व्यसन दारू मद्यपान अर्थशास्त्र

महाराष्ट्रामध्ये रोज किती लिटर दारू लागते?

2 उत्तरे
2 answers

महाराष्ट्रामध्ये रोज किती लिटर दारू लागते?

6
*🍾महाराष्ट्रात रोज किती लिटर दारु लागते?*



कोरोना लॉकडाऊनमध्ये दारुविक्रीला परवानगी दिल्यानंतर दारु खरेदीसाठी जी झुंबड उडाली आहे, त्यामुळे या निर्णयावर वेगवेगळ्या दृष्टीकोनातून चर्चा सुरु आहे. दारुविक्रीच्या निर्णयामुळे व्यसनाधिनता वाढेल यापासून ते घरगुती अत्याचारांत वाढ होईल, अशी मतं दारुबंदी समर्थकांनी व्यक्त केली आहेत. तर दारुसाठी उसळलेल्या गर्दीतील दर्दींनी सरकारच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे. महसूलवाढीच्या दृष्टीने दारुविक्रीचं समर्थन केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचं दारुचं गणित काय आहे? त्याची आकडेवारी जाणून घेऊया.

लॉकडाऊनमुळे तब्बल ४२ ते ४३ दिवसांनी दारुविक्री सुरु झाल्यानंतर सोमवारी १७ कोटी रुपयांची दारु विक्री झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मोठा कर आकारूनही राज्यात मोठ्या प्रमाणात दारुविक्री आधीपासूनच होते. ‘राज्यात वर्षभरात ८६.७ कोटी लिटर इतकी दारुची विक्री होते,’ अशी माहिती राज्याचे उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमप यांनी ‘झी २४ तास’ला दिली आहे. ही आकडेवारी पाहता राज्यात दररोज सरासरी २४ लाख लिटर दारु ढोसली जाते. वर्षभरात राज्यात ८६.७ कोटी लिटर दारु विक्री होते, त्यात सर्वाधिक ३५ कोटी लिटर देशी दारुची विक्री होते. तर विदेशी दारु २० कोटी लिटर इतकी विकली जाते. बिअर ३१ कोटी लिटर इतकी विकली जाते. तर वाईन मात्र सर्वात कमी म्हणजे ७० लाख लिटर इतकी विकली जाते.

रोज २४ लाख लिटर दारु विक्री होत असलेल्या महाराष्ट्रात गतवर्षी म्हणजे २०१९-२० या आर्थिक वर्षात १५ हजार ४२८ कोटी इतका महसूल राज्य सरकारला दारु विक्रीतून मिळाला होता. त्यामुळे महिन्याला सुमारे १३ हजार कोटी रुपयांचा महसूल राज्याला दारु विक्रीतून मिळतो

*आपल्या Whatsapp ग्रुप मध्ये नक्की शेअर करा*
उत्तर लिहिले · 5/5/2020
कर्म · 569265
0
मला माफ करा, माझ्याकडे ह्या प्रश्नाची माहिती नाही.
उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 5180

Related Questions

सर, माझा भाऊ खूप दिवसांपासून दारू पितो, कोणतेही मेहनतीचे काम करतो आणि पैसे लगेच उडवून टाकतो. त्याला खूप बोललो, काही फरक पडत नाही.
दारू प्याल्यावर चक्कर का येते?
वाईन पिण्याचे फायदे व तोटे?
माझे वडील खूप दारू पितात, आम्हाला खूप त्रास होतो, काही उपाय आहे का?
दारूमध्ये काय असते, आणि ती प्यायल्यावर अंगामध्ये गरमी का येते?
बियर पिन चांगल आहे की वाईट आहे?
बिअर पिताना कितीही घाईने प्यायली तरी काही नुकसान होऊ शकते का?