Topic icon

राज्यव्यवस्था

0

भारतीय राज्यघटनेचा भाग १: संघ आणि त्याचे क्षेत्र

भारतीय राज्यघटनेचा भाग १ (कलम १ ते ४) 'संघ आणि त्याचे क्षेत्र' याबद्दल आहे. यात भारताचे नाव, राज्यांची निर्मिती, त्यांची क्षेत्रे आणि नागरिकत्वाशी संबंधित तरतुदी आहेत.

कलम १: भारताचे नाव आणि राज्य क्षेत्र

  • भारताचे नाव: 'इंडिया, जो भारत आहे' अशा नावाचा उल्लेख आहे.
  • राज्य क्षेत्र: राज्यांचे क्षेत्र, केंद्रशासित प्रदेश आणि भविष्यात समाविष्ट केले जाऊ शकणारे इतर क्षेत्र यांचा समावेश असतो.

कलम २: नवीन राज्यांची स्थापना किंवा प्रवेश

  • संसदेला कायद्याद्वारे नवीन राज्ये तयार करण्याचा किंवा अस्तित्वात असलेल्या राज्यांमध्ये सामील करण्याचा अधिकार आहे.

कलम ३: राज्यांची निर्मिती आणि क्षेत्रांमध्ये बदल

  • संसदेला कायद्याद्वारे नवीन राज्य तयार करण्याचा, राज्यांची क्षेत्रे वाढवण्याचा किंवा कमी करण्याचा, राज्यांच्या सीमा बदलण्याचा किंवा राज्यांची नावे बदलण्याचा अधिकार आहे.
  • असा कोणताही कायदा राष्ट्रपतींच्या शिफारशीशिवाय मांडला जाऊ शकत नाही.

कलम ४: कलम २ आणि ३ अंतर्गत केलेले कायदे

  • कलम २ आणि ३ अंतर्गत केलेले कायदे हे घटनादुरुस्ती मानले जात नाहीत.

महत्व:

  • हा भाग भारताच्या भौगोलिक सीमा आणि राजकीय संरचनेची व्याख्या करतो.
  • भारताच्या अखंडतेचे आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करतो.
  • संसदेला नवीन राज्ये तयार करण्याचे आणि अस्तित्वात असलेल्या राज्यांमध्ये बदल करण्याचे अधिकार देतो.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1820
0

शिवाजी महाराजांच्या काळात मोठ्या खेड्याला 'कसबा' म्हटले जात असे. कसबा हे खेडे farming आणि administration चे केंद्र असे.

अधिक माहितीसाठी, तुम्ही हे पाहू शकता:

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1820
0

भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्त्वे (Directive Principles of State Policy - DPSP) ही मूलभूत नाहीत, परंतु देशाच्या शासनासाठी ती आवश्यक आहेत. हे तत्त्वज्ञान भारतीय संविधानाच्या भाग ४ मध्ये समाविष्ट आहे. ही तत्त्वे न्यायालयाने लागू करता येत नाहीत, परंतु सरकारला धोरणे ठरवताना आणि कायदे बनवताना मार्गदर्शन करतात.

मार्गदर्शक तत्त्वांचे वर्गीकरण:

