भूगोल
महाराष्ट्रातील राजकारण
राज्यशास्त्र
महाराष्ट्राचा इतिहास
महाराष्ट्राची सर्वाधिक सीमा कोणत्या राज्याला लागून आहे?
2 उत्तरे
2
answers
महाराष्ट्राची सर्वाधिक सीमा कोणत्या राज्याला लागून आहे?
5
Answer link
◆ स्थान :- महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिमेस असलेले घटकराज्य आहे.
◆ महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील एक महत्वाचे राज्य होय.
◆ महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार :- १५’ ३७ उत्तर अक्षांश ते २२’६ उत्तर अक्षांश
◆ महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार :- ७२’३६ पूर्व रेखांश ते ८०’५४ पूर्व रेखांश इतका आहे.
◆विस्तार :- महाराष्ट्राची पश्चिम -पूर्व लांबी जास्तीत जास्त ८०० कि.मी. दक्षिणोत्तर लांबी जास्तीत जास्त ७०० कि. मी. आहे. यावरून आपल्याला असे स्पष्टीकरण देता येईल, की महाराष्ट्राचा पूर्व – पश्चिम विस्तार हा दक्षिण – उत्तर विस्तारापेक्षा अधिक आहे.
◆ क्षेत्रफळ :- राज्याचे एकूण क्षेत्रफळ ३,०७,७१३ चौ. कि. मी. असून क्षेत्रफळाबाबत देशात राजस्थान (३,४२,२३९ चौ. कि. मी.) व मध्य प्रदेश (३,०८,३१३ चौ. कि. मी.) यानंतर ३ रा क्रमांक लागतो.
◆ भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी ९.३६% क्षेत्रफळ महाराष्ट्राने व्यापले आहे. क्षेत्रफळानुसार सर्वांत कमी क्षेत्रफळ असणाऱ्या राज्यांत गोवा प्रथम क्रमांकावर आहे.
◆ राजकीय सीमा :-
महाराष्ट्राला एकूण ६ घटकराज्ये व १ केंद्रशासित प्रदेशांची सीमा लागून आहे. महाराष्ट्राच्या वायव्येस गुजरात, उत्तरेस मध्य प्रदेश, ईशान्येस व पूर्वेस छत्तीसगड, आग्नेयेस तेलंगणा,
◆ दक्षिणेस कर्नाटक – गोवा या राज्यांच्या सीमा लागून आहे.
◆ महाराष्ट्राची सर्वाधिक सीमा मध्य प्रदेशाला लागून आहे, तसेच सर्वाधिक जिल्ह्यांची संख्या मध्य प्रदेश या राज्याला लागून आहे.
◆ महाराष्ट्राची सर्वात कमी सीमा गोवा या राज्याला लागून आहे.
◆ महाराष्ट्राच्या वायव्येस दादरा- नगर हवेली हा केंद्रशासित प्रदेश लागून आहे.

0
Answer link
उत्तर:
महाराष्ट्राची सर्वाधिक सीमा मध्य प्रदेश राज्याला लागून आहे.
महाराष्ट्राच्या उत्तरेकडील बाजूला मध्य प्रदेश आहे आणि या दोन राज्यांची सीमा सुमारे 535 किलोमीटर आहे.
महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेली इतर राज्ये:
- गुजरात
- छत्तीसगड
- तेलंगणा
- कर्नाटक
- गोवा