2 उत्तरे
2
answers
शिक्षण आपल्या भाषेतूनच झाले पाहिजे का?
3
Answer link
आजकाल शिक्षणावर थोडा बहुत विचार करणारा कोणी ज्येष्ठ नागरिक भेटला की तो लहान मुलांच्या पालकांना तळमळीने काही सांगताना दिसतो. सध्या आपल्या मुलांंना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालण्याची मोठी क्रेझ आहे. मुलगा किंवा मुलगी इंग्रजी माध्यमातून शिकली की ती शहाणी आणि स्मार्ट होणार आणि सध्या लहान खेड्याचे स्वरूप आलेल्या या जगात तिला कोठेही कसली अडचण येणार नाही असा या इंग्रजीवेड्या पालकांचा समज असतो. या समजुतीपोटी ते आपल्या मुलांना भरमसाठ फी आणि अमाप देणगी देऊन इग्रजी माध्यमाच्या शाळांत घालतात. पण हे काही बरोबर नाही असे त्या ज्येष्ठ व्यक्तीचे म्हणणे असते कारण शिक्षणशास्त्र असे सांगते की, मुलांना आपण जे शिकतो त्याचे नीट आकलन व्हायचे असेल तर त्याचे असे हे लोक कितीही समजून सांगोत पण त्यांचे म्हणणे एक अरण्यरुदन ठरायला लागले आहे कारण त्यांनी कितीही आक्रोश करूदेत, लोकांचा इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडील ओढा काही कमी होत नाही. उलट तो वाढत आहे आणि त्याचा गैरफायदा घेऊन खेडापाड्यातही इंग्रजी माध्यमाच्या शाळा काढल्या जायला लागल्या आहेत. उलट मराठी शाळा बंद पडत आहेत.
आता मुंबईत तर मनपाच्या शाळा सोडल्या तर एकही संस्था शुद्ध मराठी माध्यमातून शिक्षण देताना दिसत नाही. पालकही भरपूर फी दिलीय म्हणजे आपले मूल आता स्मार्ट होणार या भ्रमात आहेत. त्याचा गणवेष, टाय आणि शूज पाहिले आणि त्यांनी चार इंग्रजी शब्द टाकले की पालकांनाही आनंद होत आहे.
असे असले तरीही आता आता ज्येष्ठ व्यक्तींचे हे आक्रंदन सत्कारणी लागताना दिसत आहे.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव ची पोस्ट,आपले मूल स्मार्ट दिसेल म्हणून त्याला इंग्रजी माध्यमात घालणार्या पालकांना ते केवळ दिसायलाच स्मार्ट आहे आणि त्याला गणित म्हणावे तेवढे समजलेले नाही हे लक्षात यायला लागले आहे. विज्ञानाच्या अनेक संकल्पना जशा मराठीतून समजू शकतात तशा त्या या परक्या भाषेतून समजत नाहीत हेही त्यांना जाणवत आहे आणि ग्रामीण भागातली मराठी माध्यमात शिकलेली मुले आणि मुली स्पर्धा परीक्षांत चमकतानाही दिसत आहेत. दिसायला स्मार्ट असलेल्या आपल्या मुलापेक्षा त्याच्याच वयाचे जि. प. शाळेत मराठीतून शिकणारे मूल अभ्यासात स्मार्ट आहे हे त्यांना प्रत्यक्षात दिसत आहे अणि अनेक पालक आता आपल्या मुलांना इंग्रजी शाळेतून काढून मराठी शाळेत घालायला लागले आहेत. त्यांच्या मानेवर बसलेले इंग्रजी माध्यमाचे भूत उतरायला लागले आहे. अनेक गावांतून अशा बातम्या येत आहेत आणि मराठी माध्यमाच्या शाळा बहरायला लागल्या आहेत. एक मोठी शैक्षणिक चूक दुरुस्त होत आहे.

0
Answer link
शिक्षणाचे माध्यम आपली मातृभाषा असावी की नाही, याबद्दल अनेक मत प्रवाह आहेत. या संदर्भात काही सकारात्मक आणि नकारात्मक मुद्दे खालीलप्रमाणे:
सकारात्मक मुद्दे:
- Grahaṇśakti (ग्रहणशक्ती): मातृभाषेतून शिक्षण घेतल्यास विद्यार्थ्यांना संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे समजतात. त्यामुळे विषय अधिक सोपा वाटतो.
- Abhiruchi (अभिरुची): जेव्हा शिक्षण आपल्या भाषेतून होते, तेव्हा विषयात अधिक आवड निर्माण होते.
- Sahajata (सहजता): मातृभाषेतून शिकताना विद्यार्थी अधिक सहज आणि आत्मविश्वासपूर्ण असतात.
- Sanskruti Jatan (संस्कृती जतन): आपल्या भाषेतील शिक्षणामुळे संस्कृती आणि परंपरा जतन करणे सोपे जाते.
- Sujanśilta (सृजनशीलता): विद्यार्थी अधिक सर्जनशील बनू शकतात, कारण ते स्वतःच्या भाषेत विचार व्यक्त करण्यास सक्षम असतात.
नकारात्मक मुद्दे:
- Vyavsayik Sandhi Kami ( व्यावसायिक संधी कमी): केवळ मातृभाषेतून शिक्षण घेतल्यास जागतिक स्तरावर व्यावसायिक संधी कमी होऊ शकतात.
- Sadhana Kami (साधनांची कमतरता): प्रत्येक विषयासाठी मातृभाषेत पुस्तके आणि इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध नसू शकते.
- Bhashantarachi Adchan (भाषांतराची अडचण): उच्च शिक्षण आणि संशोधनासाठी काहीवेळा भाषांतराची अडचण येऊ शकते.
त्यामुळे, शिक्षण कोणत्या भाषेतून घ्यावे हे विद्यार्थ्याच्या गरजा, आवड आणि भविष्यातील उद्दिष्टांवर अवलंबून असते.