सोशिअल मीडिया
सामाजिक
सत्य
कोलंबियातील बसवर डॉ. आंबेडकरांचा फोटो असा फोटो असलेला मेसेज व्हायरल होत आहे त्याचे सत्य काय?
2 उत्तरे
2
answers
कोलंबियातील बसवर डॉ. आंबेडकरांचा फोटो असा फोटो असलेला मेसेज व्हायरल होत आहे त्याचे सत्य काय?
3
Answer link

कोलंबियातील बसेसवर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असल्याच्या दाव्याची पोस्ट व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये एका बसवर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या पत्नी माई आंबेडकर यांचा फोटो दिसत आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे की, अमेरिकेत आज देखील डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान केला जातो. अमेरिका त्यांना आदर्श मानते.

https://bit.ly/306XPAJ
⏹️ Fact Check/Verification ⏹️
आम्ही कोलंबियातील बसवर डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे का याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. यासाठी गूगल रिव्हर्स इमेजचा आधार घेतला. या शोधा दरम्यान आम्हाला विकिपीडियावर बसचा फोटो आढळून आला मात्र यावर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो आढळून आला नाही. विकिपीडियाच्या माहितीनुसार हा फोटो लंडनमधील टूर बसचा आहे.
godfullyknown नावाच्या ब्लाॅगमध्ये देखील हा फोटो शेअर करण्यात आला आहे मात्र यात देखील बसवर डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो नाही.
⏺️ Conclusion ⏺️
यावरुन हेच सिद्ध होते की कोलंबियातील बसवर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या पत्नी माई आंबेडकर यांचा फोटो नाही, दोघांचा जुना फोटो माॅर्फ करुन सोशल मीडियात व्हायरल करण्यात आलेला आहे.
*Sources*
विकिपीडिया- https://es.wikipedia.org/wiki/Archivo:Tour_bus_in_bath_
*सौजन्यः* checkthis@newschecker.in
0
Answer link
मी तुमच्या प्रश्नाची नोंद घेतली आहे.
कोलंबियामध्ये बसवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असल्याचा दावा असणारा एक संदेश प्रसारित होत आहे. या दाव्यामध्ये किती तथ्य आहे, हे तपासणे आवश्यक आहे.
सध्या, या दाव्याला पुष्टी देणारा कोणताही अधिकृत किंवा विश्वसनीय पुरावा उपलब्ध नाही. त्यामुळे या संदेशातील माहिती पूर्णपणे सत्य आहे की नाही, हे निश्चितपणे सांगता येत नाही.
कोणत्याही निष्कर्षावर पोहोचण्यापूर्वी, अधिकृत स्त्रोतांकडून माहिती मिळवणे महत्त्वाचे आहे.