अर्थ
पॅनकार्ड
पॅनकार्ड ऑनलाईन काढायचे आहे?
मूळ प्रश्न: पॅन कार्ड कसे काढायचे?
ऑनलाईन अर्ज भरून आपण पॅन कार्ड खूप सहजरित्या काढू शकतो:

1. या वेबसाईट वर जा: http://www.myutiitsl.com/PAN_ONLINE/PANApp
2. सर्व माहिती भरून फॉर्म सबमिट करा
3. नंतर नेट बँकिंग किंवा क्रेडिट कार्ड वापरून 96 रुपये फी पेमेंट करा
4. फी भरल्यानंतर आलेला फॉर्म प्रिंट करा
5. फॉर्म वर दर्शविलेल्या 3 ठिकाणी सही करा
6. फॉर्म वर फोटो चिकटवा
7. अप्लिकेशन सोबत आयडेंटिटी कार्ड(ज्यावर तुमची जन्मतारीख असेल असे) ची झेरॉक्स जोडा
हे पूर्ण झालेले अप्लिकेशन खालील पत्त्यावर पाठवा:
PAN PDC Incharge – Mumbai region
UTI Infrastructure Technology And Services Limited
Plot No. 3, Sector 11, CBD Belapur
NAVI MUMBAI – 400614
Tel No:(022)67931300
तुमचे अप्लिकेशन प्रोसेस होऊन तुमचे पॅनकार्ड तुमच्या घरी येईल.

अपडेट:
पॅन कार्ड ऑनलाईन अप्लिकेशन करताना तुम्हाला तुमचा एओ कोड विचारू शकतात, हा कोड मिळवण्यासाठी खालील उत्तर वाचा:
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0
answers