शिवाजी महाराज जिल्हा राज्यशास्त्र इतिहास

फलटण संस्थानाबद्दल माहिती सांगा?

2 उत्तरे
2 answers

फलटण संस्थानाबद्दल माहिती सांगा?

3
फलटण हे सातारा जिल्ह्यातील  एक तालुका व शहर आहे. फलटण शब्दाची उत्पत्ती फल उत्तन (अर्थात फळबागांचा प्रदेश) अशी असावी, असे म्हटले जाते.
धारच्या परमार रांजावर दिल्लीच्या सुलतानांनीं पुन्हां पुन्हां हल्ले केले, त्या धामधुमींत निंबराज परमार नांवाचा एक पुरुष दक्षिणेंत फलटणनजीक शंभु महादेवाच्या रानांत सन १२४४ च्या सुमारास येऊन राहिला. निंबराज ज्या गावीं राहिला त्यास निंबळक आणि त्यावरून त्याच्या वंशास निंबाळकर अशें नाव पडले. निंबराजाच्या वंशजांनी पुढे फलटण हें गाव वसविलें आणि तेथें ते वतन संपादून राहूं लागले. महंमद तुघ्लखाच्या वेळेस ह्यांस 'नाईक' हा किताब व फलटणची देशमुखी मिळाली. पुढें आदिलशाहींत निंबाळकराचें महत्त्व विशेष वाढलें. निंबराजापासून चवदावा पुरुष वणंगपाळ उर्फ जगपाळराव म्हणून झाला, त्याच्या पूर्वीची माहिती उपलब्ध नाहीं.
जगपाळराव हा शूरफौजबंद होता. स.१५६९ च्या सुमारास तो फटलणचा कारभार पाहूं लागला.हिंगणी बेरडीचे भोंसले दरसाल चैत्रांत शंभुमहादेवाच्या यात्रोस जात. रस्त्यात त्यांचा मुक्काम फलटणास निंबाळकरांकडे होई. बाबाजी भोंसल्याचे दोघे मुलगे मालोजी व विठोजी हे जगपाळरावाचे समवयीच होते. भोसलें बंधूची इभ्रत, ज्वानी व हिंमत पाहून त्या उभयतांचा ॠणानुबंध वाढला. जगपाळराव आजूबाजूस आपला प्रदेश वाढवीत होता, त्या कामीं त्यास मालोजी व विठोजीचा चांगला उपयोग झाला. असे सांगतात कीं, स.१५९०-९२ च्या सुमारास जगपाळरावाची फौज कोल्हापुरकडील कांहीं प्रांत जिकीत असतां,त्याजवर आदिलशहाची फौज चालून आली. पुढें लढाई झाली, तींत भोसलेबंधूंनीं शौर्य प्रगट करून जगपाळरावाची बाजू संभाळिली. ह्यामुळे त्या उभयतांचा स्नेह वृध्दिंगत झाला.पुढें भोसल्यांचा भाग्योदय झालेला पाहून जगपाळरावानें आपली बहीण मालेोजीस दिली. हीच शहाजी राजेंची आई दीपाबाई होय.
पश्चात त्याचा प्रौढ मुलगा मुधोजीराव (दुसरा) फलटणचा अधिकारी झाला. त्याला दोन बायका असून वडील बायकोला साबाजीरावजगदेवराव, आणि धाकटीला बजाजी रावसईबाई अशीं मुलें होती. ह्या सावत्र मुलांत तंटे लागून ते विकोपास गेले. साबाजी व जगदेव हे दोघे घर सोडून मातुश्रीसह विजापुरास गेले. तेथें दरबारांत खटपट केल्यावर त्यांस दहिगांव व भाळवणी हे दोन गांव स्वतंत्र तोदून मिळले (१६३४). अशा रीतीनें निंबाळकरांच्या तीन स्वतंत्र शाखा झाल्या.
मुधोजीनें आपली धाकटी बायको व तिची मुलें बजाजी व सईबाई यांस,आपल्या जवळ बोलावून घेतलें. पुढें शहाजीराजे विजापूरच्या नोकरींत राहिल्यावर त्यानी आपलें वजन खर्च करून मुधोजीची (१६३८) सुटका करविली. ह्या उपकारामुळें मुधाजीनें आपली मुलगी शिवाजीराजेस दिली. (१६३९).
शिवाजीराजेनेि पुढें जो स्वतंत्र होण्याचा उपक्रम चालविला त्यास मुधोजीचें साहाय्य होते ही गोष्ट  विजापूरदरबारास खपत नव्हती. शिवाय मुधोजीच्या मनात असे होतें कीं, आपल्या पश्चात फलटणचा कारभार बजाजीस मिळावा. ह्या गोष्टीस त्याचे वडील मुलगे कबूल नव्हते. ते विजापुरची मदत घेऊन मुधोजीवर चालून आले. शिरवळनजीक भोळी येथें लढाई होऊन मुधोजी एका वडाच्या झाडाखाली पुत्राच्या हातून मारला गेला, त्यास बापमारीचा वड असें म्हणतात (इ.स.१६४४). ह्या लढाईंत बजाजीस कैद करून विजापुरास नेलें. तेथे बापाच्या अपराधाबद्दल त्यास जिवें मारण्याची आज्ञा झाली.

