Topic icon

सायकलिंग

3
सायकल वापरण्याचे विविध फायदे
हृदय: नियमित सायकल चालवल्याने शरीरातील रक्ताभिसरण चांगले होते. त्यामुळे आपले हृदय मजबूत होते. तुम्ही जर आठवड्यातील ६ दिवस २० मिनिटे दररोज सायकल चालवली तर तुम्हाला हृदयविकार होण्याचा धोका ५० टक्क्यांनी कमी होतो. झोप: ज्या लोकांना निद्रानाशाचा त्रास आहे.





सायकल नियमित चालवा, आरोग्यदायी फायदे 
   
आपल्यापैकी अनेक जण आरोग्यादायी जीवनासाठी धडपडत असतात. पण...



आपल्यापैकी अनेक जण आरोग्यादायी जीवनासाठी धडपडत असतात. पण, तुम्हाला माहिती आहे का, अगदी छोट्या छोट्या गोषींतूनही तुम्ही आरोग्यदायी जीवन जगू शकता. जसे की, सायकल चालवणे. तुम्ही जर नियमितपणे सायकल चालवत असाल तर, तुम्ही मिळवू शकता आरोग्यदाई भरपूर फायदे. जाणून घ्या सायकल चालवण्याचे फायदे.



हृदय: नियमित सायकल चालवल्याने शरीरातील रक्ताभिसरण चांगले होते. त्यामुळे आपले हृदय मजबूत होते. तुम्ही जर आठवड्यातील ६ दिवस २० मिनिटे दररोज सायकल चालवली तर तुम्हाला हृदयविकार होण्याचा धोका ५० टक्क्यांनी कमी होतो.


झोप: ज्या लोकांना निद्रानाशाचा त्रास आहे. त्यांच्यासाठी सायकलींग हा एक उत्कृष्ठ उपाय आणि व्यायामही आहे. शरीरातील कोर्डिसोल हॉर्मोन्सची मात्रा वाढणे हे निद्रानाशाचे प्रमुख कारण आहे. सायकलींगमुळे यावर प्रचंड परिणाम होतो.


कॅन्सर : फर्निश संशोधकांच्या अभ्यासानुसार नियमितपणे ३० मिनिटे सायकल चालवणाऱ्या लोकांमध्ये कॅन्सर होण्याचे प्रमाण ५० टक्क्यांनी घटते.


लठ्ठपणा: जर तुमचे वजन वाढत असेल. तर तुम्ही नियमितपणे सायकल चालवा फायदा होईल.



गर्भावस्था: गरोदर स्त्रीने गर्भावस्तेच्या अगदी सुरूवातीच्या काळात जर सायकल चालवली तर चांगला व्यायम होतो. त्यामुळे प्रसुतीकाळात होणारा त्रास कमी होतो.


बुद्धी: नियमित सायकल चालवल्याने शरीराला व्यायम मिळतो पण, आपल्या विचारांनाही चालना मिळते. त्यामुळे मन आणि बुद्धी स्थिर राहते. विचारांच्या कक्षा रूंदावतात. बुद्धी वाढते असा दावा संशोधक करतात.


रोगप्रतिकारक क्षमता: सायकल चालवल्याने शरीराच्या विविध अवयवांना व्यायाम मिळतो. याचा फायदा आरोग्याला होऊन रोगप्रतिकारक क्षमता वाढते.




उत्तर लिहिले · 25/11/2022
कर्म · 53720
0
मुलांना सायकल चालवायची असते, त्यामुळे
उत्तर लिहिले · 11/7/2021
कर्म · 10
0
सायकल चालविण्याचे फायदे 1. प्रदूषण होत नाही. 2. इंधनाची बचत होते. 3. व्यायाम होतो.
उत्तर लिहिले · 19/6/2021
कर्म · 25850
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0

होय, नक्कीच! तुम्ही सायकल चालवू शकता. सायकल चालवणे एक चांगला व्यायाम आहे आणि ते पर्यावरणासाठी देखील चांगले आहे.

