्म
A – व्यक्तींचा समूह
T – ट्रस्ट
B – एका व्यक्तीची संस्था
L – स्थानीय प्राधिकरण
J – कृत्रिम विधिक व्यक्ति
G – सरकार
३. पाचवा अंक हा पॅनकार्ड धारकाचे नाव अथवा आडनावातील पहिले अक्षर असते. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचे नाव अमित गोएल असे असेल तर पाचवा नंबर G हा असेल.
४. पाच अक्षरांनंतर पुढील चार अंक संख्येत असतात. हे चार अंक 0001 ते 9999 यादरम्यानच्या अनुक्रमे संख्या असतात.


५. पॅननंबरमधील शेवटचा अर्थात दहावा अंक एक अक्षऱ असते जे सुरुवातीच्या नऊ अंकाचा वापर करुन एका विशिष्ट फॉर्म्युल्याअंतर्गत निर्धारित केले जाते.♍
➖➖➖➖➖➖➖ ➖➖    
            ● *संकलन*
            *📞@9890875498*
1
हो येईल
पॅन सेंटरवर जावा सोबत आधार कार्ड घेऊन जावा. दिवसात काम होते.
उत्तर लिहिले · 18/7/2020
कर्म · 11370
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही