औषधे आणि आरोग्य
घरगुती उपाय
पाळीव प्राणी
उपचार
पशुसंवर्धन
आरोग्य
शेळी पातळ संडास करत आहे, त्यासाठी काही घरगुती उपाय आहे का?
2 उत्तरे
2
answers
शेळी पातळ संडास करत आहे, त्यासाठी काही घरगुती उपाय आहे का?
3
Answer link
शेळ्यांमधील हगवण हा आजार नाही. वेगवेगळे रोग, खाद्यातील बदल, अशुद्ध पाण्यामुळे हगवण होते. यामध्ये लेंढी न पडता दुर्गंधीयुक्त पातळ संडास होते. कोलायबॅसिलॉसिस (Colibacillosis), पॅराटाइफॉइड (Paratyphoid), कॉक्सिडीअाॅसीस (Coccidiosis), जंताचा प्रादुर्भाव अाणि विषारी वनस्पती खाल्ल्यामुळे तसेच पी.पी.आर. व आंत्रविषार या रोगांमुळे शेळ्यांना हगवणीचा त्रास होतो.
कोलायबॅसिलॉसिस : यामुळे दोन आठवड्यापर्यंतची करडांना हगवण लागते.
जी करडे जन्मानंतर चीक पीत नाहीत अशी करडे अशक्त राहतात. यामुळे आजारास बळी पडतात.
गोठ्यातील अस्वच्छता,अस्वच्छ पाणी व खाद्यामुळे.
दुसरा अाजार झालेली करडे.
गोठ्यातील गर्दी व प्रवासातील ने-आण यामुळे ताण वाढतो.
मुख्य लक्षणे :
पिवळसर-पांढरट पातळ संडास.
नाळेच्या ठिकाणी लालसर व सुजलेले दिसते.
मागचे पाय संडासामुळे खराब होतात. शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे करडे मरतात.
उपाय :
पशूवैद्यकाच्या सल्ल्याने प्रतिजैवकांचा योग्य वापर.
करडांना भरपूर मीठ-साखरेचे पाणी पाजावे.
पॅराटाइफॉइड सालमोनेलॉसिस : यामध्ये १-२ वर्षांच्या शेळ्यांना हगवण लागते.
कारणे :
गोठ्यातील गर्दी व अनावश्यक ने-आण.
खाद्यातील अचानक बदल.
कत्तलखाना किंवा मोठ्या बाजारपेठेत विकत घेतलेल्या शेळ्यांमध्ये प्रादुर्भाव अढळतो.
लक्षणे :
ताप येतो व शेळ्यांचे खाणे पिणे बंद होते.
पातळ, हिरवट संडास होते.संडासमध्ये काही वेळा रक्त दिसते.
८-१५ दिवसांत शरीरातील पाणी कमी होऊन शेळ्या मरतात किंवा खूपच अशक्त होतात.
गाभण शेळ्या गाभडण्याची शक्यता असते.
उपचार :
पशुवैद्यकाच्या साह्याने योग्य प्रतिजैवकाचा वापर करावा.
भरपूर पाणी व मीठ, साखर मिसळून द्यावी.
कॉक्सिडीअाॅसीस : हा आजार गोठ्यामध्ये ठेवलेल्या तणावग्रस्त शेळ्यांना होतो. शक्यतो लहान करडे (२-८ आठवडे) यास बळी पडतात.
कारणे :
गोठ्यातील गर्दी, अस्वच्छता, खाद्यामधील अचानक बदल.
गोठ्यामध्ये आजारी शेळ्या दुसऱ्या ठिकाणाहून आणणे.
करडांना व्यवस्थित दूध न मिळणे.
उपचार :
तज्ज्ञ पशुवैद्यकाच्या सल्ल्याने प्रतिजैवकाचे उपचार.
शेळ्यांच्या विष्ठेची चाचणी करून रोगाची निश्चिती करावी.
आंत्रविषार :
हा रोग जीवाणूमुळे होते, मरतूक मोठ्या प्रमाणात होते.
रोगाला करडे जास्त प्रमाणात बळी पडतात.
कारणे :
करडांनी जास्त प्रमाणात दूध, नवीन चारा व धान्य खाल्ल्यास.
शेळ्यांची भूक मंदावते. पोटाला लाथा मारतात. पाण्यासारखी पातळ किंवा रक्तमिश्रित संडास होते.