परंतु आदिलशाहाच्या मुलीनें त्याला बाटवून त्याच्याशीं लग्न केल्याने त्याची शिक्षा रद्द झाली. बजाजी काहीं काळ विजापुरी राहिल्यावर देशमुखीनें फर्मान घेऊन फलटणास आला (१६५१).फलटणास अद्यापि बजाजीची समाधि (घुमट) आहे. त्यास पुढें जिजाबाईनें शुंभुमहादेवाच्या देवळांत प्रायश्चित्त देऊन जातींत घेतले आणि त्याचा मुलगा महादजी ह्यास शिवाजीराजेंची मुलगी सखूबाई दिली.
महादजी हा शिवाजीराजेंचा जांवई असून त्याचा एक सरदार होता. तो बहुश: कर्नाटकाकडे असे.त्याची संभाजीराजेना  चांगली मदत झाली. संभाजीराजेंचा वध झाल्यावर औरंगझेबानें या नवराबायकोस पकडून ग्वाल्हेरीच्या किल्ल्यावर हयातीपर्यंत कैदेत ठेविलें. शिवाजी महाराजानी मोजे वाल्हें (जिल्हा पुणें) येथील पाटिलकी जांवयास आंदण दिली होती. महादजीचा पुत्र बजाजी (दुसरा) हा स. १७७४ पर्यंत हयात होता.
_________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगांव
________________________
महादजीचा धाकटा भाऊ मुधोजी. त्याचा मुलगा बजाजी (तिसरा) यास राजाराम छत्रपतीची मुलगी सावित्रीबाई दिली होती.  पहिला बजाजी स१६७६ च्या सुमारास वारला त्यावर त्याचा तिसरा पुत्र वणगोजी (१६७६-९३) गादीवर आला; याची विशेष माहिती आढळत नाहीं.
🩺श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेब यांनी देश स्वतंत्र झाल्यावर सर्वप्रथम आपले फलटण संस्थान भारतीय संघ राज्यात विलीन केले. विलिनीकरणाची प्रक्रिया पूर्ण होण्यास १९४९ साल उजाडले. या वेळेपर्यंत हैद्राबाद सारखा एखादा अपवाद वगळता दक्षिणेतील सर्व संस्थाने संघ राज्यात विलीन झाली होती. संस्थान विलीन झाल्यानंतर महाराजसाहेबांनी राजवैभव आणि राजचिन्हांचा त्याग करत आपली राहणी सर्वसामान्य नागरिका सारखी ठेवली.
राज्य मंत्रिमंडळात समावेश...
संस्थानांच्या विलिनीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विलीन संस्थानांचे प्रतिनिधी म्हणून महाराज साहेबांचा राज्याच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. तत्कालीन मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांनी महाराज साहेबांकडे विकास खात्याचा कारभार सोपविला. या पदावर महाराज साहेबांना १९५२ च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर होईपर्यंत साधारणपणे दोन, अडीच वर्षे काम करता आले.
१९५२ च्या सार्वत्रिक निवडणुकीत महाराज साहेब आणि गणपतराव तपासे हे दोघे फलटण-माण संयुक्त मतदार संघातून मुंबई विधान सभेवर मोठ्या मताधिक्याने निवडून आले. राज्यात काँग्रेसला विक्रमी बहुमत मिळाले आणि मोरारजीभाई देसाई यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे मंत्रिमंडळ अधिकारारुढ झाले. या मंत्रिमंडळात फक्त ९ मंत्री होते आणि त्यापैकी श्रीमंत मालोजीराजे नाईक-निंबाळकर महाराज साहेब, गणपतराव तपासे आणि यशवंतराव चव्हाण हे तीन मंत्री एकट्या सातारा जिल्ह्यातील होते.

