Topic icon

सरपटणारे प्राणी

2

अ‍ॅनॅकाँडा
मध्य अमेरिका आणि उष्णकटिबंधीय दक्षिण अमेरिकेत आढळणारा बोइडी कुलातील मोठ्या आकाराचा साप. पाण्यात आणि दलदलीच्या प्रदेशात याचे वास्तव्य असल्याने याला पाण-अजगर असेही म्हणतात. याचे शास्त्रीय नाव युनेक्टस म्युरिनस आहे.

सर्वसाधारणपणे ची लांबी सु. ९ मी. आणि वजन सु. २५० किग्रॅ. पर्यंत असते. रंग तपकिरी, पिवळा किंवा हिरवा असून पाठीवर मोठे, काळे व अंडाकृती ठिपके; तर पोटाकडच्या पांढुरक्या भागावर लहान काळी वलये असतात. डोके लांबट, चपटे आणि मानेपासून स्पष्टपणे वेगळे दिसते. मासे हे त्याचे प्रमुख भक्ष्य असून बर्‍याचदा तो लहान सरपटणारे प्राणी, पक्षी आणि लहान सस्तन प्राण्यांवर उपजीविका करतो. तो भक्ष्याभोवती आपल्या शरीराची घट्ट वेटोळी करून त्याला गुदमरून मारतो आणि नंतर गिळतो. शत्रूपासून बचाव करताना तो निसटून जाण्याचा प्रयत्‍न करतो, निसटणे अशक्य झाल्यास शत्रूचा चावा घेतो. तो विषारी नाही, मात्र त्याच्या चाव्यामुळे खोल जखमा होतात.

अ‍ॅनॅकाँडाची मादी आकाराने मोठी असते. मादीला दरवर्षी २०-४० पिल्ले होतात. ती सु. ९० सेंमी. लांब असतात. जन्मल्याबरोबर पिले स्वतंत्रपणे राहू लागतात.

अ‍ॅनॅकाँडाची लांबी, भक्ष्यग्रहणशक्ती आणि माणसांवरील हल्ले यांविषयी अतिरंजित भयप्रद वर्णने पूर्वीच्या काळी केलेली आहेत. मात्र सहसा तो माणसावर हल्ला करीत नाही.


उत्तर लिहिले · 25/9/2021
कर्म · 121765
14
सापाचे विष जर साठवून ठेवले तर ते कित्येक दिवस प्रभावी राहू शकते. मात्र जर ते उघड्यावर राहिले किंवा मातीत पडले तर ते सभोवतालच्या गोष्टीत मिसळून जाऊन निष्प्रभ होते.
सापाचे विष माणसाला घातक तेव्हाच असते जेव्हा ते त्वचेखालून शरीरात प्रवेश करते, जे की साप चावल्यावरच शक्य असते. तोंडावाटे किंवा इतर मार्गाने सापाच्या विषाचा माणसाच्या शरीरावर परिणाम होत नाही. त्यामुळे उघड्यावरील सापाच्या विषाचा जास्त धसका घेणे काही योग्य नाही.
उत्तर लिहिले · 20/11/2020
कर्म · 283280
5
🦂जगातील सर्वात महागड्या वस्तू कोणत्या? असा जर प्रश्न विचारला तर तुम्ही हिरे, गाडी, बंगला, सोने किवा चांदी ही नावे घ्याल. मात्र, जगात असा एक जीव अस्तित्वात आहे की त्याच्या शरीरात तयार होणारा तरल पदार्थ म्हणजे विष हा जगातील सर्वात महागडा पदार्थ आहे. खासकरून वाळवंटात आढळणारे विंचू हे जास्त धोकादायक असतात. त्यांच्या विषाच्या एका थेंबातील काही अंशानेही कोणत्याही जीवाला मोठा धोका निर्माण होतो. अथवा प्रसंगी प्राणही संकटात सापडू शकतो. मात्र, याच विषामुळे अनेक आजारांवर औषध तयार केले जाते._*