  1. सामाजिक आणि आर्थिक न्यायाची तत्त्वे:
    • कलम ३८: राज्याने लोकांच्या कल्याणासाठी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय सुनिश्चित करणे.
    • कलम ३९: राज्याने नागरिकांसाठी उपजीविकेची पुरेशी साधने, समान कामासाठी समान वेतन आणि बालकांच्या आरोग्याचे संरक्षण करणे.
    • कलम ४१: राज्याने नागरिकांना काम, शिक्षण आणि सार्वजनिक सहाय्य मिळवण्याचा हक्क देणे.
    • कलम ४२: राज्याने कामाच्या ठिकाणी योग्य आणि मानवीय परिस्थिती निर्माण करणे आणि महिलांसाठी प्रसूती सहाय्य उपलब्ध करणे.
    • कलम ४३: राज्याने कामगारांना निर्वाह वेतन, चांगले जीवनमान आणि सामाजिक-सांस्कृतिक संधी सुनिश्चित करणे.
    • कलम ४३A: राज्याने उद्योगांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग सुनिश्चित करणे.
    • कलम ४७: राज्याने लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करणे आणि जीवनावश्यक वस्तूंचा दर्जा वाढवणे.
  2. गांधीवादी तत्त्वे:
    • कलम ४०: राज्याने ग्रामपंचायतींचे संघटन करणे आणि त्यांना स्वराज्य संस्था म्हणून कार्य करण्यासाठी सक्षम करणे.
    • कलम ४३: राज्याने ग्रामीण भागांमध्ये कुटीर उद्योगांना प्रोत्साहन देणे.
    • कलम ४३B: राज्याने सहकारी संस्थांना प्रोत्साहन देणे.
    • कलम ४६: राज्याने दुर्बळ घटकांसाठी शिक्षण आणि आर्थिक हितसंबंधांना प्रोत्साहन देणे.
    • कलम ४७: राज्याने मादक पेये आणि आरोग्यास हानिकारक असलेल्या पदार्थांवर बंदी घालणे.
    • कलम ४८: राज्याने गायी, वासरे आणि इतर दुभत्या जनावरांची हत्या थांबवणे आणि त्यांची नस्ल सुधारणे.
  3. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेशी संबंधित तत्त्वे:
    • कलम ५१: राज्याने आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा जतन करणे, राष्ट्रांमध्ये न्यायपूर्ण आणि सन्मानजनक संबंध राखणे, आंतरराष्ट्रीय कायद्यांचा आदर करणे आणि आंतरराष्ट्रीय विवादांचे लवाद्वारे निराकरण करण्यास प्रोत्साहन देणे.
  4. इतर तत्त्वे:
    • कलम ४४: राज्याने नागरिकांसाठी समान नागरी कायदा (Uniform Civil Code) लागू करण्याचा प्रयत्न करणे.
    • कलम ४५: राज्याने १४ वर्षांखालील सर्व मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देणे.
    • कलम ४८: राज्याने पर्यावरण संरक्षण आणि सुधारणा करणे तसेच वन्यजीवनाचे रक्षण करणे.
    • कलम ४९: राज्याने राष्ट्रीय स्मारके आणि ऐतिहासिक वस्तूंचे संरक्षण करणे.
    • कलम ५०: राज्याने न्यायपालिकेला कार्यपालिकेपासून स्वतंत्र ठेवणे.

मार्गदर्शक तत्त्वे हे शासनासाठी मार्गदर्शक आहेत आणि त्यांचा उद्देश कल्याणकारी राज्य (Welfare State) स्थापन करणे आहे.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1820
0

शिवाजी महाराजांच्या काळात राजा दरबाराची भाषा मराठी होती.

शिवाजी महाराजांनी राज्यकारभारात फारसी भाषेचा वापर कमी करून मराठी भाषेला प्रोत्साहन दिले. त्यांनी 'राज्यव्यवहार कोश' नावाचा एक कोष तयार करवून घेतला, ज्यात फारसी शब्दांऐवजी मराठी शब्द वापरले गेले.

अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकला भेट देऊ शकता:


उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 1820
1
मिरज या सांगली जिल्ह्य़ातील शहरात ब्रिटिशराजच्या काळात छोटे संस्थान होते. विजापूरच्या अदिलशाहीची एक महत्त्वाची जहागिरी असलेले. मिरज घेण्यासाठी शिवाजी महाराजांनी १६६० मध्ये दोन महिने मिरजेशेजारी वास्तव्य केले.

१६८६ साली औरंगजेबाने मिरजेवर आपला अंमल बसविला. १७३९ साली छत्रपती शाहूंनी परत एकदा मिरजेवर ताबा बसविला. गोिवद हरी पटवर्धन आणि त्यांचे दोन बंधू मराठा लष्करात उच्चपदस्थ सेनाधिकारी होते. त्यांनी हैदरअली आणि टिपू सुलतानवरील मराठय़ांच्या मोहिमेत भरीव कामगिरी करून मराठा साम्राज्याची दक्षिण सरहद्द तुंगभद्रेपर्यंत वाढविली. गोिवदराव हरी पटवर्धन यास त्याच्या कामगिरीवर खूश होऊन माधवराव पेशवे यांनी १७६१ साली मिरजेची जहागीर आणि किताब देऊन ८ हजार घोडदळ राखण्यासाठी खर्चाचे वार्षकि २५ लाख रु. मंजूर केले.
---------------------------------------
https://www.facebook.com/MAHITIseva/  *❍  फेसबुक पेज अवश्य लाइक करा  ❍*
----------------------------------------
🇦 मिरज जहागिरीला अल्पकाळातच एका छोटय़ा राज्याचे स्वरूप आणणाऱ्या गोिवदरावांची राजकीय कारकीर्द इ.स. १७६१ ते १७७१ अशी झाली.
पटवर्धनांचा मूळपुरुष हरभट, व त्याच्या इतर वंशजांची हकीकत निरनिराळया पटवर्धन सरदारांच्या इतिहासांत दिली आहे. नारोपंत इचलकरंजीकरातर्फे हरभटाच्या गोविंदराव या मुलास थोरल्या बाजीरावानें आपल्या ५२ पाग्यांतील इंद्रोजी कदम याच्या पागेची फडणविशी दिली (१७३०) व पुढें इंद्रोजी वारल्यावर त्याची पागाच गोविंदरावास मिळाली. गोविंदरावानें कर्नाटकांत महत्त्वाच्या पुष्कळ कामगिर्‍या केल्या, त्यामुळें पेशव्यांनीं मिरजेचा किल्ला व आसपासचा प्रांत गोविंदराव व त्याचे पुतणे परशुरामभाऊ आणि नीळकंठ त्र्यंबक या तिघांच्या नांवें ८ हजार स्वार ठेवण्यासाठीं २५ लाखांचा प्रांत सरंजाम म्हणून दिला (१७६४). गोविंदरावाचा मुलगा गोपाळराव हाहि फार पराक्रमी निपजला. राघोबादादा, पेशवे झाले असतां त्यांनीं मिरज पटवर्धनापासून जबरीनें घेतली, याचें कारण गोपाळरावानें थोरल्या माधवरावांची बाजू घेतली होती. मिरज गेल्यावर गोपाळराव निजामाकडे गेला,परंतु माधवरावानें त्याची समजूत करून त्यास मिरज परत दिली. गोपाळरावानें हैदर व भोंसले यांच्या स्वार्‍यांत प्रमुखत्वानें भाग घेतला. कर्नाटकांत त्याचा दरारा फार होता; तो मुत्सद्दी, शूर व करारी होता. हैदरावरील एका स्वारींत ह्याची प्रकृति बिघडून तो मिरजेस आला व तेथेंच वयाच्या ४२ व्या वर्षी वारला (१७७१). त्या शोकानें थोडयाच दिवसांत गोविंदरावहि वारला. त्याच्यामागें गोविंदरावाचा धाकटा मुलगा वामनरव यास सरदारी मिळाली (१७७३) बारभाईंच्या कारस्थानांत वामनराव हा त्यांच्या बाजूस होता. वामनरावानेंहि हैदरावर स्वार्‍या केल्या होत्या. भोंसल्यावरील स्वारींत जात असतां तो खानदेशांत वरणगांव येथें वारला (१७७५). नंतर त्याच्या पांडुरंगराव नांवाच्या धाकटया भावास सरदारी मिळाली, पांडुरंगराव स्वारीशिकारीवर जाई आणि त्याचा धाकटा भाऊ गंगाधरराव हा मिरजेचा सर्व कारभार पाही. पांडुरंगराव हा हैदरावरील एका स्वारींत पाडाव होऊन शेवटपर्यंत बंदींत होता. पुढें गंगाधर गोविंद व पांडुरंगरावाचा सर्वांत धाकटा मुलगा चिंतामणराव या चुलतेपुतण्यांत सरंजामाबद्दल तंटे लागून ते विकोपास गेले. चिंतामणरावानें तर बाहेर निघून व सैन्य जमवून मिरजेवर हल्ले केले (१८०१). गंगाधरराव हा कारकुनी बाण्याचा व नाना फडणविसाच्या मर्जीतला गृहस्थ होता. अखेर अनेक मंडळींच्या मध्यस्थीनें सरंजामाची वांटणी होऊन, खुद्द मिरज व ४७९७९८ रुपयांची जहागीर गंगाधररावास व सांगली व ६३५१७८ रु. ची जहागीर चिंतामणरावाच्या वांटयास आली. खेरीज सांगलीस किल्ला बांधण्यास १ लाख रु. चिंतामणरावास मिळाले (१८०८). गंगाधररावानें लोकोपयुक्त पुष्कळ कामें