समाजशास्त्र लग्न मानसिक स्वास्थ्य

आजकाल मुलामुलींचे लग्न जमवणे कठीण होऊन बसले आहे का आणि याची कारणे काय?

3 उत्तरे
3 answers

आजकाल मुलामुलींचे लग्न जमवणे कठीण होऊन बसले आहे का आणि याची कारणे काय?

24
🤣🤣🤣🤣 कारण आजकाल कोणीच एका जागेवर स्थिर नाही. प्रत्येकाला gf/bf आहेच..आणि एकच नसून भरपूर आहेत..आणि लग्न ठरवलं आणि ते झालं किंवा लग्नातच मुलगा/मुलगी पळून गेली तर दोष कोणाला देणार?? आणि लग्न झाल्यानंतर पण संसार नीट करतील ह्याची गॅरंटी काय? मुळात आजकालच्या जगात लग्न करणे हेच खूप मोठी चूक आहे.. कधी कोण फसवेल किंवा खोटं बोलेल गॅरंटी नाही...
उत्तर लिहिले · 11/2/2020
कर्म · 3750
17
आज काल मुलामुलींचे लग्न जमविणे काठीण होत आहे .. बरोबर आहे तुम्ही जे म्हणाले.. याचे कारण असे आहे की माझ्या मते या साठी सध्या परिस्थिति पाहता मुलींचे घरचे कुटुंबिय जवाबदार आहेत..
सर्व मुलींच्या पलकांना आपला जवाई well setaled हवा आहे.. मग ती मुलगी फ़क्त 10 वि किंवा 12 वि च शिकलेली का असुदे ना.. पण सर्वांना आपला नवरा नोकरी वर असावा.. त्याच्या जवळ पैसा असावा.. शेती असावी..  पण शेतात जाणारा नसावा..  शेतकरी नसावा.. लाज वाटते ना सांगायला की माझा नवरा शेतकरी आहे.. गवंडि मिस्त्री आहे.. XYZ.. परंतु या मुळे काय होते.. वेळ निघुन जातो आणि जो मुलगा बिचारा हुशार पण सध्या पैशाने मागे असलेला तो सुद्धा कोनाशी तरी लग्न करून मोकळा झालेला असतो.. परंतु त्याला त्याच्या उच्च शिक्षणाचा फायदा दोन्ही कड़े होत नाही कारण तो जरी ग्रेजुएट असला तरि सरकारी नोकरी वर नसतो.. आणि त्याची मनापासून इच्छा असते की मला पण बायको उच्च शिक्षित मिळावी.. जी त्याला संसारात काही मदत करू शकेल.. परंतु नाइलाजाने आता च्या काळात.. नोकरी वर असलेल्या मुलाशि कमी शिकलेली आणि खुप जास्त शिकलेली या दोन्ही प्रकारच्या मूली म्हणजेच त्यांचे पालक त्याचं लग्न लाउन देण्यास इच्छुक असतात.., म्हणून शिक्षण करत असलेला मुलगा.. परंतु नोकरी वर न लागलेला मुलगा.. आणि लग्नाचे वय झालेला मुलगा.. यांचा कोणी विचार करत नाही.. नोकरी म्हणजे सर्व काही नस्त .. आज जर चांगला शिकलेला मुलगा आणि त्याला जर एखाद्या चांगल्या शिकलेल्या मुलीने स्वीकार केल म्हणजे लग्न केले.. तर नक्कीच भविष्यात ते दोघ खुप काही करू शकतील आणि नोकरी वाल्यां पेक्षा यशस्वी होउ शकतील..
आज जर मुलीचे वडील जर 25.. 26 वर्ष्याच्या मुलाला म्हणतिल की तुझ्याकडे शेती किती..? घर स्वताच ते पण छान बंधलेले आहे का..? पैसा किती..? गाड़ी वगेरे ? कमाई किती ?

अश्या प्रशांचे उत्तर अजुन मुलाचा बाप सुद्धा देऊ शकत नाही.. कारण साधारण पणे मुलगा शिक्षण करून कोणत्याही privet जॉब वर 23.. व्या वर्षी पासून लागु शकतो .. 500 rs. रोज जरी म्हटल तरी 15000 च्या वर कमाई करू शकत नाही आणि कोण गाड़ी.. बंगला .. शेती.. घेऊ शकतो हो वयाच्या 26 .. 27 व्या वर्षी ..??