उपचार :
आजार होऊच नये म्हणून आंत्रविषार रोगाविरुद्ध लसीकरण आजारी नसणाऱ्या शेळ्यांना करावे.
आजारी शेळ्यांना पशुवैद्यकाच्या सल्ल्याने उपचार करावे.
पी. पी. आर : हा विषाणूजन्य रोग आहे. लहान करडे व मोठ्या शेळ्या दोन्हीमध्ये होऊ शकतो.
कारणे :
सर्दी व विष्ठेमधून एका शेळीपासून दुसऱ्या शेळीला प्रादुर्भाव होतो.
लक्षणे :
१०५ ते १६० अंश सेल्सिअस ताप येतो.
प्रथम शेळ्यांमध्ये खूप सर्दी होते. श्वासाचा वास येतो.
पातळ संडास होते. संडासला वास येतो.
उपचार :
पशूवैद्यकाच्या सल्ल्याने तात्काळ उपचार सुरू करावेत.
शेळ्यांना (आजारी नसलेल्या) लसीकरण करावे.
हगवण टाळण्यासाठी उपाय :
गोठ्यामध्ये स्वच्छता व जमीन कोरडी ठेवावी.
खराब चारा देणे टाळावे.
आवश्यक आजाराच्या नियंत्रणासाठी वेळेवर लसीकरण करावे.
८० टक्के हागवण दूषित पाणी अाणि खाद्यामुळे होतो. त्यामुळे पाणी अाणि खाद्य स्वच्छ राहील याची खात्री करावी.
आजारी शेळ्या वेगळ्या ठेवाव्यात.
जास्त आजारी शेळ्यांना सावलीत ठेवावे, स्वच्छ खाद्य व पाणी द्यावे.
हगवण लागलेल्या शेळ्यांना तज्ज्ञांच्या सल्ल्याने मीठ, साखरेचे पाणी जास्तीत जास्त द्यावे.
शेळ्यांचा मागचा भाग गरम पाण्याने धुऊन स्वच्छ व कोरडा करावा.
हगवणीचे कारण कळण्यासाठी विष्ठा प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावी व योग्य कारण शोधून तज्ज्ञ पशुवैद्यकाच्या सल्ल्याने उपचार सुरू करावे.
हगवणीमुळे शरीरातील पाणी कमी होते व शरीरप्रक्रियावर परिणाम होतो. मीठ, साखरेचे पाणी घरच्या घरी बनवावे.
उदा. : द्रावण - १
२ चमचे ग्लुकोज, २ चमचे मीठ, २ चमचे खाण्याचा सोडा, २ चमचे लिंबाचा रस २ लिटर पाण्यामध्ये मिसळून आजारी शेळ्यांना द्यावे.
द्रावण - २
अर्धा चमचा मीठ, ४ मोठे चमचे साखर किंवा मध १ लिटर पाण्यात मिसळावे.

0
Answer link
शेळीला पातळ संडास होत असल्यास काही घरगुती उपाय:
- ओआरएस (ORS) द्या: मानवासाठी तयार केलेले ओआरएस (Oral Rehydration Solution) शेळीला दिल्याने तिच्या शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन राखण्यास मदत होते.
- जिवाणूजन्य औषधे (Probiotics): दही किंवा ताक यांसारख्या पदार्थांमध्ये नैसर्गिकरित्या प्रोबायोटिक्स असतात, जे शेळीच्या आतड्यांतील चांगले बॅक्टेरिया वाढवण्यास मदत करतात आणि पचनक्रिया सुधारतात.
- लिंबू पाणी: लिंबू पाण्यामध्ये असलेले ॲसिडिक गुणधर्म पातळ संडास थांबवण्यास मदत करतात.
- इतर उपाय:
- शेळीला स्वच्छ पाणी भरपूर प्रमाणात द्या.
- तीव्र जुलाब झाल्यास पशुवैद्यकाचा सल्ला घ्या.
टीप: हे उपाय केवळ प्राथमिक उपचार आहेत. शेळीची तब्येत जास्त खराब असल्यास त्वरित पशुवैद्यकाचा सल्ला घ्या.
Disclaimer: या उपायांनी आराम न मिळाल्यास, कृपया पशुवैद्यकाचा सल्ला घ्या.