केलीं. तो स. १८०९ त वारला. याला केशव, नारायण, माधव, गोविंद, गोपाळ, व वामन असे ६ पुत्र होते. केशव लहानपणीं वारल्यानें नारायणास सरदारी मिळाली (१८१२). या सालीं इंग्रजांनीं पेशवे व पटवर्धन यांचा परस्पर संबंध ठरवून दिला. हा खडर्याच्या लढाईंत हजर होता. याला गणेश व मोरेश्वर हे पुत्र होते. बाप वारला तेव्हां गणपतराव (पहिला) लहान असल्यानें, त्याचा चुलता माधवराव हा कारभारी झाला; त्याच्या वेळींच इंग्रजांचा व मिरजकरांचा गलगले येथें तह झाला (१८१९), त्यांत ३०० स्वार चाकरीस ठेवण्याची अट होती. याचा दुसरा चुलता गोपाळराव यानें हिश्शाबद्दल तक्रार केल्यावरून, इंग्रजसरकारनें मिरज किल्ला व त्याखालींल ५५ हजारांचा सरंजाम वेगळा काढून बाकीच्या दौलतीचे चार भाग केले. गणपतराव नारायण यांस मिरज दौलत, माधवराव गंगाधरास मिरजमळा, कृष्णराव गोविंदास सोनी (हल्लीं खालसा), गोपाळ गंगाधरास सुपारीबाग (हल्लीं खालसा), असे हिस्से पाडून गणपतरावास किल्ला व त्याखलच्या सरंजाम देऊन शिवाय वडिलपणाबद्दल २८ हजारांचा सरंजाम जास्त दिला; गणपतराव १८३३ त वारला. त्याला गंगाधर व नारायण असे दोन पुत्र होते. बाळासाहेब (गंगाधरा)स मुखत्यारी मिळाली (१८४९) त्यापूर्वी १ वर्ष मिरजकराकडून इंग्रजांनीं स्वारांच्या ऐवजीं सालीना १२५५८ रु. नक्त रक्कम घेण्याचें ठरलें. पुढें स. १८५७ च्या नानागर्दींत बाळासाहेब राजनिष्ठ राहिल्यानें इंग्रजसरकारनें त्यास दत्तकाची परवानगी दिलीं. त्यानें किल्ल्यातील त्रिंबक गणेश यास दत्तक घेऊन त्याचें नांव गणपतराव ठेविलें (१८६१); त्यानंतर दोन महिन्यांनीं बाळासाहेब वारला. गणपतरावास स. १८७१ त मुखत्यारी मिळून त्यांनीं तीनच वर्षें कारभार केला. व दवाखाने, लायब्ररी वगैरे संस्था स्थापून, जकात माफ करून व्यापार वाढविला. यांची हुषारी व विद्वत्ता पाहून मुंबई सरकारनें यांस आपल्या कायदेकौन्सिलचें सभासद नेमलें. हे अल्पवयीच (१८७४) वारले. त्यानंतर सांगलीच्या दत्तक घराण्यांतील गणपतराव विनायक यांचा दुसरा मुलगा गोपाळराव यास गणपतराव मिरजकरांच्या कुटुंबानें दत्तक घेऊन त्याचें नांव गंगाधरराव ठेविलें (१८७५). हेच सांप्रतचे विद्यमान मिरजेचे संस्थानिक श्री. गंगाधरराव बाळासाहेब के. सी. . आय्. ई. होत. यांचा जन्म स. १८६६ तील असून यांचें शिक्षण कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजांत झालें.
---------------------------------------
शेअरचॅट https://sharechat.com/post/AgRPXJa?referrer=copiedLink
------------------------------------
---
१८२० साली मिरज राज्याचे थोरली पाती (मिरज सीनियर) आणि धाकटी पाती (मिरज ज्युनियर) असे दोन भाग झाले.थोरल्या पातीची राजधानी मिरज ठरविण्यात आली.तर धाकटया पातीची राजधानी बुधगाव ठरली.  तत्पूर्वी १८१९ साली मिरजच्या राजांनी ईस्ट इंडिया कंपनी सरकारबरोबर संरक्षणाचा करार केला. दोन्ही पात्यांचे संस्थानिक पहिल्या दर्जाचे सरदार असून त्यांना दत्तकाचे तसेच न्यायदानाचे पूर्ण अधिकार होते.
संस्थानचे राजे माधवराव पटवर्धन यांनी १९४८ मध्ये स्वतंत्र भारतात मिरज थोरली पाती संस्थान विलीन केले. मिरज धाकटी पातीचे राज्यक्षेत्र ५५० चौ.कि.मी. होते आणि १९०१ साली संस्थानाची लोकसंख्या ३५ हजार होती. या संस्थानाच्या राजांचे वास्तव्य बुधगावात असे. हे संस्थान १९४८ मध्ये स्वतंत्र भारतात विलीन झाले.    
               *✺ 𝑾𝒉𝒂𝒕𝒔𝒂𝒑𝒑  9890875498 ✺*
                  *_❍ माहिती सेवा ग्रूप ❍_*
*_❍ पेठवडगांव,जि. कोल्हापुर ❍_*
----------------❍--------------------