सायकल चालवण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे:

  • तुमच्या सायकलची तपासणी करा: सायकल चालवण्यापूर्वी ब्रेक, टायर आणि चेन व्यवस्थित तपासा.
  • हेल्मेट घाला: सायकल चालवताना हेल्मेट घालणे खूप महत्वाचे आहे, कारण ते तुम्हाला अपघातांपासून वाचवते.
  • नियमांचे पालन करा: रस्त्यावर सायकल चालवताना वाहतूक नियमांचे पालन करा.
  • सुरक्षित ठिकाणी सायकल चालवा: सायकल चालवण्यासाठी सुरक्षित जागा निवडा, जसे की सायकल लेन किंवा कमी रहदारी असलेला रस्ता.

तुम्ही सायकल चालवण्याचा आनंद घ्याल अशी आशा आहे!

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 1020
4
         आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सगळ्यांचा कधीनकधी सायकलशी नक्की संबंध आला असेल. मी लहान असताना 3 रुपये प्रतितास या हिशोबाने सायकल भाड्याने भेटत होती. तेव्हा मी तिसरी मध्ये होतो . मी आणि माझे मित्र आम्ही सगळे मिळून भाड्याने सायकल आणायचो आम्ही सगळे स्वतःहून सायकल चालवायला शिकलो होतो.

     जेव्हा पण सायकल आणलेली असायची अस वाटायचं की हा तास संपलाच नाही पाहिजे जेव्हा वेळ होत यायची तेव्हा सायकल परत द्यायला जाताना आम्हा सगळ्यांची शर्यत लागायची खूप मज्जा यायची ते पण काही दिवस होते. नंतर 6 वी ला गेल्यावर मला माझ्या भावाची सायकल मला भेटली जी अजून पण माझ्याकडे आहे.

       नंतर शाळा क्लास कॉलेज या सगळ्या मध्ये सायकलने मला खूप साथ दिली आहे. सायकल वर पावसात फिरणे जोरात पळवने कधी कधी stunt करणे double seat फिरवणे त्याच्यावर समान आणणे हे सगळे अनुभव तिच्याशी निगडित आहेत. सायकल मुळे व्यायाम पण चांगला होत असे. ती माझ्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग झाली आहे कारण तिच्या बरोबर मी खूप वेळ घालवला आहे. अजून पण तिला पुसणे सणाला पूजा करणे यात वेगळाच आनंद असतो.

      आत्ताच्या घडीला सायकल शोक म्हणून बघतात पार 30-४0 हजारा पर्यंत सायकल विकत घेतात पण त्यांना आमच्या सायकलची सर कधीच नाही येणार. सगळे आता गाड्या वापरणं पसंद करतात अगदी शाळेत असलेल्या मुलांकडे पण आता गाड्या आहेत त्यांना सायकल वापरण्यात लाज वाटते. त्यामुळे सायकल आता बऱ्याच प्रमाणामध्ये कमी झाल्या आहेत याची खंत वाटते.
उत्तर लिहिले · 29/6/2020
कर्म · 7975
4


​ शारीरिक शक्तीने चालविले जाणारे दोन चाकी वाहन म्हणजे सायकल.अनेक ठिकाणी हे वाहतुकीचे, व्यायामाचे आणि खेळाचे मुख्य व स्वस्त साधन आहे. हे साधन तीन तसेच चार चाकी ही असु शकते.  सहसा सायकल पायांनी चालविता येणारी व लोखंडी फ्रेम असणारी असते. यात दोन प्रकार मोडतात.सायकल चालवल्याने होणारे प्रदूषण कमी प्रमाणात होईल.जास्तीत जास्त लोकांनी सायकल चालवणे पर्यावरणासाठी व वैयक्तिक आरोग्यासाठीसुद्धा उत्तम आहे.सध्या या धावपळीच्या जीवनात सायकलला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे.आधुनिक जीवनशैलीमध्ये सायकलिंग चे महत्व वाढलेले आहे.सायकल लहानांपासून ते वृद्ध व्यक्ती चालऊ शकतात.सायकल उत्पादनासाठी पंजाब,हरियाना ही राज्ये अग्रेसर आहेत.

पहिली सायकल १८१६ मध्ये पेरीस मधील एका कारागीरणे केला .मोटारसायकल चालवणया पेक्षा आपण सायकल चालवायला पाहिजे जेनेकरुण प्रदुषण होणार नाही
उत्तर लिहिले · 3/2/2020
कर्म · 34235