कागदपत्रे पॅन कार्ड पॅनकार्ड अर्थशास्त्र

पॅनकार्ड बद्दल तुम्हाला माहीत नसलेल्या गोष्टी?

2 उत्तरे
2 answers

पॅनकार्ड बद्दल तुम्हाला माहीत नसलेल्या गोष्टी?

6



*_🤔'पॅन कार्ड'बद्दल या ५ गोष्टी माहिती आहेत का ?_*

_Permanent Account Number म्हणजे (PAN) पॅन कार्ड हे एक महत्वाचं कागदपत्र आहे. कोर्टाच्या नवीन आदेशानुसार प्रत्येक ठिकाणी आधारकार्ड गरजेचा नाही, त्यामुळे पॅन कार्डचं महत्व आणखी वाढलेलं आहे. ओळखपत्र सादर करायचं असेल किंवा महत्वाचा आर्थिक व्यवहार करायचा असेल तर आज पॅन कार्डला पर्याय नाही.पॅन कार्ड गरजेचं असतं हे तर आपल्या सगळ्यांनाच माहित आहे, पण पॅन कार्ड बद्दल महत्वाची असलेली माहिती आपल्यातील फारच कमी लोकांना माहित असते. आज आम्ही पॅन कार्ड बद्दल माहित नसलेल्या ५ गोष्टी सांगणार आहोत._

*_◼पॅन कार्डसाठी कोणीही अर्ज करू शकतो_*
आपल्याला बऱ्याचदा असा समज असतो की वय वर्ष १८ पूर्ण झाल्यावरच पॅन कार्डसाठी अर्ज करता येतो. खरं तर पॅन कार्डसाठी अशी कोणतीही वयोमर्यादा ठेवण्यात आलेली नाही. १८ वर्षाखालील मुलांसाठी पण पॅन कार्ड बनवून मिळतो.भारतात आर्थिक व्यवहार करायचा असल्यास NRI, परदेशी नागरिक किंवा परदेशी कंपन्यांना पण पॅन कार्डसाठी अर्ज करता येतो.

*_◼वडिलांचं नाव पॅन कार्डवर छापणे आवश्यक नाही._*
जुन्या नियमानुसार वडिलांचं नाव पॅन कार्डवर छापणे अनिवार्य होते. ५ डिसेंबर २०१८ पासून लागू झालेल्या नवीन नियमानुसार वडिलांचं नाव कार्डवर लावणे हे पूर्णपणे आपल्यावर अवलंबून आहे.

*_◼१० अंकी पॅन कार्ड क्रमांकात लपली आहे कार्ड धारकाची माहिती_*
१० अंकी अल्फान्यूमेरिक पॅन कार्ड क्रमांकात सुरुवातीचे ५ अंक ही अक्षरं ठेवण्यात आली आहेत. सुरुवातीची ३ अक्षरं ही A-Z पर्यंतचे सिरीज क्रमांक दाखवतात. चौथं अक्षर हे कार्ड नेमकं कोणाचं आहे याबद्दलची माहिती देतं. उदाहरणार्थ, P - Person, C - Companies, F - Firms, A -Associations, T – Trusts. पाचवं अक्षर हे त्या व्यक्तीच्या आडनावातील पाहिलं अक्षर असतं.

*_◼पॅन कार्ड तत्काळ मिळू शकत_*
गरजेच्या वेळी पॅन कार्ड तत्काळ मिळू शकतं. यासाठीची प्रोसेस अत्यंत सोप्पी आहे. NSDL किंवा UTIITSL या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज आणि प्रोसेसिंग फीज भरली की लवकरात लवकर पॅन कार्ड मिळू शकतं.

*_◼पॅन कार्डवर असलेली ती विशिष्ट तारीख_*
पॅन कार्डवर जिथे आपला फोटो असतो त्याच्या कोपऱ्यात आडव्या बाजूने एक तारीख छापलेली असते. ती तारीख म्हणजे पॅन कार्ड कधी जारी करण्यात आलं याची तारीख असते.
उत्तर लिहिले · 29/3/2019
कर्म · 569225
0

पॅनकार्ड (Permanent Account Number) हे एक महत्त्वाचे आर्थिक ओळखपत्र आहे. याबद्दल काही अज्ञात गोष्टी खालीलप्रमाणे:

  1. पॅनकार्ड फक्त कर भरण्यासाठी नाही:

    पॅनकार्ड हे केवळ कर भरण्यासाठीच आवश्यक नाही, तर ते एक महत्त्वाचे ओळखपत्र म्हणूनही वापरले जाते. कोणताही आर्थिक व्यवहार करताना, जसे की बँक खाते उघडणे, मालमत्ता खरेदी करणे किंवा मोठे कर्ज घेणे, तेव्हा पॅनकार्ड आवश्यक असते.

  2. पॅन नंबरमध्ये छुपे अर्थ:

    पॅन नंबरमधील प्रत्येक अक्षराचा एक विशिष्ट अर्थ असतो. पहिले तीन अक्षरे अक्षरांची मालिका दर्शवतात, चौथे अक्षर अर्जदाराचा प्रकार (व्यक्ती, कंपनी इ.) दर्शवते आणि पाचवे अक्षर अर्जदाराच्या आडनावाचे पहिले अक्षर असते.

  3. दोन पॅनकार्ड असणे गुन्हा आहे:

    एका व्यक्तीकडे दोन पॅनकार्ड असणे कायद्याने गुन्हा आहे. असे आढळल्यास, आयकर विभाग तुमच्यावर दंड लावू शकतो. त्यामुळे तुमच्याकडे दोन पॅनकार्ड असल्यास, ते त्वरित सरेंडर करणे आवश्यक आहे.

  4. पॅनकार्ड अपडेट करणे:

    आधार कार्डप्रमाणेच पॅनकार्डवरील माहिती अपडेट करणे आवश्यक आहे. नाव, पत्ता किंवा इतर माहितीमध्ये बदल झाल्यास, ती माहिती अपडेट करणे गरजेचे आहे.

  5. पॅनकार्ड हरवल्यास काय करावे:

    पॅनकार्ड हरवल्यास, तुम्ही आयकर विभागाच्या वेबसाइटवरून डुप्लिकेट पॅनकार्डसाठी अर्ज करू शकता. तसेच, तुम्ही ई-पॅन डाउनलोड करू शकता, जे डिजिटल स्वरूपात उपलब्ध असते.

अधिक माहितीसाठी तुम्ही आयकर विभागाच्या वेबसाइटला भेट देऊ शकता: आयकर विभाग

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 1040

Related Questions

पॅनकार्ड काढण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?
पॅनकार्ड हरवले असल्यामुळे जुना पॅन नंबर कसा मिळवावा?
पॅनकार्ड वरती वडिलांचे नाव बदलायचे आहे, ते कसे होईल?
पॅनकार्ड नंबरचा अर्थ काय आहे?
कुणाला पॅनकार्ड काढायचे असल्यास माझ्याशी संपर्क साधा, फक्त 5 मिनिटात मिळेल? ₹49 किंवा मोफत.👍
माझे पॅनकार्ड हरवले आहे. झेरॉक्सवरून दुसरे काढता येईल का?
पॅनकार्ड वरील शब्द-अक्षरे व अंकांचा अर्थ काय?