मंदिर देव कर्मकांड धर्म

मूर्ती प्राणप्रतिष्ठा म्हणजे नेमके काय?

2 उत्तरे
2 answers

मूर्ती प्राणप्रतिष्ठा म्हणजे नेमके काय?

2
प्राणप्रतिष्ठा म्हणजे ये हृदयीचे ते हृदयी …. मूर्ती घडताना ती सर्व प्रकारच्या निर्गुणातून, निराकारातून घडते, वेगवेगळे आकार देत मूर्तीकार स्वत:ला जसे देवांचे स्वरुप वाटते तसे घडवतो, ते तसेच असते का? तर नाहीं. म्हणून तर आपल्याला कोणत्याही देवाच्या मूर्तीची निवड करताना किती अवघड जाते, कारण घडवणाऱ्याच्या मनातली मूर्ती नि तुमच्या मनातली मूर्ती ही वेगळी असते, असणारच, कारण भाव वेगळे नि कर्म देखील.

घडवलेल्या अशा मूर्तीला सगुणात आणायचय, जीवंत करायचय तर प्राण ओतावा लागेल ना? तो प्राणप्रतिष्ठेद्वारे ओततात. मंत्र, अभिषेक असतो, प्राणांचे प्रत्यक्ष संक्रमण  पद्धतिने होते.  ते प्राण तुमच्या द्वारे त्या मूर्तीमध्ये ओतले जातात. खूप छान कर्म आहे ते, मंत्रार्थ जाणून घेऊन जर सर्व पूजा बघितली, केली तर ते एक खूप छान दर्शन आहे, खूप छान प्रवास आहे.
उत्तर लिहिले · 29/4/2020
कर्म · 55350
0

मूर्ती प्राणप्रतिष्ठा म्हणजे एखाद्या मूर्तीमध्ये देवत्व स्थापित करण्याची विधी आहे.

या विधीमध्ये खालील गोष्टी केल्या जातात:

  • मूर्तीला शुद्ध करणे
  • मंत्रोच्चार करणे
  • अग्नीमध्ये आहुती देणे
  • मूर्तीमध्ये देवत्व उतरवणे

प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर, मूर्तीला पूजनीय मानले जाते आणि तिची नियमित पूजा केली जाते.

अधिक माहितीसाठी हे दुवे पहा:

  1. मूर्ती प्राणप्रतिष्ठा कशी करतात?
  2. प्राणप्रतिष्ठा मंत्र काय आहे आणि त्याचे फायदे काय?
उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 3600

Related Questions

श्राद्धाच्या दिवशी नेमके कळले की आपल्याला जन्म सुतक पडले आहे, तर श्राद्ध करावे की नाही?
मृत माणसाच्या पिंडाला कावळ्याने का शिवावे?
'भस्म धारण' करण्याचा विधी कसा करावा?
पुरोहित म्हणजे काय?
स्वर्गवासी झालेल्या माणसाचे उत्तर कार्य संध्याकाळच्या वेळेत करावे की सकाळच्या वेळेत करावे?
कर्मकांड म्हणजे काय?
ब्राह्मण सांगतात त्या शांत्या खरंच गरजेच्या असतात का?