7
भाग १ - कलम 1 संघाचे नाव आणि भूप्रदेश

कलम 2 - प्रदेश किंवा नविन राज्यांची निर्मीती कलम 2(अ)-रद्द केले

कलम 3- राज्याची स्थापनाभाग 2 - कलमे 5-11नागरिकत्वभाग ३ - कलमे १२-३५ मूलभूत हक्ककलमे १४-१८ समानतेचा हक्क,कलमे १९-२२ स्वातंत्र्याचा हक्क,कलमे २३-२४ शोषणाविरुद्धचा हक्क,कलमे २५-२८ धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क,कलमे २९-३0 सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क,कलमे ३२-३५ सांविधानिक परिहाराचा हक्क.भाग ४ - राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे कलमे ३६ - ५१कलम 40 -ग्रामपंचायतीचे संघटनकलम 41 - काम करण्याचा, शिक्षणाचा, गरजूंना सरकारी मदत मिळण्याचा अधिकारभाग ४(अ) कलम ५१ अ - प्रत्येक भारतीय नागरिकाचि मूलभूत कर्तव्ये.भाग ५ -प्रकरण १ - कलमे ५२-७८कलमे ५२-६३ राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्याबाबत, कलमे ७४-७५ मंत्रीमंडळविषयककलम ७६ भारताचे मुख्य ऍटर्नी,कलमे ७७-७८ सरकारच्या व्यवहाराबाबतप्रकरण २ - कलमे ७९-१२२ संसदेबाबत.कलमे ७९-८८ संसदेच्या संविधानाबाबत,कलमे ८९-९८ संसदेच्या अधिकारांबाबत,कलमे ९९-१००कलमे १०१-१०४ सदस्यत्व रद्द करण्याबाबतकलमे १०५-१०६ संसद व खासदारांचे अधिकार आणि विशेषाधिकार यांच्या बाबत,कलमे १०७-१११ (law making process)कलमे ११२-११७ आर्थिक बाबींबाबत,कलमे ११८-१२२प्रकरण ३ - कलम १२३कलम १२३ संसदेच्या विरामकाळात राष्ट्रपतींच्या आदेशाबाबतप्रकरण ४ - कलमे १२४-१४७कलमे १२४-१४७ सर्वोच्च न्यायालयची रचना आणि संविधान याबाबतप्रकरण ५ - कलमे १४८-१५१ भारताचे कंट्रोलर आणि ऑडिटर जनरल यांचेबाबत.कलमे १४८ - १५१ कंट्रोलर आणि ऑडिटर जनरल यांचे अधिकार व कर्तव्ये यांबाबतभाग ६ - राज्यांच्याच्या बाबतची कलमे.प्रकरण १ - कलम १५२ भारताचे राज्यांची सामान्य व्याख्याकलम १५२ - भारताचे राज्यांची सामान्य व्याख्या - जम्मू आणि काश्मीर वगळूनप्रकरण २ - कलमे १५३-१६७ कार्यांबाबतकलमे १५३-१६२ राज्यपालाच्या बाबत,कलमे १६३-१६४ मंत्रिमंडळावर,कलम १६५ राज्याच्या ॲडव्होकेट-जनरल यांच्याबाबत.कलमे १६६-१६७ सरकारच्या व्यवहारिक गरजांबाबत.प्रकरण ३ - कलमे १६८ - २१२ राज्यांच्या शासनाशी निगडित.कलमे १६८ - १७७ सामान्य माहितीकलमे १७८ - १८७ राज्यांच्या शासनाचे अधिकारकलमे १८८ - १८९ कार्यकालाविषयीकलमे १९० - १९३ सदस्यत्व रद्द करण्याबाबतकलमे १९४ - १९५ विधिमंडळ सदस्यांचे अधिकार, सवलती, कायदेशीर संरक्षणेकलमे १९६ - २०१ कार्यकाविषयीकलमे २०२ - २०७ अर्थिक विषयांसंबधीकलमे २०८ - २१२ इतर सामान्य विषयांसंबधीप्रकरण ४ - कलम २१३ राज्यपालांच्या अधिकारांबाबतकलम २१३ - राष्ट्रपती व अधिवेशन काळातील विधेयके.