व्यसन मंदिर अध्यात्म देव धर्म

विठ्ठलाच्या माळे विषयी जुन्या लोकांकडून सांगितले जाते ते खरे आहे की काल्पनिक आहे? म्हणजेच, माळकरी यांनी व्यसन करू नये किंवा मांसाहार करू नये, याबद्दल कृपया लवकर उत्तर द्या.

2 उत्तरे
2 answers

विठ्ठलाच्या माळे विषयी जुन्या लोकांकडून सांगितले जाते ते खरे आहे की काल्पनिक आहे? म्हणजेच, माळकरी यांनी व्यसन करू नये किंवा मांसाहार करू नये, याबद्दल कृपया लवकर उत्तर द्या.

10
हो. हे खरे आहे. काल्पनिक नाही. सर्व वनस्पतींमध्ये तुळस ही सार आहे . दागिन्यांमध्ये मंगळसूत्र   दुधामध्ये तूप  धातूमध्ये सोने ग्रंथामध्ये गीता तसे   वनस्पतींमध्ये तुळस. तुळस ही पवित्र माळ आहे. ही माळ गळ्यात असल्यावर मांसाहार  व  दारू ( मद्यपान ) करू नये. तुळस डोक्याला घेऊन झोपले की दमा होत नाही.  अंघोळ करताना तुळशीचे पाणी जरी अंगावरून गेले तरी अंग पवित्र होते . मनुष्य मेल्यावर मुखात तुळशीपत्र टाकल्याशिवाय त्याला उचलता येत नाही. कितीही पापी मनुष्य असला तरी मुखात तुळशीपत्र ठेऊन प्राणायाम केल्याने तो पापमुक्त होतो. चितेमध्ये एकतरी तुळशीचे काष्ठ ( लाकूड ) असेल तरी त्या मनुष्याला मुक्ती मिळते. इतकेच काय छत्रपती शिवाजी महाराजांच्या गळ्यात सुद्धा तुळशीमाळ होती. तुकाराम महाराज म्हणतात , कंठी मिरवा तुळशी ! व्रत करा एकादशी !! . तुळशवृंदावन घराच्या मध्यभागी असेल तर चारी दिशांनी येणाऱ्या वाईट शक्ती दूर राहतात. शिवाय भगवान श्री विष्णू यांची ही आवडती वनस्पती व माळ आहे. ज्या भक्ताच्या गळ्यात ही माळ असते त्यावर श्री विष्णू नेहमी प्रसन्न राहतात व त्यावर त्यांची अखंड कृपादृष्टी राहते.
उत्तर लिहिले · 4/8/2020
कर्म · 3045
0

विठ्ठलाच्या माळे विषयी जुन्या लोकांकडून ज्या गोष्टी सांगितल्या जातात, त्या बऱ्याच अंशी खऱ्या आहेत. विशेषतः माळकरी लोकांबद्दल काही नियम आणि पथ्ये आहेत, ज्यांचे पालन करणे अपेक्षित असते. यात प्रामुख्याने व्यसन आणि मांसाहार टाळण्याचा नियम आहे.

माळकरी लोकांबद्दल काही मान्यता आणि नियम:
  • व्यसन न करणे: माळकरी व्यक्तीने कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नये, जसे की धूम्रपान, मद्यपान किंवा इतर नशा करणे.
  • मांसाहार टाळणे: माळकरी व्यक्तीने मांसाहार पूर्णपणे टाळावा, कारण विठ्ठल भक्तीमध्ये शुद्धता आणि सात्विकतेला महत्त्व आहे.
  • सदाचार: माळकरी व्यक्तीने सदाचारी जीवन जगावे, खोटे बोलणे टाळावे आणि इतरांना मदत करावी.
  • एकादशीचे व्रत: माळकरी व्यक्तीने एकादशीचे व्रत नियमितपणे करावे.
  • विठ्ठलाचे नामस्मरण: माळकरी व्यक्तीने नेहमी विठ्ठलाचे नामस्मरण करत राहावे.

हे नियम आणि मान्यता अनेक वर्षांपासून चालत आलेल्या परंपरेचा भाग आहेत. त्यांचे पालन करणे हे माळकरी लोकांच्या श्रद्धेचा आणि भक्तीचा एक भाग आहे. त्यामुळे, जुन्या लोकांकडून सांगितल्या जाणाऱ्या गोष्टी बऱ्याच अंशी सत्य आहेत.

अधिक माहितीसाठी, तुम्ही खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

  1. मराठी विश्वकोश
  2. महाराष्ट्र टाइम्स

आशा आहे की, या उत्तराने तुम्हाला मदत होईल.

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 2200

Related Questions

आदिनाथ देवा बद्दल माहिती द्या?
श्री देव वाघोबा, सुकाई, चनकाई, इनाई, खामजाई, झोलाई, मानाई, काळकाई देवांची माहिती द्या?
पूर्वजांनी इष्टलिंग धारण केले होते, मराठा असून सुद्धा परंतु नंतर त्यांनी ते काढून ठेवले, तर तसे चालते का? रोटी बेटी व्यवहारासाठी आणि मांस मच्छी चालू करण्यासाठी काढले होते का?
पूर्वजांनी इष्टलिंग धारण केले होते, मराठा असून सुद्धा परंतु नंतर त्यांनी ते काढून ठेवले, तर तसे चालते का?
आई महाकाली सुकाई वरदायनी देवी मंदिर कोठे आहे?
जाधवांचे देवाक कोणते आहे?
जाधवांचे दैवत कोणते आहे?