औषधे आणि आरोग्य
कोरोना
संसर्गजन्य रोग
आरोग्य
कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्यावर किती दिवसांनी लक्षणे दिसतात?
3 उत्तरे
3
answers
कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्यावर किती दिवसांनी लक्षणे दिसतात?
6
Answer link
बहुतेक विषाणूंप्रमाणे, COVID-19 (कोरोनावायरस डिसीज 2019) चा इनक्युबेशन कालावधी (संसर्ग होणे व लक्षणे दिसणे यामधील कालावधी) प्रत्येक व्यक्तीमध्ये भिन्न असू शकतो.
युनायटेड स्टेट्सच्या रोग नियंत्रण व प्रतिबंधक केंद्राच्या मते, कोरोनाव्हायरसची लागण झाल्याची लक्षणे संसर्गानंतर 2-14 दिवसांनंतर दिसू शकतात. याच कारणामुळे जे लोक रूग्णाच्या संपर्कात असतील त्यांना 14 दिवसांपासून स्वत:ला वेगळं ठेवण्यास सांगितले जात आहे.
बऱ्याच लोकांमध्ये COVID-19 ची लक्षणे हळूवारपणे सुरू होतात आणि काही दिवसांत हळूहळू खराब होतात.
2
Answer link
कोरोना ची सविस्तर लक्षणे –
कोरोनाची तीव्र ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास हा आपल्याला माहित आहे. पण हा त्रास तीव्र किंवा गंभीर कोरोनाच्या रुग्णालाच होतो. ८५ टक्के लोकांना कोरोना संसर्ग झाला तरी एक तर साधा ताप आणि थोडा खोकला असा सौम्य स्वरुपाची लक्षण दिसतील. त्यातही काहींना असे ही होऊ शकते कि काहीच लक्षणे आली नाहीत. म्हणून साधा खोकला , ताप , सर्दी असली तरी आपल्याला इतरांना पासून लांब राहायचे आहे हे समजून घ्यावे.
पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी – थोडे थकल्या सारखे वाटेल
तिसऱ्या दिवशी – ताप, थोडा खोकला आणि घशात खाजवल्या सारखे वाटणे किंवा खवखवणे.
चौथ्या दिवशी - डोकेदुखी
पाचव्या दिवशी – पोटाशी निगडीत लक्षणे , पोट दुखी , क्वचित जुलाब , खोकला थोडा वाढेल, ताप तेवढाच राहील किंवा वाढेल.
सहाव्या, सातव्या दिवशी – अंगदुखी , थकवा वाढेल, डोकेदुखी कमी होईल, पोटाच्या तक्रारी राहतील, भूक कमी होईल
आठव्या , नवव्या दिवशी – सगळी लक्षणे ताप , अंगदुखी कमी होईल , खोकला मात्र तसाच राहील किंवा वाढू ही शकतो
पण आठव्या किंवा नवव्या दिवशी मात्र जर त्रास वाढला किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर मात्र इथे उपचारांची किंवा लक्ष ठेवण्याची. तसेच तपासणी करण्याची ही गरज वरील लक्षणांसोबत त्यातच सातव्या दिवशी नंतर किंवा या लक्षणांमध्ये कुठे ही ताप वाढत गेला किव्हा खोकला व श्वास घेण्यास त्रास होत असेल तरच आहे.
कोरोना आहे की इतर आजार आहे हे पुढील गोष्टी समजून घेतल्यास कळेल -
🔶सर्दी खोकला ताप म्हणजे कोरोना नाही
सर्दी खोकला किंवा इतर कुठल्याही कारणाने ताप आला तर कोरोनामुळे आहे का अशी भीती आपल्याला प्रत्येकाला वाटणे सहाजिक आहे. पण कोरोनाची मुख्य लक्षणे समजून घेतल्यास लक्षात येईल की साधा सर्दी-खोकला म्हणजे कोरोना नाही. कोरोनाची मुख्य लक्षणे - कोरडा खोकला, तीव्र स्वरुपाचा ताप त्यानंतर दोन किंवा तीन दिवसांनी श्वास घेण्यास त्रास . यासोबत 1 जानेवारी नंतर कोरोनाग्रस्त देशांमध्ये प्रवास किंवा सध्या भारतातील कोरोनाचे निदान निश्चित झालेल्या रुग्णांची संबंध हा रिस्क फॅक्टर महत्त्वाचा आहे. ताप आणि खोकला इतर कारणांनी असू शकतो. पण कोरोनाग्रस्तांशी संबंध आल्यास व ही लक्षणे असल्यास मात्र आपण सरकारी यंत्रणेशी तपासणी साठी संपर्क साधायला हवा. अंगदुखी ही कोरोनामध्ये कमी प्रमाणात सर्दी खोकला, फ्लू मध्ये जास्त प्रमाणात असतात तसेच शिंका येणे, नाक गळणे, जुलाब हे कोरोनामध्ये नसते पण सर्दी खोकला व फ्लू मध्ये असते.

0
Answer link
कोरोना व्हायरसचा (COVID-19) संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसण्यासाठी साधारणपणे 2 ते 14 दिवस लागू शकतात.
याचा अर्थ असा की, काही लोकांना संसर्ग झाल्यानंतर लवकर लक्षणे दिसू शकतात, तर काही लोकांना लक्षणे दिसायला जास्त वेळ लागू शकतो.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO), बहुतेक लोकांना संसर्ग झाल्यानंतर 5 ते 6 दिवसांच्या आत लक्षणे दिसू लागतात.
लक्षात ठेवा: प्रत्येक व्यक्तीमध्ये लक्षणे दिसण्याचा कालावधी वेगवेगळा असू शकतो.
अधिक माहितीसाठी: