3 उत्तरे
3
answers
दारूचा शोध कुणी लावला?
2
Answer link
असं म्हटलं जातं की दारूची निर्मीती सुमारे ९ हजार वर्षांपूर्वी चीनमध्ये झाली. ही दारू म्हणजे वाईन आंबवलेल्या तांदळाचं पाणी आणि मधाची मिसळ असायची.
२ हजार वर्षांनंतर ही दारू युरोपीय देशातही निर्मीली जाऊ लागली. पुरातत्वीय उत्खननात इतक्या वर्षांनंचतर सुध्दा दारू बनवण्याचं साहित्य आणि दारूच्या साठ्यांसाठी बनवलेली विशेष भांडी सापडलीत.
अशाच काही प्रकारची उत्खनने युरोपीय देश, पश्चिम आशिया या ठिकाणी केली असता तिथेही दारूचं अस्तित्व असल्याचं जाणवतं. परंतु दारूची खरी सवय ही चीनने साऱ्या जगाला लावली.
इसवी सन पूर्व ७०००-६६०० मध्ये चीनमध्ये दारूची निर्मीती केली जायची याचे भक्कम पुरावे आपल्याला पहायला मिळतात.
तांदूळ,मध आणि टार्टारिक एसिड असणारी काही फळांचा वापर करून ही दारू बनवली जायची. जी तेव्हा घरातील सर्रास प्रत्येकजण प्राशन करत असे.
द्राक्षांच्या बीया, हॉथर्न, लाँगयान किंवा कॉर्लियान चेरी यांच मिश्रण अथवा या फळांपैकी कोणत्याही दोघांचं मिश्रण बनवून वाईन तयार केली जायची.
चीनच्या झोऊ डायनॅस्टी या प्रांतात इसवी सन पूर्व १०४६ ते २२१ या कालखंडात ही फळे वापरल्याचे पुरावे सापडतात. चीनमध्ये केवळ वाईनसाठीचे ४० ते५० प्रकारचे द्राक्ष वापरल्याचे पुरावे मिळतात.
इसवीसन ५४०० ते ५००० मध्ये पूर्वी आशियामध्ये दारू अस्तित्वात असल्याचे पुरावे मिळतात. दारूसाठी बनवलेले मोठे मोठे जार आजही अस्तित्वात आहेत.
युरोपीय देशात प्रामुख्याने ग्रीस आणि फ्रांसमध्ये सुमारे १० ते १२ हजार वर्षांपूर्वी दारू अस्तिवात असल्याच्या कथा आहेत मात्र केवळ इसवीसन पूर्व ४०००वर्षांपूर्वीचेच पुरावे इथे पाहायला मिळतात.
फ्रान्समध्ये प्रामुख्याने दारू ही द्राक्षांपासूनच बनवली जायची. त्यामुळे पुरावे जर पाहिले तर सगळ्यात आधी दारूडा देश कोणता होता तर चीन असं म्हणायला हरकत नाही.

मद्याचे जगातील बहुतांशी देशांमध्ये सेवन केले जात असले तरी प्रत्येक देशाचे मद्यसेवनाबाबत वेगळे कायदे आहेत. भारतासह अनेक देशांमध्ये मद्यपानाकरिता किमान १८ वर्षे वय असणे बंधनकारक आहे व बहुतांशी देशांमध्ये मद्यपान करून वाहन चालवणे हा कायदेशीर गुन्हा समजला जातो.
माफक मद्यपानामुळे आरोग्यावर परिणाम होत नसला तरी अतिमद्यपानामुळे जगात दरवर्षी लाखो लोक मृत्युमुखी पडतात.
दारूचे रासायनिक नाव इथेनॉल (ethanol) असे आहे.

0
Answer link
दारूचा शोध नेमका कुणी लावला हे निश्चितपणे सांगता येत नाही. कारण दारूचा इतिहास खूप जुना आहे आणि ती वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये स्वतंत्रपणे विकसित झाली.
पुरातत्वीय पुरावे:
- चीनमध्ये सुमारे 7000 BC पूर्वी तांदळापासून आणि फळांपासून बनवलेल्या मद्याचे अवशेष सापडले आहेत.
- इजिप्तमध्ये सुमारे 3150 BC पूर्वी द्राक्षांपासून बनवलेल्या वाईनचे पुरावे मिळाले आहेत.
- भारतात सुमारे 3000 BC पूर्वी 'सुरा' नावाचे मद्य बनवले जात होते, ज्याचा उल्लेख अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये आढळतो.
त्यामुळे, दारूचा शोध एका विशिष्ट व्यक्तीने लावला असे म्हणणे योग्य नाही. मानवाने फळे आणि धान्य किण्वन (fermentation) करून अनेक वर्षांपासून दारू बनवण्यास सुरुवात केली.
अधिक माहितीसाठी आपण खालील लिंक पाहू शकता: