भूगोल जिल्हा तालुका तालुका माहिती

महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्याची माहिती द्या?

2 उत्तरे
2 answers

महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्याची माहिती द्या?

1
भौगोलिक माहिती

पाथरी हा परभणी जिल्ह्यातील महत्वाचा तालुका आहे.

पाथरी तालुक्याचे मुख्यालय पाथरी हे शहर असून तेथे नगरपालिका आहे.

लोकसंख्या विषयक माहिती

ते १९.२५ अंश उत्तर रेखावृत्त व ७६.४५ अंश पूर्व अक्षवृत्तावर आहे. २०११ च्या जणगणनेनुसार पाथरी शहराची लोकसंख्या ३६८५३ असून त्यापैकी पुरुष १९०२५ व स्त्रिया १७८२८ आहेत. पाथरी शहरातील लोकसंख्येप्रमाणे स्त्री पुरुष प्रमाण ९३७ इतके आहे. शहराचा साक्षरता दर ७८.२० % इतका आहे. अनुसूचित जातीची टक्केवारी १२.०४ % तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या ०.८३ % आहे.

वाहतूक विषयक माहिती

पाथरी हे शहर राष्ट्रीय महामार्ग २२२ ( कल्याण ते निर्मल) वर स्थित आहे. सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन मानवत रोड हे १७ किमी अंतरावर आहे. हे शहर जिल्हा मुख्यालय परभणी पासून पश्चिमेला ४३ किमी अंतरावर आहे. आणि विभागीय मुख्यालय औरंगाबाद पासून १५१ किमी वर आहे. सर्वात जवळचे विमानतळ औरंगाबाद येथे आहे.

पाथरी तालुका

पाथरी तालुक्याच्या पूर्व दिशेला मानवत तालुका, पश्चिम दिशेला माजलगाव तालुका, उत्तर दिशेला सेलु तालुका, उत्तर दिशेला परतूर तालुका आहे. पाथरी तालुक्यात ७३ गावे आहेत.

पाथरी
परभणी जिल्ह्यातील एक तालुका
इतर भाषांत वाचा
पहारा
संपादन करा
गुणक: 19°15′0″N 76°27′0″E / 19.25°N 76.45°E
  ?पाथरी
महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
गुणक: 19°15′0″N 76°27′0″E / 19.25°N 76.45°E
प्रमाणवेळ
भाप्रवे (यूटीसी+५:३०)
भाषा
मराठी
तहसील
पाथरी
पंचायत समिती
पाथरी
उत्तर लिहिले · 22/2/2020
कर्म · 3860
0
मी तुम्हाला परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्याबद्दल माहिती देतो:
पाथरी तालुका, परभणी जिल्हा

पाथरी तालुका हा महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील एक तालुका आहे.

  • भौगोलिक स्थान: पाथरी तालुका परभणी जिल्ह्याच्या पश्चिम दिशेला आहे.
  • लोकसंख्या: पाथरी तालुक्याची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार १,६६,७०४ आहे.
  • प्रशासन: पाथरी तालुक्यात एक नगरपालिका आणि ८७ ग्रामपंचायती आहेत.
  • अर्थव्यवस्था: पाथरी तालुक्यातील अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेतीवर आधारित आहे. ज्वारी, बाजरी, कापूस, सोयाबीन आणि तूर ही येथील प्रमुख पिके आहेत.
  • शिक्षण: पाथरी तालुक्यात अनेक प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा आणि उच्च माध्यमिक विद्यालये आहेत.
  • पर्यटन: पाथरीमध्ये अनेक धार्मिक स्थळे आहेत, ज्यात साईबाबा मंदिर, दत्त मंदिर आणि विठ्ठल मंदिर यांचा समावेश होतो.

पाथरी शहराबद्दल अधिक माहिती:

  • पाथरी हे एक ऐतिहासिक शहर आहे.
  • शिर्डीचे साईबाबा यांचे जन्मस्थान पाथरी असल्याचा दावा केला जातो.
  • येथे दरवर्षी साईबाबा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

तुम्हाला पाथरी तालुक्याबद्दल आणखी काही माहिती हवी असल्यास, तपशीलवार प्रश्न विचारा.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 2200

Related Questions

तळा तालुक्याबद्दल माहिती?
सातारा जिल्ह्यातील माण तालुक्याबद्दल संपूर्ण माहिती?
शिरूर तालुक्याविषयी माहिती मिळेल का?
बार्शी तालुक्याविषयी माहिती मिळेल का?