शिक्षण मराठी भाषा व्याकरण मराठी व्याकरण

मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत आणि क्ष, ज्ञ व ळ हे वर्ण आहेत की नाही सांगा?

2 उत्तरे
2 answers

मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत आणि क्ष, ज्ञ व ळ हे वर्ण आहेत की नाही सांगा?

4
मराठी वर्णमाला किंवा मराठी मुळाक्षरे खालीलप्रमाणे आहेत; यात ६० वर्णांचा समावेश होतो

स्वर
अ आ ॲ ऑ इ ई उ ऊ ऋ-ॠ ऌ-ॡ ए ऐ ओ औ
स्वरादी
(अनुस्वार) ः (विसर्ग)
व्यंजन
क् ख् ग् घ् ङ् (कंठ्य व्यंजने)
च् छ् ज् झ् ञ् (तालव्य व्यंजने)
च़् छ़ ज़् झ़् ञ़् (दंततालव्य वर्णजने)
ट् ठ् ड् ढ् ण् (मूर्धन्य व्यंजने)
त् थ् द् ध् न् (दंत्य व्यंजने)
प् फ् ब् भ् म् (ओष्ठ्य व्यंजने)
फ़् (दंतोष्ठ्य व्यंजन)
य् र् व् ल्
श् ष् स्
ह् ळ्
विशेष संयुक्त व्यंजन
क्ष् (क्+ष्) ; ज्ञ् (द्+न्+य्) (संस्कृतमध्ये ज+ञ=ज्ञ)

मराठी भाषेच्या शास्त्रीय वर्णमालेत मुळातले १६ स्वर + इंग्रजीच्या संपर्कामुळे आलेले ‘ॲ, ऑ हे स्वर मिळून १८ स्वर + दोन स्वरादी (अनुस्वार व विसर्ग) + ४० व्यंजने असे एकूण ६० वर्ण दिले आहेत.
उत्तर लिहिले · 14/10/2020
कर्म · 6750
0

मराठी वर्णमालेत एकूण ५२ वर्ण आहेत.

क्ष, ज्ञ हे संयुक्त व्यंजन आहेत, तर हा स्वतंत्र वर्ण आहे.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 5240

Related Questions

माहिती प्रधान समाजामध्ये ग्रंथालयाची पारंपारिक भूमिका बदलून ती कशी व्यापक होत आहे ते स्पष्ट करा?
College la application deun 7 divas zale pn college TC det nahi?
शालेय व्यवस्थापन म्हणजे काय? शालेय व्यवस्थापनाचे कार्य स्पष्ट करा.
शालेय व्यवस्थापनात शिक्षकाची भूमिका स्पष्ट करा?
शालेय व्यवहाराप्रती जबाबदारी?
प्रभावी वर्गखोली (Class room) व्यवस्थापन?
ग्रंथोपार्जन या संज्ञेची कामे उदाहरणासहित स्पष्ट करा?