सरपटणारे प्राणी रंग प्राणी

निळ्या रक्ताच्या खेकड्याबद्दल माहिती द्या?

2 उत्तरे
2 answers

निळ्या रक्ताच्या खेकड्याबद्दल माहिती द्या?

2
 या खेकड्याची रक्त असते निळया रंगाचं  🦀
    🦀  ११ लाख रूपये लिटर  🦀
https://bit.ly/2FdCI7X
प्रत्येक जीवाचं रक्त हे लाल असतं.पण एक असा खेकडा आहे की त्याचं रक्त निळ्या रंगाचे असते. त्याहून आश्चर्याची बाब म्हणजे या जीवाच्या एक लिटर रक्ताची किंमत ११ लाख रूपयांपेक्षा जास्त आहे.
निळ्या रंगाचं रक्त असलेल्या या जीवाचं नाव आहे हॉर्स शू. हा एका दुर्मीळ प्रजातीचा खेकडा आहे. तज्ज्ञ सांगतात की, हॉर्स शू खेकडा जगातल्या सर्वात जुन्या जीवांपैकी एक आहे. हा जीव पृथ्वीवर सधारण ४५ कोटी वर्षांपासून आहे. हॉर्स शू खेकडे प्रामुख्याने अटलांटिक, पॅसिफिक आणि हिंदी महासागरांच्या किनाऱ्यावर आढळून येतात. मे ते जून ह्या प्रजननकाळात पौर्णिमेच्या रात्री भरतीच्या वेळेला ते किनाऱ्यावर दाखल होतात. वैद्यकीय क्षेत्रासाठी तसेच ह्या खेकड्यांचा फस्ता पडणाऱ्या पक्षांसाठी ही एक मोठी पर्वणीच असते.
हॉर्स शू खेकड्याच्या अनोख्या निळ्या रक्ताचा वापर औषधे तसेच वैद्यकीय उपकरणे जीवाणूरहित करण्यासाठी केला जातो. तसेच काही औषधांमध्ये त्याचा वापर केला जातो.लाखोंच्या संख्येने खेकडे पकडून प्रयोगशाळेत नेले जातात. तिथे ह्या खेकड्यांचा हृदयाला छोटेसे छिद्र पाडून त्यांच्या शरीरातील अंदाजे ३०% रक्त काचेच्या भांड्यात जमा केले जाते. नंतर त्यांना पुन्हा समुद्रात सोडण्यात येते. हॉर्स शू खेकड्याच्या रक्ताचा वापर वैज्ञानिक १९७० पासून करत आहेत.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,तज्ज्ञ सांगतात की, हॉर्स शू खेकड्याच्या निळ्या रक्तात तांब असतं. सोबतच एक खास रसायन असतं जे कोणत्याही बॅक्टेरियाच्या आजूबाजूला जमा होतं आणि त्यांची ओळख पटवतं.खेकड्याच्या शरीरातील रक्ताला निळा रंग त्यातील तांब्यामुळे मिळतो. मानवी शरीरात याप्रकारे लोह असतं. त्यामुळे मानवी रक्ताचा रंग लाल असतो. पण शास्त्रज्ञांचा यात इतका इंटरेस्ट असण्याचं कारण फक्त निळा रंग नाही.
तांब्याप्रमाणेच हॉर्सशू खेकड्यांच्या रक्तात एक विशिष्ट रसायन असतं. यामुळे आजूबाजूच्या बॅक्टेरियांना शोधण्यास मदत होते.
अत्यंत कमी प्रमाणात वापरुन सुद्धा हे बॅक्टेरियाची उपस्थिती शोधू शकतं. क्लोटिंग एजंट चाचणी करण्यासाठी वापरला जातो.सध्या जगात हॉर्सशू खेकड्यांच्या फक्त चार प्रजाती उरल्या आहेत.
वैद्यकीय व्यवसायात मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत असल्याने या सर्व प्रजाती सध्या धोक्यात आहेत.
https://bit.ly/2FdCI7X

0

निळ्या रक्ताचा खेकडा म्हणजे हॉर्सशू क्रॅब (Horseshoe crab). या खेकड्याच्या रक्ताचा रंग निळा असतो, कारण त्याच्या रक्तात तांबे (copper) आधारित हिमocyanिन (hemocyanin) नावाचे प्रथिन असते. हिमोग्लोबिन (hemoglobin) ऐवजी हिमocyanिन असल्याने रक्ताला निळा रंग येतो.

हॉर्सशू क्रॅब विषयी काही तथ्य:

  • वैज्ञानिक नाव: लिमूलस पॉलीफेमस (Limulus polyphemus)
  • हे खेकडे वैद्यकीय क्षेत्रात खूप महत्वाचे आहेत. त्यांच्या रक्ताचा उपयोग बॅक्टेरियाच्या तपासणीसाठी होतो.
  • त्यांच्या रक्तातील लिम्युलस अमिबोसाइट लायसेट (Limulus Amebocyte Lysate - LAL) नावाचा पदार्थ औषधे आणि उपकरणांमध्ये बॅक्टेरिया आहेत की नाही हे तपासण्यासाठी वापरला जातो.
  • हॉर्सशू क्रॅब उत्तर अमेरिका आणि आशियाच्या किनाऱ्याजवळ आढळतात.
  • ते समुद्राच्या तळाशी वाळू आणि चिखलात राहतात.
उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 940

Related Questions

माझा रंग काळा आहे आणि मी चेहऱ्यावर काही लावत नाही, तरी पण चेहरा काळवंडलेला असतो, तर त्यासाठी काही उपाय सांगा ज्याने माझा रंग उजळेल?
हार बनवण्यासाठी एक दुसऱ्या ११ तोंडी तांबडी फुले ओवली आहेत, या फुलांच्या मागे चौपट पिवळ्या रंगाची फुले ओवली, तर मध्यभागी असणारे फूल कितवे?
इंद्रधनुष्यातील सात रंग कोणते?
2024 सालचा रंग म्हणून जाहीर झालेल्या पीच फज रंगाची फुले कोणत्या झाडावर येतात?
सैनिकांच्या गणवेशात कोणते तीन रंग असतात?
कोणत्या रंगाचे प्रकाश किरण सर्वाधिक वळतात?
टोमॅटोला लाल रंग कोणत्या रंगसूत्रामुळे येतो?