शिक्षण परीक्षा स्पर्धा परीक्षा प्रवेश परीक्षा

GATE परीक्षा म्हणजे काय, ती कधी होते, परीक्षेचे स्वरूप काय असते, याबद्दल सविस्तर माहिती सांगा?

2 उत्तरे
2 answers

GATE परीक्षा म्हणजे काय, ती कधी होते, परीक्षेचे स्वरूप काय असते, याबद्दल सविस्तर माहिती सांगा?

5


गेट परीक्षा (Graduate Aptitude Test in Engineering) ही कॉम्प्युटर आधारित चाचणी आहे. ही परीक्षा राष्ट्रीयस्तरावर घेतली जाते. या आधारावर पोस्ट ग्रॅज्युएट इंजिनीअरिंग आणि सायन्स विषयांमध्ये प्रवेश दिला जातो. आता गेट परीक्षा ही बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका, इथोपिया आणि संयुक्त अरब अमिरात येथील विद्यार्थीही देऊ शकतात. नॅशनल कोऑर्डिनेशन बोर्ड-गेटच्या माध्यमातून आयआयएससी (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स) किंवा आयआयटी रुडकी, दिल्ली, गुवाहाटी, कानपूर, खडगपूर, मद्रास, बॉम्बे यापैकी एका संस्थेकडून या परीक्षेचे आयोजन केले जाते. गेट परीक्षेच्या माध्यमातून मास्टर ऑफ इंजिनीअरिंग, मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी आणि डॉक्टर ऑफ फिलॉसॉफीमध्ये प्रवेश मिळतो. याशिवाय जर्मनी, सिंगापूरच्या काही विद्यापीठांमध्येही प्रवेश दिला जातो. या लेखात आपण गेट परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम आणि तयारीबाबत माहिती घेऊ…

गेट परीक्षा स्वरूप :

गेट कॉम्प्युटर आधारित म्हणजेच ऑनलाईन परीक्षा आहे. सर्व विभागांसाठी एकूण ६५ प्रश्न विचारले जातात. सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचे असतात. परीक्षा एकूण १०० गुणांची असते. परीक्षा कालावधी ३ तासांचा असतो.

विभाग :

तीन विभागांमध्ये जनरल अ‍ॅप्टिट्यूड, इंजिनीअरिंग मॅथेमॅटिक्स आणि विशेष विषयांवर प्रश्नांचा समावेश असतो.

गुणपद्धती :

बहुपर्यायी आणि संख्यात्मक प्रकारचे अनेक प्रश्न १ किंवा २ गुणांसाठी असतील. प्रत्येकी एक गुण असणाऱ्या बहुपर्यायी प्रश्नांच्या चुकीच्या उत्तरासाठी १/३ गुण वजा केला जाईल, तर २ गुण असणाऱ्या प्रश्नाच्या चुकीच्या उत्तरासाठी २/३ गुण वजा केले जाईल. न्यूमेरिकल स्वरूपाच्या प्रश्नांसाठी कोणतेही निगेटिव्ह मार्किंग असणार नाही.

जनरल अ‍ॅप्टिट्यूडमध्ये १ गुणाचे ५ प्रश्न आणि २ गुणांचे ५ प्रश्न विचारले जातात. अशा प्रकारे १५ गुणांसाठी १० प्रश्न राहतील. जीजी, एक्सई आणि एक्सएल वगळून इतर विभागात १ गुणाचे २५ प्रश्न आणि २ गुणांचे ३० प्रश्न असतील. अशा प्रकारे एकूण ८५ गुणांसाठी ५५ प्रश्न राहतील.

गेट परीक्षेसाठी तयारीच्या टिप्स :

तुम्ही गेट परीक्षा देऊ इच्छित असाल तर तुम्हाला त्यासाठी उत्तम नियोजन करावे लागेल. खाली दिलेल्या टिप्स तुम्हाला मार्गदर्शक ठरतील.

गेट अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूप समजून घ्या :

गेट परीक्षेचा अभ्यासक्रम गेटच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. जर उमेदवारांनी अभ्यासक्रम समजून घेतला तर ही परीक्षा अधिक सोपी होऊ शकते. परीक्षेतील २ गुण आणि १ गुण असणाऱ्या प्रश्नांची ओळख करून घ्या. ६५ प्रश्नांच्या उत्तरासाठी १८० मिनिटांचा कालावधी दिला जाईल. त्यामुळे जास्त गुण असणारे प्रश्न सर्वप्रथम सोडविण्याचा प्रयत्न करावा.

