3 उत्तरे
3
answers
सर्वधर्म समभाव म्हणजे काय?
2
Answer link
सर्वधर्म समभाव याचा अर्थ धार्मिक विश्वासाने, न डळमळणारे राष्ट्रीयत्व असा होईल म्हणजेच धार्मिक विश्वास कोणताही असला तरी परदेशातील स्वधार्मियांपेक्षा स्वदेशातील परधर्मियांबद्दल जास्त आपुलकीची भावना असणे. अशी परिस्थिती निर्माण करण्यासाठी धर्माचा अर्थ फक्त एक विशिष्ठ विश्वास असा घ्यावा लागेल आणि धर्माचा कोणताही संबंध विशिष्ठ जीवन पद्धती, वेशभूषा, भाषा, किंवा विशिष्ठ संघटना यांच्याशी न ठेवल्यास धर्माच्या पलीकडले राष्ट्रीयत्व निर्माण होऊ शकते.
म्हणजेच सर्व धर्माचा आदर करणे होय, सर्वधर्माबरोबरच तुम्ही माणुसकी ला महत्व द्यायला हवं...
धर्म कोणताही असो चांगलं माणूस बना कारण मेल्यानंतर हिशोब आपल्या कर्माचा होतो धर्माचा नाही.
मानवता हाच माझा धर्म आणि माणुसकी हीच माझी जात....
धन्यवाद 🙏
म्हणजेच सर्व धर्माचा आदर करणे होय, सर्वधर्माबरोबरच तुम्ही माणुसकी ला महत्व द्यायला हवं...
धर्म कोणताही असो चांगलं माणूस बना कारण मेल्यानंतर हिशोब आपल्या कर्माचा होतो धर्माचा नाही.
मानवता हाच माझा धर्म आणि माणुसकी हीच माझी जात....
धन्यवाद 🙏
1
Answer link
सर्वात पहिले तुमचे आभार मानतो. ही सर्व धर्म ही एक महत्वाची गोष्ट आहे. सर्व धर्म म्हणजे या पृथ्वीवर जे मानव धर्म आहे, या मानणारा म्हणजे सर्व धर्म समभाव.
0
Answer link
सर्वधर्म समभाव म्हणजे सर्व धर्म समान आहेत आणि त्यांनी एकमेकांचा आदर केला पाहिजे हा विचार आहे.
सर्वधर्म समभाव या संकल्पनेत खालील गोष्टींचा समावेश होतो:
- सर्व धर्मांचा आदर करणे.
- धर्मांधता टाळणे.
- धार्मिक सहिष्णुता जोपासणे.
- सर्व धर्मांच्या लोकांना समान संधी देणे.
सर्वधर्म समभाव भारताच्या धर्मनिरपेक्षतेचा एक महत्त्वाचा भाग आहे. भारतात अनेक धर्म आणि जातीचे लोक राहतात. त्यामुळे, देशात शांतता आणि सलोखा टिकवण्यासाठी सर्वधर्म समभाव आवश्यक आहे.
सर्वधर्म समभाव केवळ एक राजकीय आणि सामाजिक विचार नाही, तर तो एक आध्यात्मिक विचार आहे. सर्व धर्मांचा आदर करणे म्हणजे देवाचा आदर करणे आहे, असा विचार अनेक लोक मानतात.
अधिक माहितीसाठी: