भूगोल तालुका तालुका माहिती

बार्शी तालुक्याविषयी माहिती मिळेल का?

2 उत्तरे
2 answers

बार्शी तालुक्याविषयी माहिती मिळेल का?

1
जुन्या काळी "भगवंताची नगरी" म्हनुन बार्शी ची ओळख आढळते. बार्शी हे भगवंत मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. भगवंत मंदिर हे विष्णु देवाचे मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट म्हणजे भारतातील एकमेव विष्णु मंदिर आहे. इ.स. १२४५ साली हेमाडपंथी शैलीने हे मंदिर बांधण्यात आले.तसेच संपूर्ण आशिया खंडातील हेमाड हया पाषाणामधील कोरलेले एकमेव मंदिर आहे. मंदिरास प्रत्येक दिशेने प्रवेशद्वार आहे, मुख्य द्वार पूर्वमुखी आहे.गाभाऱ्यात गरुड़खांब आहे. चैत्र, मार्गशीष, आषाढी व कार्तिकी एकादशीस भक्तगण दर्शनासाठी येतात. आषाढी व कार्तिकी एकादशीस गरुडस्वार भगवंताची मिरवणुक शहरातुन काढली जाते. प्रत्येक पुर्णिमेस छबीना बाहेर नेह्ण्यात येतो. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारा समोर एका भगवंत भक्ताची समाधी आहे. एकूण 12 भगवंताची मंदिरे असल्यामुळे बार्शी हे नाव पडल्याची आख्यायिका आहे.

इतर आकर्षणे

बार्शी शहरापासून २३ कि.मी वर श्री संतनाथ नगरी आहे. ज्‍याला वैराग असे म्‍हटले जाते. वैराग हे वैराग्‍याची भुमी म्‍हणुन ओळखले जाते. येथे श्री संतनाथ महाराज यांची समाधी आहे. वैरागचा दर बुधवारी बाजार भरतो. वैराग मधील शेळीचा बाजार प्रसिद्ध आहे. वैराग हे ठिकाण आता एक शिक्षणाच्‍या दष्‍टीने वाडत आहे. येथे सौ. सुवर्णलता गांधी महाविदयालय, विदयामंदीर कॉलेज असे काही मोठी कॉलेजेस व महाविदयालये आहेत. वैराग मध्‍ये भोगावती सहकारी साखर कारखाना आहे.

वैराग पासुन १३ कि.मी वर माढा रोड वर तडवळे हे ठिकाण आहे. येथे श्री भगवती मातेचे मंदीर आहे. हे मंदीर भव्‍य असुन या देवी ची अशी कथा सांगितली जाते कि या देवी ची मुर्ती ही गावातील भोगावती नदीत सापडली असुन ती मुर्ती त्‍यावेळी तळहता एवढया आकाराची होती, व सध्‍या हि मुर्ती 5 ते साडे पाच फुड एवढया आकाराची आहे. ही मुर्ती अगदी तुळजापुरच्‍या देवी प्रमाणे असुन, या देवीची तुळजापुरच्‍या देवी प्रमाणे पौर्णीमेला यात्रा भरते. पौर्णीमेला पुर्ण गावातुन देवीचा छबिणा काढला जोतो. गावातील भगवती माता हि जागृत देवी असुन गावातील लोकांची गावकर्यांची खुप श्रध्‍दा आहे. भगवती माते ची मिरवणुक ही भव्‍या असते. गावच्‍या यात्रेस परगाव चे लोग येतात. तडवळे हे गाव भोगावती नदीकाठी असुन,यावली व ढोराळे गावान‍जीक आहे.

उत्तर लिहिले · 9/10/2018
कर्म · 9150
0

बार्शी तालुका, महाराष्ट्र राज्याच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. या तालुक्याविषयी काही माहिती खालीलप्रमाणे:


भूगोल:

  • बार्शी तालुका सोलापूर जिल्ह्याच्या उत्तर-पश्चिम दिशेला आहे.
  • या तालुक्याच्या पूर्वेला उस्मानाबाद जिल्ह्याची सीमा आहे.

लोकसंख्या:

  • बार्शी तालुक्याची लोकसंख्या सुमारे ३ लाखांपेक्षा जास्त आहे.
  • येथे मराठी भाषिक लोक जास्त आहेत.

अर्थव्यवस्था:

  • बार्शी तालुका हा मुख्यतः कृषीप्रधान तालुका आहे.
  • येथील प्रमुख पिके ज्वारी, बाजरी, ऊस आणि डाळिंब आहेत.
  • बार्शीमध्ये मोठी बाजारपेठ असल्यामुळे आसपासच्या गावांतील लोकांची येथे नेहमी वर्दळ असते.

शिक्षण:

  • बार्शी तालुक्यात अनेक प्राथमिक व माध्यमिक शाळा आहेत.
  • उच्च शिक्षणासाठी इथे महाविद्यालये देखील उपलब्ध आहेत.

पर्यटन:

  • बार्शीमध्ये भगवंत मंदिर (Bhagwant Temple) नावाचे प्रसिद्ध दैवत आहे
  • येथे अनेक ऐतिहासिक इमारती आणि धार्मिक स्थळे आहेत.

प्रशासन:

  • बार्शी हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे.
  • येथे तालुकास्तरीय शासकीय कार्यालये आहेत.
  • गावांचा कारभार ग्रामपंचायतीमार्फत चालतो.

अधिक माहितीसाठी, आपण सोलापूर जिल्ह्याच्या शासकीय वेबसाइटला भेट देऊ शकता: solapur.gov.in

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 2200

Related Questions

तळा तालुक्याबद्दल माहिती?
सातारा जिल्ह्यातील माण तालुक्याबद्दल संपूर्ण माहिती?
महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्याची माहिती द्या?
शिरूर तालुक्याविषयी माहिती मिळेल का?