फरक
2 वर्षे झाली गजकर्ण झाले आहे, सगळे पर्याय केले पण काही फरक नाही पडला, काही तरी उपाय सांगा?
2 उत्तरे
2
answers
2 वर्षे झाली गजकर्ण झाले आहे, सगळे पर्याय केले पण काही फरक नाही पडला, काही तरी उपाय सांगा?
6
Answer link
गजकर्ण (Ringworm)
गजकर्ण -
विशिष्ट सूक्ष्मकवकांच्या संसर्गामुळे होणारा त्वचारोग.ट्रायकोफायटॉन रूब्रम, मायक्रोस्पोरमकॅनिस आणि एपिडर्मोफायटॉन फ्लॉकोसम या तीन जातींच्या कवकांमुळे गजकर्ण होतो. प्रामुख्याने डोक्याची त्वचा, हाताचे तळवे, मनगटे, काखा, जांघा, मांड्या, हातापायांच्या बोटांमधील जागा इ. शरीराच्या वेगवेगळ्या भागांत हा रोग होऊ शकतो. या रोगात त्वचेवर वर्तुळाकार किंवा अंगठीप्रमाणे लालसर चट्टे उठतात. हळूहळू त्यावर पांढरे कोंड्यासारखे पापुद्रे तयार होतात. बहुधा त्या भागाला खूप खाज सुटते. शरीराच्या भागानुसार गजकर्णाचे प्रकार ओळखले जातात. उदा. डोक्याच्या गजकर्णाला खवड्या, तर पायाच्या बोटांमधील गजकर्णाला चिखल्या म्हणतात.
लहान मुलांमध्ये गजकर्ण होण्याचे प्रमाण अधिक असते. गजकर्णाचा संसर्ग झालेल्या व्यक्तीचे कपडे, कंगवा व ब्रश वापरल्यास हा रोग होऊ शकतो. स्नानगृह, तरणतलाव, केशकर्तनालय इ. सार्वजनिक माध्यमांतून त्याचा प्रसार होण्याची शक्यता असते. प्राण्यांमध्येदेखील गजकर्ण आढळतो. कोंबड्या, ससे, गायी, मांजरे, कुत्रे, घोडे इ. प्राण्यांत हा रोग दिसून येतो. मात्र या प्राण्यांच्या पिल्लांमध्ये याचे प्रमाण अधिक असते. या प्राण्यांच्या संपर्कामुळेही हा रोग लहान मुलांमध्ये पसरू शकतो.
संसर्ग झालेल्या कवकाच्या प्रकारानुसार गजकर्णावर इलाज केले जातात. कोणत्या प्रकारचा कवक आहे हे सूक्ष्मदर्शकाने ठरविता येते. यासाठी गजकर्ण झालेल्या त्वचेचा लहान तुकडा सूक्ष्मदर्शकाखाली पाहतात. आवश्यकता भासल्यास कवक संवर्धन करतात आणि त्याचा प्रकार ठरवितात.
सॅलिसिलिक आम्ल, बेंझॉइक आम्ल, रिसॉर्सिन, अॅमिडॅझॉल, टेरबिनाफाईन ही मलमे, तसेच काही शॅम्पूंमध्ये असणारे पायरिथिऑन झिंक हे रसायन गजकर्णावर गुणकारी आहेत. संसर्ग आणि लक्षणे यांची तीव्रता जास्त असेल, तर प्रतिजैविक औषधे पोटात घ्यावी लागतात.
उपचार
स्वच्छता ही प्रथम महत्त्वाची आहे. - (रोज आंघोळ करणे, नखे कापणे.)
गजकर्ण, नायटयाचा भाग गरम पाणी व साबणाने स्वच्छ धुऊन नायटा मलम (व्हिटफिल्ड) रोज चोळून लावावे. व्हिटफिल्ड मलमाने सुरुवातीला आग होते, पण दोन-तीन आठवडयांत आराम पडतो व चट्टा जातो. नंतर आठवडाभर तरी मलम लावत राहावे. नाही तर नायटा परत उमटतो. व्हिटफिल्ड मलमापेक्षा मायकोल मलम जास्त चांगले आहे. याचा परिणाम लवकर (10 दिवसांत) होतो.
आयुर्वेद
गजकर्णासाठी उपाय करताना त्वचा कोरडी राहील अशी काळजी घेणे आवश्यक आहे. (अ) गजकर्णाच्या भागावर करंजतेलाचा बोळा घासावा.(ब) या बाह्य उपचाराबरोबर कोठा स्वच्छ राहण्यासाठी त्रिफळा चूर्ण (चमचाभर) कोमट पाण्याबरोबर रोज रात्री याप्रमाणे 10दिवस घ्यावे.
नायटयासाठी आणखी एक पर्यायी बाह्य उपाय म्हणजे बहाव्याची कोवळी पाने वाटून सकाळ- संध्याकाळ लेप द्यावा.
गजकर्णावरील उपचार शक्य तेवढे लवकर सुरू करून, आजारात वाढ व त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणें हा उपचार निरंतर केला पाहिजे. हा उपचार संक्रमणाचे ठिकाण आणि गांभीर्यावर आधारित असते. बुरशीजन्य औषधे बुरशींची वाढ आणि दुपटी रोखू शकतात आणि संपूर्णपणें संक्रमणाला नष्ट करण्यास मदत करू शकतात.
दुकानात सहज मिळणारी बुरशीजन्य औषधे
अधिकतर प्रकरणांमध्ये, बुरशीरोधी लेपन, पूड, फवारणी किंवा लेप लावल्याने संक्रमण 2 ते 4 आठवड्यांत बरा होऊ शकतो. पाय व पोट आणि मांड्याच्या मध्यभागी होणार्र्यावर गजकर्णाच्या उपचारामध्ये पुढील औषधांचा समावेश असू शकतो:
क्लॉट्रिमॅझॉल
मायकॉनाझॉल
टर्बिनाफाइन
कॅटॅनॉकॉनाझॉल
सायक्लोपायरॉक्स यासारखे बुरशीरोधी औषध असलेले नेल वार्निश नखांवरील गजकर्णामध्ये वापरण्यात येते.
मौखिक बुरशीरोधी औषधोपचार
संक्रमण त्वचेच्या मोठ्या भागात पसरलेले असल्यास, मौखिक बुरशीरोधी औषधे गजकर्णावरील उपचारासाठी आवश्यक असतात. डोक्यावरील त्वचेतील गजकर्ण बुरशीरोधी लेपन किंवा फवारणी वापरल्याने बरा होत नाही. पुढल्यासारख्या मौखिक औषधांच्या मदतीने संक्रमण पूर्णपणें बरा व्हायला 1 ते 3 महिने लागतात:
ग्रिझेओफल्व्हिन
टर्बिनाफाइन
आयट्राकॉनाझॉल
फ्लुकॉनाझॉल
सेलेनिअम सल्फाइड आणि केटोकॉनाझॉल असलेले बुरशीरोधी शॅंपू मौखिक औषधांच्या जोडीने डोक्यावरील त्वचेच्या गजकर्णासाठी वापरल्या जातात.
जीवनशैली व्यवस्थापन
उपचारपद्धतींशिवाय, जीवनशैली बदलूनही गजकर्णाची सोय केली जाऊ शकते. निरोगी सवयी काटकोरपणें पाळून आणि योग्य दैनंदिन स्वच्छता राखून गजकर्णाला शरिराचे इतर भाग किंवा लोकांमध्ये पसरण्यास रोखता येते.
शरिराच्या इतर भागांमध्ये संक्रमणाचे पसार टाळण्यासाठी गजकर्णाने प्रभावित त्वचेला स्पर्श केल्यानंतर हात साबण आणि पाणीने स्वच्छ धुवावे.