आणि नोकरी वर असलेल्या वाइट मुलाच्या हाथी हाथ द्यायला सुद्धा मागे पुढे पाहत नाहीत मुलीचे आई बाप..
दारू पितो.. हे माहित असून स्वतः म्हणतिल .. नोकरी आहे तर असतो माणसाला एखादा शौक.. दारू , सिगरेट , तम्बाखू याची तर नोकरी वाल्या मुलाला सूट दिली असते मुलींच्या घरच्यांनी.. का..? कारण जवाई नोकरी वाला आहे म्हणून..  वरुन तो नोकरी वाला जवाई भामट्या वाणी भिकारचोटा वाणी हुंडा पण खुप मागतो आणि मुलींच्या बिचाऱ्या वडिलांना काहीही करून हुंडा द्यावा लागतो..
एक वेळ नोकरी वर नसलेला मुलगा म्हणेल की मला हुंडा घ्यायचा नाही.. परन्तु नोकरी वाल्यापैकी बरेचशे हुंडयासाठी तोंड फाड़तात. (भिकार चोट)

मुलीच भल होईल म्हणून हे सर्व अजुन सुरूच आहे..

हे बघा सर्व मूल सारखे नसतात , म्हणजे आज जर कोणी नोकरी वर जरी नसला तरी तो पुढे जीवनात खुप काही चांगल करु शकतो.. परंतु त्याला योग्य साथीदाराची साथ लाभणे ही तेवढेच महत्वाचे असते..

मुलींचे लग्न करतांना मुला जवळ काय आहे हे न बघता मुलगा कसा आहे , काय करतो , कसा राहतो , कोणतेही व्यसन नसणारा.. , नोकरी नसली तरी शिकलेला , स्वभावने चांगला , आणि आपल्या मुलीला शोभेल असा जेव्हा मुलगा मुलीचे पालक शोधनार ना तेव्हा लग्न जुळवणे सोपे जाणार आणि दोघ पण आनंदी राहतील याची मला खात्रि आहे..
उत्तर लिहिले · 13/2/2020
कर्म · 5485
0

आजकाल मुलामुलींचे लग्न जमवणे कठीण झाले आहे, ह्याची काही कारणे खालीलप्रमाणे आहेत:

  • उच्च अपेक्षा: आजकाल मुले आणि मुली दोघांच्याही अपेक्षा वाढल्या आहेत. त्यांना शिक्षण, नोकरी, तसेच दिसण्यामध्ये आकर्षक जोडीदार हवा असतो.
  • आर्थिक स्वातंत्र्य: स्त्रियासुद्धा आता आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना लग्नासाठी পুরুষের উপর अवलंबून राहावे लागत नाही. त्या स्वतःच्या शروطानुसार জীবনসঙ্গী निवडू इच्छितात.
  • नोकरी आणि शिक्षण: अनेक मुले आणि मुली शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी शहरांमध्ये किंवा परदेशात जातात. त्यामुळे त्यांच्या ओळखीच्या लोकांचे वर्तुळ लहान होते आणि त्यांना योग्य जोडीदार शोधणे कठीण होते.
  • सामाजिक बदल: समाजामध्ये आता प्रेमविवाह आणि लिव्ह-इन रिलेशनशिपसारख्या गोष्टींना जास्त मान्यता मिळत आहे. त्यामुळे अनेकजण पारंपरिक पद्धतीने लग्न करण्याऐवजी स्वतःच्या आवडीनुसार जोडीदार निवडतात.
  • जातिभेद: आजही अनेक कुटुंबांमध्ये जाती आणि धर्मानुसार लग्न करण्याची अट असते. त्यामुळे योग्य जोडीदार शोधणे कठीण होते.
  • तलाक: घटस्फोटाचे प्रमाण वाढल्यामुळे लोकांना लग्न करण्याबद्दल भीती वाटते.

या काही कारणांमुळे आजकाल मुलामुलींचे लग्न जमवणे कठीण झाले आहे.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 960

Related Questions

माणसाच्या मनात अति विचार का येतात?
मानसिक स्वास्थ्य व एकाग्रता वाढवण्यासाठी काय केले पाहिजे?
जुने दिवस मला परत मिळतील काय? मी बर्‍याच गोष्टी गमावून बसलो आहे का? माझ्या हाती काहीच नाही? ज्या वयात मला यश आले पाहिजे होते ते आले नाही? अजूनही मी दुसर्‍यावर अवलंबून आहे असं मला वाटतं? मला चांगल्या दुनियेत जायचं आहे?
माझे वय 16 आहे. मला काही जास्त काम केले की डोक्याला मुंग्या येतात, चालताना तोल जातो, काही काम करायचं मन होत नाही आणि तोंडाची चव कडू झाली आहे, यावर काय करावे?
मनाला सदा घडावी अशी कोणती गोष्ट आहे?
लहान मुलांशी मोठी माणसे बोबडी का बोलतात?
स्वतःचा विश्वास स्वतःवर ठेवणे म्हणजे काय?