2 उत्तरे
2
answers
'भस्म धारण' करण्याचा विधी कसा करावा?
1
Answer link
शास्त्रामध्ये तिलक धारण अत्यंत आवश्यक समजले गेले आहे. कपाळी आपापल्या संप्रदायाप्रमाणे गंध लावण्याचा शास्त्राचा स्पष्ट आदेश आहे. गंधा शिवाय सर्व धार्मिक कर्म व्यर्थ आहेत असे शास्त्र सांगते. तीलकाशिवाय सत्कर्म सफळ होऊ शकत नाही.
इथे फक्त भस्म धारण करण्याची पद्धत दिली आहे, इतर लोकांनीही आपापल्या संप्रदायनुसार आणि आचारानुसार टिळक धारण करावेत.
दुपारपूर्वी भस्म पाण्यात मिसळून लावावे. दुपारनंतर पाण्यात मिसळू नये. मध्यान्हाला चंदन आणि संध्याकाळी नुसते कोरडे भस्म लावावे. अंगठा आणि अनामिका याने डाव्या बाजूपासून सुरुवात करून, उजव्या बाजूला भस्म लावा.नंतर उजव्या बाजूने अंगठ्याने सुरुवात करून डाव्या बाजूने ओढत लावा. अशा प्रकारे तीन रेषा काढल्या जातात. तीन बोटांमधील जागा रिकामी ठेवा. डोळ्यांचे शेवटचे टोक रेषांची सीमा असते, म्हणजेच डाव्या डोळ्यापासून उजव्या डोळ्यापर्यंत भस्माच्या रेषा असाव्यात. यापेक्षा लांब आणि लहान असणे देखील शास्त्र समंत नाही. अशा प्रकारे रेषांची लांबी सहा बोटे असते. ही पद्धत ब्राह्मणांसाठी आहे. क्षत्रियांसाठी चार बोटे, वैश्यांसाठी दोन बोटे आणि शूद्रांसाठी एकच बोट वापरावे.
भस्माचा अभिमंत्र - भस्म लावण्यापूर्वी भस्म अभिमंत्रित करावे. डाव्या तळहातावर भस्म ठेवून आणि पाण्यात मिसळून खालील मंत्राचा उच्चार करावा
ओम्अग्निरिती भस्म । वायुरीती भस्म । जलमिती भस्म । स्थलामिती भस्म. व्योमेती भस्म. ओम सर्वम् इदम् भस्म । मन एतानि चक्षुंशी भस्मनिती ।
0
Answer link
'भस्म धारण' करण्याची विधी खालीलप्रमाणे:
- भस्म तयार करणे:
- भस्म धारण करण्याची पद्धत:
- भस्म धारण करण्याचे फायदे:
भस्म हे गायीच्या शेणापासून तयार करतात. शेण जाळून त्याची राख म्हणजेच भस्म तयार केली जाते.
भस्म धारण करण्यापूर्वी स्नान करावे.
भस्म पाण्यात मिसळून त्याची पेस्ट तयार करावी.
तयार केलेल्या भस्माने कपाळावर, गळ्यावर, छातीवर आणि बाहूंवर त्रिपुंड (तीन आडव्या रेषा) काढावे. त्रिपुंड काढताना 'ॐ नमः शिवाय' या मंत्राचा जप करावा.
भस्म धारण केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते, तसेच शारीरिक आणि मानसिक शांती मिळते.
टीप: भस्म धारण करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या সম্প্রদాయानुसार बदलू शकतात.