प्रवास क्रीडा शिक्षण सायकलिंग

सायकल शिकताना कोणकोणते अनुभव येतात?

3 उत्तरे
3 answers

सायकल शिकताना कोणकोणते अनुभव येतात?

4
         आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सगळ्यांचा कधीनकधी सायकलशी नक्की संबंध आला असेल. मी लहान असताना 3 रुपये प्रतितास या हिशोबाने सायकल भाड्याने भेटत होती. तेव्हा मी तिसरी मध्ये होतो . मी आणि माझे मित्र आम्ही सगळे मिळून भाड्याने सायकल आणायचो आम्ही सगळे स्वतःहून सायकल चालवायला शिकलो होतो.

     जेव्हा पण सायकल आणलेली असायची अस वाटायचं की हा तास संपलाच नाही पाहिजे जेव्हा वेळ होत यायची तेव्हा सायकल परत द्यायला जाताना आम्हा सगळ्यांची शर्यत लागायची खूप मज्जा यायची ते पण काही दिवस होते. नंतर 6 वी ला गेल्यावर मला माझ्या भावाची सायकल मला भेटली जी अजून पण माझ्याकडे आहे.

       नंतर शाळा क्लास कॉलेज या सगळ्या मध्ये सायकलने मला खूप साथ दिली आहे. सायकल वर पावसात फिरणे जोरात पळवने कधी कधी stunt करणे double seat फिरवणे त्याच्यावर समान आणणे हे सगळे अनुभव तिच्याशी निगडित आहेत. सायकल मुळे व्यायाम पण चांगला होत असे. ती माझ्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग झाली आहे कारण तिच्या बरोबर मी खूप वेळ घालवला आहे. अजून पण तिला पुसणे सणाला पूजा करणे यात वेगळाच आनंद असतो.

      आत्ताच्या घडीला सायकल शोक म्हणून बघतात पार 30-४0 हजारा पर्यंत सायकल विकत घेतात पण त्यांना आमच्या सायकलची सर कधीच नाही येणार. सगळे आता गाड्या वापरणं पसंद करतात अगदी शाळेत असलेल्या मुलांकडे पण आता गाड्या आहेत त्यांना सायकल वापरण्यात लाज वाटते. त्यामुळे सायकल आता बऱ्याच प्रमाणामध्ये कमी झाल्या आहेत याची खंत वाटते.
उत्तर लिहिले · 29/6/2020
कर्म · 7975
0
मी जेव्हा सायकल शिकत होतो तेव्हा माझे पाय जमिनीवर टेकत नव्हते. त्यामुळे मी सारखे पडायचो. नंतर हळुहळु जमायला लागले, तसेच गर्दीमध्ये खूप भीती वाटायची. पण नंतर सर्व जमायला लागले.
उत्तर लिहिले · 18/6/2020
कर्म · 18385
0

सायकल शिकताना येणारे काही अनुभव:

  • पडणे आणि खरचटणे: सायकल शिकताना पडणे हे अगदी सामान्य आहे. त्यामुळे गुडघे, कोपर आणि हाताला खरचटण्याची शक्यता असते.
  • balance साधण्याचा प्रयत्न: सुरुवातीला सायकलचा balance साधणे खूप कठीण जाते.handle नीट पकडून स्वतःला स्थिर ठेवणे हे एक मोठे आव्हान असते.
  • धैर्य आणि आत्मविश्वास: सायकल शिकताना अनेकवेळा प्रयत्न करूनही अपयश येते, त्यामुळे खचून न जाता पुन्हा प्रयत्न करत राहणे महत्त्वाचे आहे. हळूहळू आत्मविश्वास वाढतो.
  • एकाग्रता: सायकल चालवताना रस्त्यावर आणि आपल्या balance वर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.
  • आनंद: एकदा सायकल शिकल्यानंतर, ती चालवण्याचा अनुभव खूप आनंददायी असतो.
  • नवीन गोष्टी शिकण्याचा अनुभव: सायकल शिकणे ही एक नवीन गोष्ट शिकण्याची प्रक्रिया आहे. त्यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि काहीतरी नवीन केल्याचा आनंद मिळतो.

हे काही सामान्य अनुभव आहेत जे सायकल शिकताना येऊ शकतात. प्रत्येक व्यक्तीचा अनुभव वेगळा असू शकतो.

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 1020

Related Questions

सायकल वापरण्याचे विविध फायदे कोणते आहेत?
मुले सायकल का वापरतात?
सायकल चालविण्याचे सामूहिक फायदे काय आहेत?
मी आहे ना सायकल चालवू?
सायकल विषयी माहिती सांगा?
सायकलची गरज व उपयोग काय आहेत?
माझ्या सायकलला लहान टायर आहेत, त्या जागी मी जास्त रुंदीचे टायर बसवू शकतो का? त्यासाठी मला काय काय बदल करावे लागतील?