शिवाजी महाराज जिल्हा राज्यव्यवस्था इतिहास

मिरज संस्थान बद्दल माहिती सांगा?

2 उत्तरे
2 answers

मिरज संस्थान बद्दल माहिती सांगा?

1
मिरज या सांगली जिल्ह्य़ातील शहरात ब्रिटिशराजच्या काळात छोटे संस्थान होते. विजापूरच्या अदिलशाहीची एक महत्त्वाची जहागिरी असलेले. मिरज घेण्यासाठी शिवाजी महाराजांनी १६६० मध्ये दोन महिने मिरजेशेजारी वास्तव्य केले.

१६८६ साली औरंगजेबाने मिरजेवर आपला अंमल बसविला. १७३९ साली छत्रपती शाहूंनी परत एकदा मिरजेवर ताबा बसविला. गोिवद हरी पटवर्धन आणि त्यांचे दोन बंधू मराठा लष्करात उच्चपदस्थ सेनाधिकारी होते. त्यांनी हैदरअली आणि टिपू सुलतानवरील मराठय़ांच्या मोहिमेत भरीव कामगिरी करून मराठा साम्राज्याची दक्षिण सरहद्द तुंगभद्रेपर्यंत वाढविली. गोिवदराव हरी पटवर्धन यास त्याच्या कामगिरीवर खूश होऊन माधवराव पेशवे यांनी १७६१ साली मिरजेची जहागीर आणि किताब देऊन ८ हजार घोडदळ राखण्यासाठी खर्चाचे वार्षकि २५ लाख रु. मंजूर केले.
---------------------------------------
https://www.facebook.com/MAHITIseva/  *❍  फेसबुक पेज अवश्य लाइक करा  ❍*
----------------------------------------
🇦 मिरज जहागिरीला अल्पकाळातच एका छोटय़ा राज्याचे स्वरूप आणणाऱ्या गोिवदरावांची राजकीय कारकीर्द इ.स. १७६१ ते १७७१ अशी झाली.
पटवर्धनांचा मूळपुरुष हरभट, व त्याच्या इतर वंशजांची हकीकत निरनिराळया पटवर्धन सरदारांच्या इतिहासांत दिली आहे. नारोपंत इचलकरंजीकरातर्फे हरभटाच्या गोविंदराव या मुलास थोरल्या बाजीरावानें आपल्या ५२ पाग्यांतील इंद्रोजी कदम याच्या पागेची फडणविशी दिली (१७३०) व पुढें इंद्रोजी वारल्यावर त्याची पागाच गोविंदरावास मिळाली. गोविंदरावानें कर्नाटकांत महत्त्वाच्या पुष्कळ कामगिर्‍या केल्या, त्यामुळें पेशव्यांनीं मिरजेचा किल्ला व आसपासचा प्रांत गोविंदराव व त्याचे पुतणे परशुरामभाऊ आणि नीळकंठ त्र्यंबक या तिघांच्या नांवें ८ हजार स्वार ठेवण्यासाठीं २५ लाखांचा प्रांत सरंजाम म्हणून दिला (१७६४). गोविंदरावाचा मुलगा गोपाळराव हाहि फार पराक्रमी निपजला. राघोबादादा, पेशवे झाले असतां त्यांनीं मिरज पटवर्धनापासून जबरीनें घेतली, याचें कारण गोपाळरावानें थोरल्या माधवरावांची बाजू घेतली होती. मिरज गेल्यावर गोपाळराव निजामाकडे गेला,परंतु माधवरावानें त्याची समजूत करून त्यास मिरज परत दिली. गोपाळरावानें हैदर व भोंसले यांच्या स्वार्‍यांत प्रमुखत्वानें भाग घेतला. कर्नाटकांत त्याचा दरारा फार होता; तो मुत्सद्दी, शूर व करारी होता. हैदरावरील एका स्वारींत ह्याची प्रकृति बिघडून तो मिरजेस आला व तेथेंच वयाच्या ४२ व्या वर्षी वारला (१७७१). त्या शोकानें थोडयाच दिवसांत गोविंदरावहि वारला. त्याच्यामागें गोविंदरावाचा धाकटा मुलगा वामनरव यास सरदारी मिळाली (१७७३) बारभाईंच्या कारस्थानांत वामनराव हा त्यांच्या बाजूस होता. वामनरावानेंहि हैदरावर स्वार्‍या केल्या होत्या. भोंसल्यावरील स्वारींत जात असतां तो खानदेशांत वरणगांव येथें वारला (१७७५). नंतर त्याच्या पांडुरंगराव नांवाच्या धाकटया भावास सरदारी मिळाली, पांडुरंगराव स्वारीशिकारीवर जाई आणि त्याचा धाकटा भाऊ गंगाधरराव हा मिरजेचा सर्व कारभार पाही. पांडुरंगराव हा हैदरावरील एका स्वारींत पाडाव होऊन शेवटपर्यंत बंदींत होता. पुढें गंगाधर गोविंद व पांडुरंगरावाचा सर्वांत धाकटा मुलगा चिंतामणराव या चुलतेपुतण्यांत सरंजामाबद्दल तंटे लागून ते विकोपास गेले. चिंतामणरावानें तर बाहेर निघून व सैन्य जमवून मिरजेवर हल्ले केले (१८०१). गंगाधरराव हा कारकुनी बाण्याचा व नाना फडणविसाच्या मर्जीतला गृहस्थ होता. अखेर अनेक मंडळींच्या मध्यस्थीनें सरंजामाची वांटणी होऊन, खुद्द मिरज व ४७९७९८ रुपयांची जहागीर गंगाधररावास व सांगली व ६३५१७८ रु. ची जहागीर चिंतामणरावाच्या वांटयास आली. खेरीज सांगलीस किल्ला बांधण्यास १ लाख रु. चिंतामणरावास मिळाले (१८०८). गंगाधररावानें लोकोपयुक्त पुष्कळ कामें केलीं. तो स. १८०९ त वारला. याला केशव, नारायण, माधव, गोविंद, गोपाळ, व वामन असे ६ पुत्र होते. केशव लहानपणीं वारल्यानें नारायणास सरदारी मिळाली (१८१२). या सालीं इंग्रजांनीं पेशवे व पटवर्धन यांचा परस्पर संबंध ठरवून दिला. हा खडर्याच्या लढाईंत हजर होता. याला गणेश व मोरेश्वर हे पुत्र होते. बाप वारला तेव्हां गणपतराव (पहिला) लहान असल्यानें, त्याचा चुलता माधवराव हा कारभारी झाला; त्याच्या वेळींच इंग्रजांचा व मिरजकरांचा गलगले येथें तह झाला (१८१९), त्यांत ३०० स्वार चाकरीस ठेवण्याची अट होती. याचा दुसरा चुलता गोपाळराव यानें हिश्शाबद्दल तक्रार केल्यावरून, इंग्रजसरकारनें मिरज किल्ला व त्याखालींल ५५ हजारांचा सरंजाम वेगळा काढून बाकीच्या दौलतीचे चार भाग केले. गणपतराव नारायण यांस मिरज दौलत, माधवराव गंगाधरास मिरजमळा, कृष्णराव गोविंदास सोनी (हल्लीं खालसा), गोपाळ गंगाधरास सुपारीबाग (हल्लीं खालसा), असे हिस्से पाडून गणपतरावास किल्ला व त्याखलच्या सरंजाम देऊन शिवाय वडिलपणाबद्दल २८ हजारांचा सरंजाम जास्त दिला; गणपतराव १८३३ त वारला. त्याला गंगाधर व नारायण असे दोन पुत्र होते. बाळासाहेब (गंगाधरा)स मुखत्यारी मिळाली (१८४९) त्यापूर्वी १ वर्ष मिरजकराकडून इंग्रजांनीं स्वारांच्या ऐवजीं सालीना १२५५८ रु. नक्त रक्कम घेण्याचें ठरलें. पुढें स. १८५७ च्या नानागर्दींत बाळासाहेब राजनिष्ठ राहिल्यानें इंग्रजसरकारनें त्यास दत्तकाची परवानगी दिलीं. त्यानें किल्ल्यातील त्रिंबक गणेश यास दत्तक घेऊन त्याचें नांव गणपतराव ठेविलें (१८६१); त्यानंतर दोन महिन्यांनीं बाळासाहेब वारला. गणपतरावास स. १८७१ त मुखत्यारी मिळून त्यांनीं तीनच वर्षें कारभार केला. व दवाखाने, लायब्ररी वगैरे संस्था स्थापून, जकात माफ करून व्यापार वाढविला. यांची हुषारी व विद्वत्ता पाहून मुंबई सरकारनें यांस आपल्या कायदेकौन्सिलचें सभासद नेमलें. हे अल्पवयीच (१८७४) वारले. त्यानंतर सांगलीच्या दत्तक घराण्यांतील गणपतराव विनायक यांचा दुसरा मुलगा गोपाळराव यास गणपतराव मिरजकरांच्या कुटुंबानें दत्तक घेऊन त्याचें नांव गंगाधरराव ठेविलें (१८७५). हेच सांप्रतचे विद्यमान मिरजेचे संस्थानिक श्री. गंगाधरराव बाळासाहेब के. सी. . आय्. ई. होत. यांचा जन्म स. १८६६ तील असून यांचें शिक्षण कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजांत झालें.
---------------------------------------
शेअरचॅट https://sharechat.com/post/AgRPXJa?referrer=copiedLink
------------------------------------
---
१८२० साली मिरज राज्याचे थोरली पाती (मिरज सीनियर) आणि धाकटी पाती (मिरज ज्युनियर) असे दोन भाग झाले.थोरल्या पातीची राजधानी मिरज ठरविण्यात आली.तर धाकटया पातीची राजधानी बुधगाव ठरली.  तत्पूर्वी १८१९ साली मिरजच्या राजांनी ईस्ट इंडिया कंपनी सरकारबरोबर संरक्षणाचा करार केला. दोन्ही पात्यांचे संस्थानिक पहिल्या दर्जाचे सरदार असून त्यांना दत्तकाचे तसेच न्यायदानाचे पूर्ण अधिकार होते.
संस्थानचे राजे माधवराव पटवर्धन यांनी १९४८ मध्ये स्वतंत्र भारतात मिरज थोरली पाती संस्थान विलीन केले. मिरज धाकटी पातीचे राज्यक्षेत्र ५५० चौ.कि.मी. होते आणि १९०१ साली संस्थानाची लोकसंख्या ३५ हजार होती. या संस्थानाच्या राजांचे वास्तव्य बुधगावात असे. हे संस्थान १९४८ मध्ये स्वतंत्र भारतात विलीन झाले.    
               *✺ 𝑾𝒉𝒂𝒕𝒔𝒂𝒑𝒑  9890875498 ✺*
                  *_❍ माहिती सेवा ग्रूप ❍_*
*_❍ पेठवडगांव,जि. कोल्हापुर ❍_*
----------------❍--------------------

0

मिरज संस्थान हे ब्रिटिश भारतातील डेक्कन स्टेट्स एजन्सीतील एक मराठा शासित संस्थान होते. हे संस्थान 1820 मध्ये गणपतराव गोविंद पटवर्धन यांनी स्थापित केले होते.

इतिहास:

  • मिरज हे शहर पूर्वी आदिलशाही सल्तनतचा भाग होते.
  • 1686 मध्ये मराठा साम्राज्याने या शहरावर ताबा मिळवला.
  • 1761 मध्ये, हे शहर पेशव्यांच्या अधिपत्याखाली आले.
  • 1820 मध्ये, गणपतराव गोविंद पटवर्धन यांनी मिरज संस्थानाची स्थापना केली.
  • 1947 मध्ये, भारत स्वतंत्र झाल्यानंतर, मिरज संस्थान भारतीय संघराज्यात विलीन झाले.

भूगोल:

  • मिरज शहर कृष्णा नदीच्या काठी वसलेले आहे.
  • हे शहर दख्खनच्या पठारावर स्थित आहे.
  • मिरज हे एक महत्त्वाचे रेल्वे जंक्शन आहे.

अर्थव्यवस्था:

  • मिरजची अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेतीवर आधारित आहे.
  • ऊस, द्राक्षे, आणि कडधान्ये ही येथील मुख्य पिके आहेत.
  • मिरजमध्ये अनेक साखर कारखाने आणि तेल गिरण्या आहेत.

संस्कृती:

  • मिरज हे एक ऐतिहासिक शहर आहे.
  • येथे अनेक मंदिरे, मशिदी आणि चर्च आहेत.
  • मिरज हे शास्त्रीय संगीताचे एक महत्त्वाचे केंद्र आहे.

शिक्षण:

  • मिरजमध्ये अनेक शाळा आणि महाविद्यालये आहेत.
  • येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय देखील आहे.

मिरज हे एक महत्त्वाचे शहर आहे आणि ते महाराष्ट्राच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देत आहे.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 980

Related Questions

भारतीय राज्यघटनेच्या भाग १ वर निबंध लिहा?
शिवकाळामध्ये मोठ्या खेड्यास काय म्हटले जाई?
भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्त्वे कोणती आहेत?
शिव काळात राजा दरबाराची भाषा कोणती होती?
भारतीय राज्यघटनेमध्ये किती कलमे आहेत?
भारताच्या राज्यघटनेचे स्रोत कोणते आहेत?
You are a senior police officer working at the state police headquarters. Your wife/husband is a commissioner in the higher education department. Recently an RTI activist has filed an RTI application seeking all the information related to purchases made by the department for the government colleges. At the behest of the minister, almost double the amount was spent by the department to purchase furniture and computers for all the state run colleges. If the real facts come out, your wife/husband will be at risk of getting suspended and if corruption charges proved, she/he might even go to jail. The RTI activist is actually a close friend of yours. You come to know that he is targeting the minister in charge of the department and had nothing against your wife/husband. He also tells you that he is ready to withdraw application as a gesture of friendship. In this situation, what will you do? Explain (250words)