स्वच्छ ठेवण्यासाठी, प्रभावित क्षेत्र निरंतर धुवावे.
एथ्लीट्स फुटच्या बाबतीत, संक्रमित भाग कोरडा ठेवण्यासाठी मोजे किंवा बूट घालणें टाळावे, कारण बुरशीची वाढ आणि दुपटी उष्णता आणि आर्द्रतेमुळे वाढतात. तसेच, आर्द्र खोल्या, लॉकर रूम आणि सार्वजनिक स्नानगॄहांमध्ये अणवाणी जाणें टाळावे आणि चपला घालाव्यात, जेणेकरून इतरांप्रत संक्रमण पसरणार नाही.
स्वच्छ आणि कोरडे कपडे (विशेष करून सुती कपडे) आणि अंतर्वस्त्रे ही घालावीत.
खाजगी प्रकारच्या वस्तू इतर लोकांशी वाटू नयते.
आपण नियमित काही वेळ व्यायाम करावे आणि निरोगी राहाल असे वजन ठेवावे.
गजकर्ण साठी औषधे
गजकर्णाला अनेक औषधे उपलब्ध आहेत. या सर्व औषधे खाली दिल्या आहेत. परंतु लक्षात ठेवा आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय आपण कोणतीही औषधे घेत नाही. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेतल्याने तुमच्या आरोग्यास गंभीरपणे नुकसान होऊ शकते

Reference
https://www.myupchar.com/mr/disease/ringworm
http://mr.vikaspedia.in/health/93094b917-935-90691c93e930/92494d93591a93e-93094b917/92893e92f91f93e-91791c91593094d923
http://mr.vikaspedia.in/health/93094b917-935-90691c93e930/907924930-90691c93e930/91791c91593094d923-ringworm
0
Answer link
वैद्यकीय उपचार:
- ॲंटिफंगल क्रीम (Antifungal cream): डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ॲंटिफंगल क्रीम लावा.
- ॲंटिफंगल औषधे (Antifungal medicines): डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ॲंटिफंगल औषधे घ्या.
घरगुती उपाय:
- हळद (Turmeric): हळदीमध्ये असलेले अँटीसेप्टिक गुणधर्म गजकर्णावर प्रभावी ठरतात. हळदीचा लेप लावल्याने आराम मिळतो.
- कडुनिंब (Neem): कडुनिंबाच्या पानांमध्ये अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. कडुनिंबाची पाने पाण्यात उकळून त्या पाण्याने त्वचा धुवा.
- लसूण (Garlic): लसणामध्ये नैसर्गिक अँटीफंगल गुणधर्म असतात. लसणाची पेस्ट लावल्याने गजकर्ण कमी होतो.
- कोरफड (Aloe vera): कोरफडीचा गर लावल्याने त्वचेला थंडावा मिळतो आणि खाज कमी होते.
- नारळ तेल (Coconut oil): नारळ तेल लावल्याने त्वचा मॉइश्चराइज राहते आणि गजकर्ण कमी होण्यास मदत होते.
इतर उपाय:
- स्वच्छता (Cleanliness): प्रभावित भाग स्वच्छ आणि कोरडा ठेवा.
- कपडे (Clothes): रोज आपले कपडे बदला आणि ते धुवून उन्हात वाळवा.
- संसर्ग टाळा (Avoid infection): इतरांचे कपडे वापरणे टाळा, त्यामुळे संसर्ग टाळता येऊ शकतो.
टीप:
- घरगुती उपाय हे केवळ प्राथमिक उपचार आहेत.
- दोन वर्षांपासून गजकर्ण असल्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
Disclaimer: या उपायांमुळे आराम मिळू शकतो, परंतु डॉक्टरांचा सल्ला घेणे अधिक महत्त्वाचे आहे.
Related Questions
एक ते वीस पर्यंतच्या सर्व संयुक्त संख्यांची बेरीज व मूळ संख्यांची बेरीज यांच्यातील फरक किती?
1 उत्तर