आज हा वसा राज्याचे माजी जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व फलटणचे नगराध्यक्ष श्रीमंत रघुनाथराजेनाईक-निंबाळकर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर, जिल्हा परिषदेच्या सदस्या श्रीमंत सौ.शिवांजलीराजे नाईक-निंबाळकर व नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक-निंबाळकर एकोप्याने चालवित आहेत.

0

फलटण हे महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक शहर आहे. हे शहर पुणे जिल्ह्यात आहे.

फलटण संस्थानाचा इतिहास:

  • फलटण हे पूर्वी एक छोटेसे संस्थान होते.
  • या संस्थानावर निंबाळकर घराण्याचे राज्य होते.
  • संस्थानचे संस्थापक निम्बाजीराव निंबाळकर (प्रथम) हे होते.
  • ब्रिटिश राजवटीत फलटण हे डेक्कन स्टेट्स एजन्सीचा भाग होते.
  • 1947 मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर, फलटण संस्थान भारतीय संघराज्यात विलीन झाले.

भौगोलिक माहिती:

  • फलटण शहर पुणे जिल्ह्याच्या आग्नेय दिशेला आहे.
  • हे शहर नीरा नदीच्या काठी वसलेले आहे.
  • फलटण हे दुष्काळग्रस्त प्रदेशात येत असल्याने पर्जन्यमान कमी असते.

दर्शनीय स्थळे:

  • राम मंदिर: शहरातील प्रसिद्ध राम मंदिर निंबाळकर राजघराण्याने बांधले आहे.
  • लक्ष्मीबाई विठ्ठल मंदिर: हे मंदिर शहराच्या पूर्वेकडील भागात आहे.
  • गणपती मंदिर: नीरा नदीच्या काठी असलेले हे मंदिर सुंदर आहे.

अर्थव्यवस्था:

  • फलटण हे मुख्यतः कृषी उत्पादन केंद्र आहे.
  • ऊस, डाळिंब, द्राक्षे आणि इतर फळपिकांचे येथे उत्पादन घेतले जाते.
  • शहरात अनेक साखर कारखाने आणि फळ प्रक्रिया उद्योग आहेत.

अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 2580

Related Questions

भारताच्या कार्यकारी मंडळाचे स्वरूप स्पष्ट करा?
राज्यसंस्थेचे नियमक स्वरूप म्हणजे काय?
मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत हक्क यांच्यातील द्वंद्व स्पष्ट करा?
आपल्या घटनेतील प्रमुख मार्गदर्शक तत्त्वामागील विचार सविस्तर स्पष्ट करा?
भारत हे एक धर्मनिरपेक्ष राज्य आहे या विधानातील आशय स्पष्ट करा?
राज्यघटनेत किती परिशिष्ट आहेत?
राज्यघटनेत किती भाग आहेत?