प्रकरण ५ - कलमे २१४ - २३१ राज्यांच्या उच्च न्यायालयांबाबत.कलमे २१४ - २३१ राज्यांच्या उच्च न्यायालयांबाबत.प्रकरण ६ - कलमे २३३ - २३७ अधीन न्यायालयांबाबत.कलमे २३३ - २३७ अधीन न्यायालयांच्या बाबतभाग ७ - राज्यांच्या बाबतील कलमे.संपादन कराकलम २३८ -भाग ८ - केंद्रशासित प्रदेशांशी निगडित कलमेकलमे २३९ - २४२ मंत्रिमंडळ रचना आणि उच्चन्यायालयांबाबतभाग ९ - पंचायती पद्धतीबाबतची कलमेकलमे २४३ - २४३ ओ ग्रामसभा आणि पंचायती पद्धतीबाबतभाग ९ अ - नगरपालिकांबाबतची कलमे.कलमे २४३पी - २४३ झेड नगरपालिकांबाबतभाग १० -कलमे २४४ - २४४ अभाग ११ - केंद्र आणि राज्यांच्या संबंधांविषयीप्रकरण १ - कलमे २४५ - २५५ शासनाच्या अधिकारांच्या वितरणाविषयीकलमे २४५ - २५५ शासनाच्या अधिकारांच्या वितरणाविषयीप्रकरण २ - कलमे २५६ - २६३कलमे २५६ - २६१ - सामान्यकलमे २६२ - पाण्याचा विवादाबाबत.कलमे २६३ - राज्यांचे परस्पर संबंध.भाग १२ - संपत्ती, मालमत्ता व दिवाणी दावे यांबाबतप्रकरण १ - कलमे २६४ - २९१ संपत्तीबाबतकलमे २६४ - २६७ सामान्यकलमे २६८ - २८१कलमे २८२ - २९१ इतरप्रकरण २ - कलमे २९२ - २९३कलमे २९२ - २९३प्रकरण ३ - कलमे २९४ - ३००कलमे २९४ - ३००प्रकरण ४ - कलम ३०० अ मालमत्तेच्या अधिकारांविषयककलम ३०० अ -भाग १३ - भारताच्या व्यापार आणि वाणिज्यविषयक कलमेकलमे ३०१ - ३०५कलम ३०६ -कलम ३०७ -भाग १४ -प्रकरण ५ - कलमे ३०८ - ३१४कलमे ३०८ - ३१३कलम ३१४ -प्रकरण २ - कलमे ३१५ - ३२३ लोकसेवा आयोगाबाबतचे कलमकलमे ३१५ - ३२३ लोकसेवा आयोगाबाबतचे कलमभाग १४ अ - आयोगांच्या बाबत कलमेकलमे ३२३ अ - ३२३ बीभाग १५ - निवडणूक विषयक कलमेकलमे ३२४ - ३२९ निवडणूक विषयक कलमेकलम ३२९ अ -भाग १६ -कलमे ३३० -३४२भाग १७ - अधिकृत भाषॆबाबतची कलमेप्रकरण १ - कलमे ३४३ - ३४४ केंद्र भाषॆबाबतकलमे ३४३ - ३४४ केंद्राच्या अधिकृत भाषॆबाबतप्रकरण २ - कलमे ३४५ - ३४७ प्रांतीय भाषांबाबतकलमे ३४५ -३४७ प्रांतीय भाषांबाबतप्रकरण ३ - कलमे ३४८ - ३४९ सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयांच्या भाषॆबाबत, इत्यादीकलमे ३४८ - ३४९ सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयांच्या भाषॆबाबत, इत्यादीप्रकरण ४ - कलमे ३५० - ३५१ विशेष निर्देशकलम ३५० -कलम ३५० अ -कलम ३५०बि - भाषिक अल्पसंख्यांकाविषयीचे कलमकलम ३५१ - हिंदी भाषॆविषयक कलमभाग १८ - आणीबाणी परिस्थितीबाबतची कलमेकलमे ३५२ - ३५९ - आणीबाणी परिस्थितीबाबतची कलमेकलम ३५९ अ -कलम ३६० - आर्थिक आणीबाणीभाग १९ - इतर विषयकलमे ३६१ - ३६१अ - इतर विषयकलम ३६२ -कलमे ३६३ - ३६७ - इतरभाग २० -घटनादुरुस्ती पद्धतकलम ३६८ -घटनादुरुस्तीभाग २१ -कलमे ३६९ -३७८ अकलमे ३७९ - ३९१ -कलम ३९२ - आणीबाणीच्या परिस्थितीतील राष्ट्रपतींचे हक्कभाग २२ -कलमे ३९३ -३९५


