2 उत्तरे
2
answers
आर्यभट्ट बद्दल माहिती द्या?
3
Answer link
भारतीय खगोलशास्त्रज्ञ आर्यभट्ट यांचा जन्म.आर्यभट हा भारताचा महान खगोलविद होता, खगोलीय गणिती होता, खगोलशास्त्राचा प्रणेता होता. आर्यभटाचा जन्म शके ३९८ ( इ. स. ४७६ ) मध्ये पाटलीपुत्र येथे झाला. त्याचे बालपण व उर्वरित आयुष्यकाल ह्याच नगरीत व्यतीत झाला. खगोल शास्त्रज्ञ म्हणून आर्यभटाचे कर्तृत्व असामान्य आहे._*
इतर भारतीय पंडित स्वतःच्या जन्माविषयीफारसे लिहित नाहीत पण आर्यभट्ट स्वतःच त्याच्या एका श्लोकात त्याच्या जन्माविषयी कालक्रियापाद या ग्रंथात लिहितो_*
*"षष्टयब्दानां षष्टिर्यदा व्यतिताः त्रयश्च युगपादाः*
*त्र्यधिका विशंति अब्दः तदेह जन्मनः अतीता"*
▪अर्थ:- जेव्हा ६० वर्शान्ची ६० आवर्तने (म्हणजे ३६००वर्षे )व तीन युगपाद सरले (अर्थात कृत,त्रेता आणि द्वापार युग सरली आणि कलयुग सुरु झाले) त्यावेळी माझ्या जन्मानंतर २३ वर्षे उलटली होती.
*स्पष्टीकरण:-*
म्हणजे ३६०० वर्षे ही आर्यभट्ट २३ वर्षांचा असताना सरलेली आहेत. भारतीय खगोलशास्त्रानुसार कलियुगाचा प्रारंभ ई स पु १८ फेब्रु ३१०२ रोजी झाला आहे. इसपू चे वर्ष काढण्यास त्यात शालिवाहन शकानुसार ७७ वर्षे मिळवावी लागतात म्हणजे ३१०२+७७=३१७९
म्हणजे कलयुगाचा प्रारंभ ३१७९ मधे झाला. त्यावेळी शालिवाहन शक ही कालगणना प्रचलित होती हे लक्षात घ्या.
इस पू ३१७९ म्हणजे ३६००-३१७९=शालिवाहन शके ४२१,शालिवाहन शके ४२१ म्हणजे इस ४२१+७८=४९९
यावर्षी आर्यभट्ट २३ वर्षांचे होते म्हणून त्यांचे जन्मसाल ४९९-२३=४७६ इतके मिळते. त्याच वर्षी बुधगुप्त या गुप्त घराण्यातील साम्राटाला पाटलिपुत्र येथे अभिषेक झाला.
आज उपलब्ध असलेल्या भारतीय खगोलशास्त्रीयग्रंथात पहिल्या आर्यभटाच्या 'आर्यभटीय' किंवा 'आर्यसिद्धांत' ह्या ग्रंथाहून दुसरा प्राचीन ग्रंथ नाही. 'आर्यभटीय' हे नाव त्याला आर्यभटानेच दिले आहे. आर्यभटाने 'आर्यभटीय' ग्रंथाची रचना वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी केली. यावरून त्याच्या कुशल बुद्धिमत्तेची व प्रतिभेची कल्पना येऊ शकेल. आर्यभटीय ग्रंथ संक्षिप्त असला तरी त्याची रचनापद्धती अत्यंत सुसंबद्ध व शास्त्रीय असून त्याची भाषा अत्यंत सुस्पष्ट व अचूक आहे. आर्यभटाचे सिद्धांत प्रत्यक्षात अनुभवास येतात काय? ह्या प्रश्नाचे उत्तर होय असेच द्यावे लागते. दृक्प्रत्ययावरून देखिल आर्यभटाची योग्यता फार मोठी आहे ते पटते.
