राजकारण लोकसभा राज्यसभा कायदेमंडळ

राज्यसभा, लोकसभा, संसद, विधानपरिषद, विधानसभा या विषयी माहिती सांगा?

2 उत्तरे
2 answers

राज्यसभा, लोकसभा, संसद, विधानपरिषद, विधानसभा या विषयी माहिती सांगा?

3


१) लोकसभा हे भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे. येथे येणारे सदस्य हे लोकांमर्फत थेट निवडून येतात. म्हणून तिला लोकसभा म्हणतात कारण ती भारताच्या लोकांचे प्रतिनिधीत्व करते. सदस्यांचा कालावधी ५ वर्षांचा असतो.

२) राज्यसभा हे भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे. येथे येणारे सदस्य हे राज्यांच्या विधानसभेने निवडून दिलेले असतात. म्हणून तिला राज्यसभा म्हणतात कारण ती राज्याचं प्रतिनिधीत्व करते. सदस्यांचा कालावधी ६ वर्षांचा असून, दर दोन वर्षांनी काही सदस्य निवृत्त होऊन त्यांच्या जागी नवीन सदस्य येत असतात. म्हणजेच हे स्थायी सभाग्रह आहे.

३) विधानसभा: ज्या प्रमाणे भारतीय संसदेमध्ये लोकसभा असते, त्याप्रमाणेच राज्यपातळीवर विधानसभा ही राज्याच्या विधिमंडळाचे कनिष्ठ सभागृह म्हणून काम करते. इथेही थेट लोकांमधून निवडून आलेले सदस्य असतात

४)  विधानपरिषद,:भारतातील घटक राज्यांमधील कायदेमंडळाच्या वरिष्ठगृहाला विधान परिषद म्हणतात
बाकी सर्व घटकराज्यात एकगृह कायदेमंडळ पद्धती आहे. तेथे विधानसभा हे एकच सभागृह आहे.महाराष्ट्राच्या विधानपरीषदेत 78 सदस्य आहेत.
घटनेच्या कलम 169 (1) नुसार विधानसभेने सभासदांच्या किंवा दोन तृतीयांश सभासदांनी उपस्थितीने बहुमताने ठराव केल्यास संसद राज्यात विधान परिषद अस्तित्वात आणते.
विधान परिषद सदस्य हे विधानसभा सदस्य, स्थानिक स्वराज्य संस्था, पदवीधर, शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात.
राज्यपाल विज्ञान, साहित्य, कला व समाजसेवेतील प्रसिद्ध लोकांना विधानपरिषदेवर प्रतिनिधित्व देतात.
५)संसद .,भारतीय संसद ही लोकसभा हे लोकांच्या मधून निवडून आलेल्या खासदार यांचे कनिष्ठ सभागृह आणि नियुक्त किंवा जनप्रतिनीधी मार्फ़त निवडून आलेल्या राज्यसभा या वरिष्ठ सभागृहाच्या एकत्रीत स्वरुपाला म्हणतात. संसदीय लोकशाहीत न्यायपालीका आणि सरकार पेक्षाही जास्त प्रभाव संसदेचा असतो.
🙏 धन्यवाद
उत्तर लिहिले · 11/4/2020
कर्म · 3350
0
मी तुम्हाला राज्यसभा, लोकसभा, संसद, विधानपरिषद आणि विधानसभा यांबद्दल माहिती देतो:

1. राज्यसभा (Rajya Sabha):

  • राज्यसभा हे भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे.
  • याला 'कCouncil of States' असेही म्हणतात.
  • राज्यसभेचे सदस्य राज्यांचे प्रतिनिधित्व करतात आणि त्यांची निवड विधानसभेचे सदस्य करतात.
  • राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ ६ वर्षांचा असतो आणि दर २ वर्षांनी १/३ सदस्य निवृत्त होतात.
  • राज्यसभेचे अध्यक्ष हे भारताचे उपराष्ट्रपती असतात.

2. लोकसभा (Lok Sabha):

  • लोकसभा हे भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे.
  • याला 'House of the People' असेही म्हणतात.
  • लोकसभेचे सदस्य थेट निवडणुकीद्वारे निवडले जातात.
  • लोकसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ ५ वर्षांचा असतो.
  • लोकसभेचे अध्यक्ष सदस्यांमधून निवडले जातात.

3. संसद (Parliament):

  • भारतीय संसद राष्ट्रपती आणि दोन सभागृहांनी मिळून बनलेली आहे: राज्यसभा आणि लोकसभा.
  • संसदेचे मुख्य कार्य कायदे बनवणे आहे.
  • संसदेत दोन्ही सभागृहांनी मंजूर केलेले विधेयक राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर कायदा बनते.

4. विधानपरिषद (Legislative Council):

  • विधानपरिषद हे काही राज्यांच्या विधानमंडळाचे वरिष्ठ सभागृह आहे.
  • हे सर्व राज्यांमध्ये नाही.
  • विधानपरिषदेचे सदस्य अप्रत्यक्षपणे निवडले जातात.
  • विधानपरिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ ६ वर्षांचा असतो आणि दर २ वर्षांनी १/३ सदस्य निवृत्त होतात.

5. विधानसभा (Legislative Assembly):

  • विधानसभा हे राज्यांच्या विधानमंडळाचे कनिष्ठ सभागृह आहे.
  • विधानसभेचे सदस्य थेट निवडणुकीद्वारे निवडले जातात.
  • विधानसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ ५ वर्षांचा असतो.
  • विधानसभेचे अध्यक्ष सदस्यांमधून निवडले जातात.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1040

Related Questions

हे बेलचे चूक लक्षात आणून देणारे युवकांचे कोणते उद्गार परिषदेत आले आहेत?
गोवा राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत?
वेस्टर्न पॉलिटिकल थॉट्स?
लोकरीची आणि लोकनीती?
शीतयुद्ध काळात भारताने महत्त्वाची भूमिका बजावली?
विकास प्रशासनात लोकसहभाग आवश्यक आहे?
न्यायमंडळ कार्यकारी मंडळ काय आहे?