उत्तर लिहिले · 27/7/2018
कर्म · 4255
1
*भारतीय राज्यघटनेचे स्त्रोत*
     

भारतीय शासन कायदा 1935
·         जवळ जवळ राज्यघटनेचा मोठा भाग भारतीय शासन कायदा 1935 पासून घेण्यात आला.
·         संघराज्यीय शासन पद्धती
·         न्यायव्यवस्था
·         लोकसेवा आयोग, आणीबाणीची तरतूद, राज्यपालाचे पद
·         प्रशासकीय तरतूद

      ब्रिटिश घटना
·         संसदीय शासन व्यवस्था
·         कॅबिनेट व्यवस्था
·         द्विगृही संसद पद्धती

·         फर्स्ट पास्ट-पोस्ट-सिस्टम
·         कायदे प्रणाली व कायदा करण्याची पद्धत
·         एकेरी  नागरिकत्व
·         संसदीय विशेषाधिकार
·         आदेश देण्याचे विशेष हक्क 

      यू एस ए ची घटना
·        
    
     राज्यघटनेतील मूलभूत हक्क
·         उपराष्ट्रपती हे पद
·         न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य
·         न्यायिक पुनर्विलोकण
·         राष्ट्रपतीवरील महाभियोगाची पद्धत
·         सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशास पदावरून दूर करण्याची पद्धत
   
   कॅनडाची घटना
·    
       प्रभावी केंद्र असलेले संघराज्य
·         शेषाधिकार केंद्राकडे असण्याची तरतूद ( राज्यघटनेमध्ये समावर्ती सूची, केंद्र सूची  व राजयसूची चा समावेश असतो ज्या विषयाचा या तिन्ही पैकी कोणत्याही सूचित समावेश नसतो त्यास शेषाधिकार असे म्हणतात )
·         राज्यपालाची केंद्राचा प्रतींनिधी म्हणून नेमणूक
·         सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार आधिकार क्षेत्र

      आयरीश घटना
·       
     राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे
·            राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत
·            राज्यसभेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन

      अस्ट्रेलिया ची घटना
·        
     राज्यघटनेतील समावर्ती सूची
·            संसदेच्या दोन्ही सभागुहाची संयुक्त बैठक
·            व्यापार व वाणीज्याचे स्वातंत्र्य

      फ्रांस ची घटना
·        
     गणराज्य
·           प्रस्ताविकेतील स्वातंत्र्य
·           समता व बंधुता हे आदर्श

      दक्षिण आफ्रिकेची घटना
·        
     घटना दुरुस्तीची पद्धत
·            राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक

   सोव्हिएत रशियाची घटना

·         मूलभूत कर्तव्य
·         प्रस्ताविकेतील सामाजिक , आर्थिक व राजकीय न्यायाचा आदर्श

     
  जपानची घटना
·             कायद्याने प्रस्थापित पद्धत
      जर्मनीची घटना

·            आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क स्थगित होणे
उत्तर लिहिले · 24/11/2017
कर्म · 123540