आर्यभटाच्या संदर्भात आणखी एक गोष्ट वैशिष्ट्यपूर्ण गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे. वृत्ताचा व्यास व परिघ ह्यांचे गुणोत्तर [ π ] ह्या अक्षराने दर्शवितात. त्याची किंमत पूर्णपणे व्यक्त कर्ता येत नाही. ती अंदाजे ३. १४१६ अथवा २२/७ असे आपण म्हणतो. आर्यभट ची किंमत ६२८३२/२००० एवढी देतो. म्हणजे आर्यभटाने ती ३.१४१६ एवढी सूक्ष्म दिलेली आहे. गणितपादात त्याने २००० व्यासाचा परिघ ६२८३२ सांगितला आहे व तो ही त्याच्या मते जवळजवळ असा आहे. आर्यभट्टाने वर्तुळाचा परिघ व व्यास यांचे गुणोत्तर अर्थात π ची किंमत सुद्धा सांगितली आहे त्याच्या श्लोकात-----
"चतुराधिकं शतमश्टगुणं द्वाषष्टिस्तथा सहस्त्राणाम्
अयुतद्वयविष्कंभस्यासन्नो वृत्तपरिणाह"
शब्दार्थ:-
अयुत - १००००
अयुतद्वय =२००००
द्वासष्टी सहस्त्राणाम् = ६२०००
विष्कंभस्य - व्यासाच्या
आसन्न -जवळपास
वृत्तपरिणाह - परिघ
चतुराधिकं शतम् --१०४
अष्टम -८
तथा - मिळवा
गुणम्-गुणिले
१०४×८+६२०००=६२८३२
६२८३२÷२००००=३.१४१६
तसेच आर्यभट्ट या किंमतीला "आसन्न" म्हणजे जवळपास म्हणतो याचा अर्थ त्यानेही ही किंमत अचूक आहे असे म्हटलेले नाही आणि त्याला π ही संख्या अपरिमेय आहे हे माहीत होते हे विशेष...
आर्यभटाला पृथ्वीच्या दैनंदिन गतीची कल्पना होती. पृथ्वी स्थिर नसून ती परिवलन करते ही कल्पना पाश्चात्यांना उशिरा आली. आर्यभटाने गोलपाद अध्यायात ह्या कल्पनेचे स्पष्टीकरण एका सुंदर उदाहरणाद्वारे केले आहे ते असे :
अनुलोमगतीनौंस्थः पश्चत्यचलं विलोमगं यद्वत ।
अचलानि भानी तद्वत्समपश्चिमगानि लङ्कायाम ॥
'नदीच्या प्रवाहाच्या दिशेने जाणार्या नावेवरील माणसास ज्याप्रमाणे काठावरील डोंगर, टेकडी किंवा स्थिर वस्तू प्रवाहाच्या उलट दिशेने मागे जात आहेत असे वाटते. त्याचप्रमाणे लंकेतील ( विषुववृत्तावरील ) मनुष्यास नक्षत्रे स्थिर असूनही पूर्वेकडून पश्चिमेकडे सारख्याच गतीने जात आहेत असे वाटते. '
आर्यभटाने पृथ्वीचा आकार गोल आहे ह्याचे विवेचन पुढीलप्रमाणे केले आहे.