विंचवाच्या विषानंतर दुसरा महागडा तरल पदार्थ म्हणजे किंग कोब्राचे विष होय. कोब्राच्या विषासाठी प्रतिगॅलन म्हणजे 3.7 लिटरला 1.53 लाख डॉलर्स मोजावे लागतात. यापासून वेदनाशमक औषधे तयार केली जातात. तर विंचवाच्या विषामध्ये सुमारे पाच लाखकेमिकल कंपाऊंड आढळतात.*
*🦂यावर अद्याप संशोधनही झालेले नाही. यासाठीच या विषाला ‘कॉकटेल ऑफ बायोअॅक्टिव्ह’ असेही म्हटले जाते. विंचवापासून विष काढण्याच्या प्रक्रियेला ‘मिल्किंग’ असे म्हटले जाते. एका वेळेला एका विंचवापासून सुमारे 0.5 एमजी इतके विष मिळते. हा जगातील सर्वात महागडा तरल पदार्थ आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रतिगॅलन अथवा 3.7 लिटरची किंमत 3.90 कोटी डॉलर्स (2.81 अब्ज रुपये) इतकी आहे. या विषापासून सेलेरोसिस, आर्थिरिटिसमुळे मानवी शरीरात होणार्या असहनीय वेदनांवर उपचार केले जातात. जगभरात सध्या विंचवाच्या तब्बल चार हजार प्रजाती असल्या तरी यातील 40 प्रजातींच्या विषामुळे मानवी जीव धोक्यात येऊ शकतो.*🦂
https://bit.ly/3iUxRb7


____________________________
*🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* *☜♡☞*
┏━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┓
    _*माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव*_
┗━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┛
2
 या खेकड्याची रक्त असते निळया रंगाचं  🦀
    🦀  ११ लाख रूपये लिटर  🦀
https://bit.ly/2FdCI7X
प्रत्येक जीवाचं रक्त हे लाल असतं.पण एक असा खेकडा आहे की त्याचं रक्त निळ्या रंगाचे असते. त्याहून आश्चर्याची बाब म्हणजे या जीवाच्या एक लिटर रक्ताची किंमत ११ लाख रूपयांपेक्षा जास्त आहे.
निळ्या रंगाचं रक्त असलेल्या या जीवाचं नाव आहे हॉर्स शू. हा एका दुर्मीळ प्रजातीचा खेकडा आहे. तज्ज्ञ सांगतात की, हॉर्स शू खेकडा जगातल्या सर्वात जुन्या जीवांपैकी एक आहे. हा जीव पृथ्वीवर सधारण ४५ कोटी वर्षांपासून आहे. हॉर्स शू खेकडे प्रामुख्याने अटलांटिक, पॅसिफिक आणि हिंदी महासागरांच्या किनाऱ्यावर आढळून येतात. मे ते जून ह्या प्रजननकाळात पौर्णिमेच्या रात्री भरतीच्या वेळेला ते किनाऱ्यावर दाखल होतात. वैद्यकीय क्षेत्रासाठी तसेच ह्या खेकड्यांचा फस्ता पडणाऱ्या पक्षांसाठी ही एक मोठी पर्वणीच असते.
हॉर्स शू खेकड्याच्या अनोख्या निळ्या रक्ताचा वापर औषधे तसेच वैद्यकीय उपकरणे जीवाणूरहित करण्यासाठी केला जातो. तसेच काही औषधांमध्ये त्याचा वापर केला जातो.लाखोंच्या संख्येने खेकडे पकडून प्रयोगशाळेत नेले जातात. तिथे ह्या खेकड्यांचा हृदयाला छोटेसे छिद्र पाडून त्यांच्या शरीरातील अंदाजे ३०% रक्त काचेच्या भांड्यात जमा केले जाते. नंतर त्यांना पुन्हा समुद्रात सोडण्यात येते. हॉर्स शू खेकड्याच्या रक्ताचा वापर वैज्ञानिक १९७० पासून करत आहेत.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,तज्ज्ञ सांगतात की, हॉर्स शू खेकड्याच्या निळ्या रक्तात तांब असतं. सोबतच एक खास रसायन असतं जे कोणत्याही बॅक्टेरियाच्या आजूबाजूला जमा होतं आणि त्यांची ओळख पटवतं.खेकड्याच्या शरीरातील रक्ताला निळा रंग त्यातील तांब्यामुळे मिळतो. मानवी शरीरात याप्रकारे लोह असतं. त्यामुळे मानवी रक्ताचा रंग लाल असतो. पण शास्त्रज्ञांचा यात इतका इंटरेस्ट असण्याचं कारण फक्त निळा रंग नाही.
तांब्याप्रमाणेच हॉर्सशू खेकड्यांच्या रक्तात एक विशिष्ट रसायन असतं. यामुळे आजूबाजूच्या बॅक्टेरियांना शोधण्यास मदत होते.
अत्यंत कमी प्रमाणात वापरुन सुद्धा हे बॅक्टेरियाची उपस्थिती शोधू शकतं. क्लोटिंग एजंट चाचणी करण्यासाठी वापरला जातो.सध्या जगात हॉर्सशू खेकड्यांच्या फक्त चार प्रजाती उरल्या आहेत.
वैद्यकीय व्यवसायात मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत असल्याने या सर्व प्रजाती सध्या धोक्यात आहेत.
https://bit.ly/2FdCI7X

6
प्राणी व त्यांची आयुर्मर्यादा-
१. मलेशियन कासव - १५० ते १६० वर्षे
२. कासव - ८० वर्षे
३. हत्ती - ६० वर्षे
४. चिंपाझी - ५० ते ६० वर्षे
५. गरुड - ५५ वर्षे
६. घोडा - ५० वर्षे
७. गेंडा - ४१ वर्षे
८. पाणघोडा - ४० वर्षे
९. अस्वल - ३४ वर्षे
१०. झेब्रा - २२ वर्षे
११. माकड - २० वर्षे
१२. वाघ - २० वर्षे
१३. मांजर - २२ वर्षे
१४. कुत्रा - २० वर्षे
१५. चिमणी - ७ वर्षे
१६. गोल्डफिश - १० वर्षे
उत्तर लिहिले · 16/8/2020
कर्म · 8640
6
मुंगी हा एक सहा पायाचा अतिशय छोटा कीटक आहे. मुंग्या नेहमी समूहांमध्ये राहतात. लाल व काळ्या अशा दोन प्रकारच्या मुंग्या असतात. त्यांच्या निवासस्थानाला वारूळ असे म्हणतात. ते सहसा मातीचे असते. परंतु काही प्रजातींतील मुंग्या झाडावर वेगळ्या साहित्याचा वापर करूनही वारुळे बांधतात. मुंगी आपल्या शरीराच्या क्षमतेपेक्षा जास्त वजन उचलू शकते.
उत्तर लिहिले · 12/10/2020
कर्म · 6750
1
निळया झिंग्याचा शोध

https://bit.ly/33Ubq0Z

न्यूयॉर्क :अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर झिंगे (लॉबस्टर) पकडले जातात, पण गेल्या सोमवारी एका मच्छीमाराला अनोखा झिंगा सापडला.https://bit.ly/3iHAQ6e हा झिंगा चक्क चमकदार निळाशार रंगाचा होता. वीस लाखांमध्ये एखादाच झिंगा अशा रंगाचा असतो. असा दुर्मीळ झिंगा सापडल्याने अर्थातच हा मच्छीमार खुश झाला आणि त्याची व झिंग्याची सर्वत्र प्रसिद्धी झाली!
या मच्छीमाराचे नाव वेन निकर्सन. मॅसाच्युसेट्समधील हा मच्छीमार केप कॉडजवळील किनार्याजवळ झिंगे पकडत असतात♍. अन्य अनेक सर्वसाधारण झिंग्यांबरोबरच त्याला हा लाखात उठून दिसणारा सुंदर निळा झिंगाही सापडला. त्याने लगेचच त्याचे ‘ब्लू’ असे नामकरणही करून टाकले! विशेष म्हणजे या मच्छीमाराला 1990 मध्येही एक निळा झिंगा सापडला होता. काही जनुकीय कारणांमुळे झिंग्यामध्ये एक विशिष्ट प्रोटिनचा अभाव निर्माण होतो आणि त्याला असा निळा रंग मिळतो. त्यामुळे अर्थातच हा झिंगा दुर्मीळ म्हणजे वीस लाख झिंग्यांमध्ये एखादाच असतो.♍https://bit.ly/33Ubq0Z