2 उत्तरे
2 answers

विद्या विनयेन शोभते?

1
विद्या अन विनय यांचा सुरेख मिलाप म्हंजेच शिक्षण होय . ज्ञान या आणि  नम्रता यांचा सुरेख संगम म्हणजे शिक्षण होय .नम्रतेशिवाय ज्ञाना ला शोभा येत नाही ,म्हणून लहानपणापासून विद्या विनयेन शोभते हा सुविचार आपल्या कानावर घातला जातो व शाळेत त्याचे धडे गिरवले जातात .मित्रानो ,संस्कार नम्रता अन  ज्ञान यांची सुरवात शालेय जीवनापासून शिकविले जाते वयाचा सोळाव्या वर्षी तोरणा घेणारे छत्रपती शिवाजी महाराज किंवा डॉ. बाबासाहेब आंबेकर  यांचे बाळकडू पाजले जाते ते शाळेतच पण हे सगळे विचार इतिहास जमा का होतात ?शिक्षकांशी कसे बालबोलाववडीलधाऱ्यांच्या चार शब्द इकून घ्यावे ह्या गोष्टी का कुणाचाच लक्षात येत नाही ?

शिक्षणाच्या मुळाशी ‘विनय’ असायला हवा, नेमका तोच दिसेनासा होतोयं..विद्या विनयेन शोभते हा सुविचार अनेक जणांनी शाळेच्या भिंतीवर किंवा अनेक वक्त्यांच्या तोंडातून ऐकला असेल. तो महत्त्वाचा आहे म्हणून तर त्याचा उल्लेख केला जातो. सुविचार म्हणजे चांगला विचार. शिक्षण घेत असल्यापासून असे काही सुविचार विद्याथ्र्याच्या, माणसांच्या जीवनात निश्चितच बदल घडवून आणताना दिसतात. विद्या म्हणजे ज्ञान. विनय म्हणजे नम्रता. शोभणे म्हणजे चांगले दिसणे, योग्य असणे होय. म्हणजेच शिक्षण घेणारा, ज्ञान घेणारा हा नम्र असला पाहिजे तरच तो शिक्षणक्षेत्रात शोभून दिसायला लागतो. म्हणून हा संस्कार बालमनावर रुजला जावा, पिढय़ानपिढय़ा संस्कारशील व्हाव्यात, समृद्ध समाज निर्माण व्हावा, अन् देशाचा एक सच्चा नागरिक व्हावा म्हणून त्याची सुरुवात शाळेपासून केली असावी.
उत्तर लिहिले · 17/5/2020
कर्म · 55350
0

''विद्या विनयेन शोभते'' या उक्तीचा अर्थ असा आहे की विद्या विनयशीलतेने शोभते.

अर्थ: ज्ञान हे नम्रतेने अधिक सुंदर दिसते. तुमच्यात कितीही ज्ञान असले तरी, जर तुमच्यात अहंकार असेल, तर त्या ज्ञानाचा काही उपयोग नाही.

या उक्तीनुसार, विद्येसोबत विनय असणे आवश्यक आहे.

"विद्या विनयेन शोभते" हे वाक्य अनेकदा शिक्षण आणि नैतिकतेच्या संदर्भात वापरले जाते.

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 1200

Related Questions

सहाय्यक पुस्तकाचे प्रकार स्पष्ट करा?
लेखनाच्या पद्धती स्पष्ट करा?
बोलण्याच्या कौशल्यातील भाषेचे स्थान स्पष्ट करा?
बी. फार्मसी ८ सेमेस्टर कसे होतात?
बी. फार्मसी (B. Pharmacy) च्या थर्ड सेमिस्टरचे विषय कोणते आहेत?
बी. फार्मसी द्वितीय वर्षातील विषय कोणते?
B. Pharmacy first semester subjects काय आहेत?