मैत्री कायदा पोलीस पोलिस

मला पोलीस मित्र बनायचं आहे तर कसं बनायचं?

2 उत्तरे
2 answers

मला पोलीस मित्र बनायचं आहे तर कसं बनायचं?

13
पोलिसांच्या संपर्कात राहिल्यास आपोआप पोलिसांच्या ओळखी होतात
सम्बंधित पोलीस स्टेशन च्या हद्दीतील काही छुपी माहिती पोलिसांना देत गेल्यास ते आपोआप तुम्हाला पोलीस मित्र म्हणून निवडतील
मग
त्यांच्याकडे 1फॉर्म असतो तो फार्म पोलीस भरून घेतात
व आपल्याला पोलीस मित्र म्हणून i card भेटते..

पोलीस मित्राचे कार्य
* पोलीस मित्र होण्यासाठी कुठल्याही खास पात्रतेची आवश्यकता नाही. आवड आणि तुमच्या नावावर एकही गुन्ह्य़ाची नोंद नसलेली व्यक्ती पोलीस मित्र बनू शकते.
* त्यांना पोलीस ठाण्यातून ओळखपत्र देण्यात येते. दररोज किंवा सुटीच्या दिवशी पोलिसांच्या कामात हे पोलीस मित्र मदत करू शकतात.
* बंदोबस्त, उत्सवांचा काळ, जनजागृती मोहिमा, सामाजिक तंटे असतील तर या पोलीस मित्रांची मदत होऊ शकेल.
* एखादा तंत्रज्ञ पोलिसांना तांत्रिक कामात मदत करू शकतो. याशिवाय परिसरात घडणाऱ्या अपप्रवृती, अनैतिक धंदे, समाजविघात कृत्य याबाबत ते पोलिसांना माहिती देऊ शकतील.
उत्तर लिहिले · 11/4/2020
कर्म · 55350
0
पोलीस मित्र बनण्यासाठी खालील गोष्टी करू शकता:
  • पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधा: तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलीस मित्रांच्या भरती प्रक्रियेबद्दल माहिती मिळवा.
  • अर्ज करा: पोलीस स्टेशनमधून अर्ज घेऊन तो व्यवस्थित भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा.
  • निवड प्रक्रिया: अर्जांची छाननी झाल्यावर मुलाखत आणि शारीरिक चाचणी होऊ शकते. त्यात उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
  • प्रशिक्षण: निवड झाल्यानंतर तुम्हाला पोलीस मित्र म्हणून काम करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाईल.

पात्रता:

  • १८ वर्षांपेक्षा जास्त वय असावे.
  • कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नसावा.
  • शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असावे.

पोलीस मित्राची कर्तव्ये:

  • पोलिसांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मदत करणे.
  • गुन्हेगारी घटनांची माहिती पोलिसांना देणे.
  • समाजात शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी जनजागृती करणे.

अधिक माहितीसाठी, तुम्ही तुमच्या स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधा किंवा महाराष्ट्र पोलिसांच्या वेबसाइटला भेट द्या:

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 2200

Related Questions

झापाचीवाडी गावचा पोलीस पाटील कोण?
कोणत्याही गावातील चोरीचा बैल दुसऱ्या गावात कोणी विकत घेतलेला असल्यास, त्याविषयी त्या गावच्या सरपंचाला पोलीस स्टेशनला बोलावले जाऊ शकत का? व त्यांना स्वतःचे खर्चे करून जावे लागेल का? काय प्रोसिजर असते ते सांगा?
माझ्या गावात स्टोन क्रेशर मशीन आहे, तरी त्यांना ग्रामपंचायत कर लागू आहे. त्यांना ग्रामपंचायतीतर्फे विनंती अर्ज करून कर पट्टी भरायला सांगितली, तरी त्यांनी ती न दिल्यास काय प्रोसिजर करावी लागेल?
31 वर्षांपूर्वी मोठ्या भावाने भावांचे (आनेवारी) वाटप अर्ज करून केलेले आहे. फेरफार तसाच आहे आणि त्यानुसार वहिवाट चालू आहे. 15 वर्षांनंतर चुलत भावांनी गट वाटप (रजिस्टर) केले. परगावी 2 एकर जमीन मोठ्या भावाच्या नावे होती, ती खराब जमीन डोंगरपड होती. वारसा हक्काने मिळालेल्या जमिनीच्या वाटणीवरून चुलत भावांमध्ये वाद होत आहेत, तर ते वाटप कायद्याने परत होऊ शकेल का?
शेजारच्याने जागा न सोडता अनधिकृत बांधकाम करून आमच्या बाजूने खिडक्या ठेवल्या आहेत, याची तक्रार कुठे करून न्याय मिळवावा?
मी आणि माझी पत्नी, दोन मुले व वडील असा ५ व्यक्तींचा परिवार आहे. वडिलांच्या नावे जमीन, राशनकार्ड व सर्व काही वडिलांच्याच ताब्यात आहे. ते आम्हाला जमीन व राशनमधील काहीही देत नाहीत. त्याकरिता, मला माझे राशन वेगळे मिळेल का किंवा राशनकार्ड वेगळे करू शकतो का?
मला माझा मुलगा, सून कोणीही सांभाळ करण्यास तयार नाही. जमीन सर्व त्यांच्या नावावर आहे. माझ्याजवळ काहीही नाही आणि रेशन कार्ड पण त्यांच्या नावाचे आहे. त्यामध्ये माझे पण नाव आहे, पण त्यामधील धान्य ते मला देत नाही. त्याकरिता मला त्यांच्या रेशनमधून नाव कमी करून स्वतःचे राशन मिळू शकेल का?