काळजीपूर्वक निवडा GATE Exam Books :

गेट परीक्षेची अनेक पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत. त्यापैकी कोणती उपयुक्त आहेत याबाबत काळजीपूर्वक निवड करावी. परीक्षेसाठी ३-४ पुस्तकेच वाचावीत. जेवढी जास्त पुस्तके वाचाल तेवढा गोंधळ अधिक वाढण्याची शक्यता आहे. गेट परीक्षेचा अभ्यासक्रम विस्तारित असून एका पुस्तकातून अभ्यासक्रम होणे तसे कठीणच आहे. जर तुम्हाला एका पुस्तकातून काही समजत नसेल तर दुसऱ्या किंवा तिसऱ्या पुस्तकाचा आधार घ्यावा. गेट परीक्षेसाठी शक्यतो प्रसिद्ध आणि दर्जेदार लेखकांचे पुस्तके वाचणे योग्य राहील.

मागील परीक्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवा :

मागील वर्षीच्या गेट परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सोडविणे उत्तम पर्याय आहे. यामुळे परीक्षा स्वरूप आणि अभ्यासक्रम समजून घेता येतो; शिवाय तुमचा आत्मविश्वासही वाढतो. परीक्षेत केवळ प्रश्न सोडवून चालत नाही तर कमीतकमी वेळेत जास्तीतजास्त प्रश्न आत्मविश्वासाने सोडणे महत्त्वाचे ठरते. जर प्रश्नांची उत्तरे देण्यास जास्त वेळ घालवला तर शेवटी काही प्रश्न सुटण्याची शक्यता असते.

चांगले गुण मिळविण्यासाठी किती प्रश्न सोडवायचे?

गेट परीक्षेत जास्तीत जास्त प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावा. कारण या परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग नसते. मात्र हे लक्षात ठेवा की कमीतकमी वेळेत जास्तीतजास्त प्रश्न आत्मविश्वासाने सोडविण्याचा प्रयत्न करावा. कोणत्याही एका प्रश्नाला जास्त वेळ दिल्यामुळे परीक्षेत प्रश्न सोडविण्याची लय बिघडू शकते.

गेट परीक्षा अभ्यासक्रम _ (GATE 2020 Syllabus) :

२५ विषयांचा संपूर्ण अभ्यासक्रम ऑनलाईन पाहता येतो. पुढे काही महत्त्वाच्या विषयांचा अभ्यासक्रम देत आहोत…

सिव्हिल इंजिनीअरिंग (Civil Engineering) …

Engineering Mathematics, Structural Engineering, Geotechnical Engineering, Structural Engineering, etc.

सांख्यिकी (Statistics) …

Calculus, Probability, Linear Algebra, Inference, Stochastic Processes, Multivariate Analysis, Design of Experiments & Regression Analysis

बायोमेडिकल इंजिनीअरिंग (Bio-medical Engineering) …

Engineering Mathematics, Signals and Systems, Electrical Circuits, Measurements and Control Systems, Analog and Digital Electronics, Sensors and Bioinstrumentation, Measurements and Control Systems, Biomechanics, Human Anatomy and Physiology, Biomaterials, Medical Imaging Systems.

इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग (Electronics and Communication Engineering) …

Engineering Mathematics, Networks, Electronic Devices, Signals and Systems, Digital Circuits, Analog Circuits, etc.

केमिकल इंजिनीअरिंग (Chemical Engineering) …

Process Calculations and Thermodynamics, Engineering Mathematics, Fluid Mechanics and Mechanical Operations, etc.

इन्स्ट्रूमेंटेशन इंजिनीअरिंग (Instrumentation Engineering)…

Engineering Mathematics, Signals and Systems, Electrical Circuits, Control Systems, etc.

पेट्रोलियम इंजिनीअरिंग (Petroleum Engineering) …

Linear Algebra, Petroleum Formation Evaluation, Oil and Gas Well Testing, etc.