वृत्तभञ्जरमध्ये कक्ष्या परिवेष्टित: खगमध्यगतः ।
मृञ्जलशिखिवायुमयो भूगोलः सर्वतो वृत्तः ॥
'वर्तुळाकार अशा, नक्षत्रांच्या पिंजर्यात ( म्हणजेच नक्षत्रांनी बनलेल्या खगोलाच्या ) मध्यभागी, ( ग्रहांच्या ) कक्षांनी परिवेष्टित अशी पृथ्वी आकाशमध्यावर आहे. तसेच माती, पाणी, तेज व वायू यांनी बनलेला हा भूगोल ( पृथ्वीरूपी गोल ) सर्व बाजूंनी गोल आहे. '
▪आर्यभट्टाने दिलेले वर्तुळाचे क्षेत्रफळाचे सूत्र
समपरिणाहस्यार्ध विष्कंभार्धहात्मेव वृत्तफलम
समपरिणाह - परिघाचे
अर्धम - अर्धे
विष्कंभ - व्यास
हतम् - गुणाकार
वृत्तफलम् - वर्तुळाचे क्षेत्रफळ
आर्यभट्ट म्हणतो परिघ आणि व्यासाचा अर्ध यांचा गुणाकार केला अस्ता निश्चित वर्तुळाचे क्षेत्रफळ मिळते
वर्तुळाचे क्षेत्रफळ - १/२ परिघ × १/२ व्यास
= १/४ परिघ × व्यास
परिघ = २πR
व्यास =२R
= १/४ × (२πR) × (२R)
=π×R×R
_________
आर्यभटाने हजार वर्षापूर्वी प्रतिपादन केलेले काही सिद्धांत आज आपणास चुकीचे वाटतीलही, परंतु त्याची योग्यता फार मोठी होती हे मान्य करावेच लागेल. आर्यभटापूर्वी अस्तित्वात असलेले खगोलशास्त्रीय सिद्धांत टाकाऊ झाले होते. त्या सिद्धान्तानुसार केलेले गणित व प्रत्यक्ष निरीक्षण ह्यांच्यात मेळ बसत नव्हता. आर्यभटाने गणित व खगोलशास्त्र ह्याच्यात मेळ घालण्याचा प्रयत्न केला.भारतीय गणित व खगोलशास्त्र ह्यांचा आद्य प्रणेता अस वर्णन आर्यभटाचे करावे लागेल. म्हणूनच आपल्या पहिल्या कृत्रिम उपग्रहाचे नाव होते 'आर्यभट'! प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने ताठ व्हावी अशी ही घटना!
https://m.facebook.com/story.php?story_fbid=513347652396496&id=100011637976439
संदर्भ :- मोहन आपटे यांचे "आर्यभटीय"
फोटोसाठी साभार
https://goo.gl/images/8rqMnA
https://goo.gl/images/nzmkli
https://goo.gl/images/3Zz36u
https://goo.gl/images/b9rllF
https://goo.gl/images/9jKQE5
https://goo.gl/images/DJUuMj
https://goo.gl/images/DtQv11
https://goo.gl/images/1Y50EY
https://goo.gl/images/TzaVcl
____________________________
*ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
_*📣 माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव*_
*🇹🇭🇸🇷🇹🇭🇸🇷🇹🇭🇸🇷🇹🇭🇸🇷🇹🇭*

0
Answer link
आर्यभट्ट
आर्यभट्ट हे प्राचीन भारतातील एक महान गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ आणि ज्योतिषी होते.
त्यांचा जन्म ४७६ इ.स. मध्ये कुसुमपूर ( Patliputra ) येथे झाला.
आर्यभट्टांनी गणित आणि खगोलशास्त्रात मोलाची भर घातली.
आर्यभट्टांचे कार्य:
- आर्यभट्टीय: हा त्यांच्या कार्याचा मुख्य ग्रंथ आहे. यात गणित, खगोलशास्त्र आणि त्रिकोणमिती विषयी माहिती आहे.
- शून्याचा शोध: शून्याचा उपयोग त्यांनी आपल्या गणितामध्ये केला, ज्यामुळे आकडेमोड करणे सोपे झाले.
- π (pi) ची किंमत: त्यांनी π (pi) ची किंमत 3.1416 असल्याचे सांगितले, जी आधुनिक मूल्याच्या जवळ आहे.
- पृथ्वी गोल आहे: आर्यभट्टांनी सांगितले की पृथ्वी गोल आहे आणि ती स्वतःभोवती फिरते.
- ग्रह आणि तारे: ग्रह आणि तारे सूर्याभोवती फिरतात हे त्यांनी सांगितले.
आर्यभट्टांचे योगदान:
आर्यभट्टांनी गणित आणि खगोलशास्त्राच्या क्षेत्रात मोठे योगदान दिले. त्यांच्या कार्यामुळे भारतीय विज्ञान आणि गणिताला नवी दिशा मिळाली.
त्यांच्या সম্মানে भारताच्या पहिल्या कृত্রিম उपग्रहाला ‘आर्यभट्ट’ हे नाव देण्यात आले.
अधिक माहितीसाठी: आपण विकिपीडिया (https://mr.wikipedia.org/wiki/आर्यभट्ट) येथे भेट देऊ शकता.