आर्किटेक्चर अ‍ॅण्ड प्लॅनिंग (Architecture and Planning) …

Architecture and Design, Construction and Management, Building Materials, Environmental Planning and Design, Building and Structure, etc.

गणित (Mathematics) …

Linear Algebra, Algebra, Complex Analysis, Functional Analysis, Real Analysis, Numerical Analysis, etc.
उत्तर लिहिले · 15/8/2020
कर्म · 14865
0

GATE (ग्रेजुएट एप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनीअरिंग) ही भारतातील अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि विज्ञान विषयातील पदव्युत्तर शिक्षण (Postgraduate) आणि डॉक्टरेट (Doctorate) स्तरावरील अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी तसेच काही सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये (Public Sector Companies) नोकरी मिळवण्यासाठी घेतली जाणारी राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा आहे.

GATE परीक्षेबद्दल सविस्तर माहिती:

GATE परीक्षा काय आहे?

  • GATE (ग्रेजुएट एप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनीअरिंग) ही राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा आहे.
  • अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि विज्ञान विषयातील पदव्युत्तर आणि डॉक्टरेट स्तरावरील अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी ही परीक्षा घेतली जाते.
  • काही सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये नोकरी मिळवण्यासाठी देखील GATE च्या गुणांचा वापर केला जातो.

GATE परीक्षा कोण आयोजित करते?

  • GATE परीक्षा IIT (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) आणि IISc (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स) यांच्यामार्फत संयुक्तपणे आयोजित केली जाते.
  • दरवर्षी परीक्षा आयोजित करण्याची जबाबदारी वेगवेगळ्या IITs कडे असते.

GATE परीक्षा कधी होते?

  • GATE परीक्षा साधारणपणे फेब्रुवारी महिन्यात आयोजित केली जाते.
  • परीक्षेची तारीख IIT च्या GATE समितीद्वारे निश्चित केली जाते.

परीक्षेचे स्वरूप काय असते?

  • GATE परीक्षा कंप्यूटर आधारित (Computer Based Test) असते.
  • प्रश्नपत्रिका बहुपर्यायी (Multiple Choice Questions) आणि न्यूमेरिकल आन्सर टाइप (Numerical Answer Type) प्रश्नांवर आधारित असते.
  • प्रश्नपत्रिका इंग्रजी भाषेत असते.
  • GATE परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग (Negative Marking) असते. त्यामुळे चुकीच्या उत्तरांसाठी गुण कमी केले जातात.

GATE परीक्षेचा अभ्यासक्रम काय असतो?

  • GATE परीक्षेचा अभ्यासक्रम पदवी स्तरावरील अभियांत्रिकी (Engineering), विज्ञान (Science) आणि कला (Arts) विषयांवर आधारित असतो.
  • प्रत्येक विषयानुसार अभ्यासक्रम वेगळा असतो.
  • अभ्यासक्रमाची माहिती GATE च्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असते.

GATE परीक्षेसाठी पात्रता काय असते?

  • GATE परीक्षेसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, विज्ञान, आर्किटेक्चर किंवा कला शाखेतील पदवीधर किंवा अंतिम वर्षाला असलेले विद्यार्थी पात्र असतात.

GATE परीक्षेचे फायदे काय आहेत?

  • IIT, NIT आणि इतर प्रतिष्ठित संस्थांमध्ये पदव्युत्तर शिक्षण आणि डॉक्टरेटसाठी प्रवेश मिळतो.
  • सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी मिळतात.
  • संशोधन (Research) क्षेत्रात काम करण्याची संधी मिळते.

महत्वाचे दुवे (Important links):

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 1760

Related Questions

BNS pdf मिळेल का?
स्वाध्याय लेखन प्रश्न. शालेय विद्यार्थ्यांना जीवनातील ताण तणावाचे व्यवस्थापन कसे करावे?
मगध नालंदा विद्यापीठ काय आहे?
वर्ग ३ री च्या मुलीचे डोमिसाईल काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे?
शालेय विद्यार्थ्यांनी जीवनातील ताणतणावाचे व्यवस्थापन कसे करावे?
जिल्हा परिषद शाळा चांगली की इंग्लिश शाळा चांगली?
इयत्ता दहावी, शास्त्रीय कारणे: सगळ्या पुस्तकांतील?