उपयोगितेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा?
उपयोगितेची वैशिष्ट्ये
1. सापेक्ष संकल्पना-
उपयोगिता ही स्थल कालाशी संबंधित असते. म्हणजेच काळानुसार व स्थळानुसार उपयोगी तेत बदल होत असतो.)
2. व्यक्तिनिष्ठ संकल्पना-
एखाद्या वस्तूची उपयोगिता सर्व व्यक्तींसाठी सारखी नसते ती व्यक्तीनुसार बदलते कारण लोकांची रुची, पसंती, आवड - निवड यामध्ये फरक असतो.)
3. नैतिकदृष्ट्या तटस्थ -
उपयोगितेच्या संकल्पनेत नैतिकतेचा विचार केला जात नाही. उपयोगिता नैतिक दृष्ट्या तटस्थ असते. ज्या वस्तूंमध्ये उपयोगिता असते ती कोणतीही गरज भागू शकते. ही उपयोगिता चांगले किंवा वाईट, नैतिक किंवा अनेतिक असा फरक करीत नाही.)
4. उपयोगीता हिंदी म्हणजे उपयुक्तता नव्हे-
उपयोगिता म्हणजे वस्तू मधील गरज भागवण्याची क्षमता होय . तर उपयुक्तता म्हणजे वस्तूंपासून उपभोक्त्याचे होणारे हीत होय. उपयोगिता व्यक्तींच्या समाधानाची पातळी व्यक्त करते आणि उपयुक्तता वस्तूंचे उपयोग मूल्य दर्शवते. ज्या वस्तूंमध्ये उपयोगिता असते ती उपयुक्त असलेच असे नाही.)
5. उपयोगिता म्हणजे आनंद नव्हे-
उपयोगिता आणि आनंद या दोन्ही संकल्पना वेगवेगळे आहेत. वस्तूंमध्ये उपयोगिता असली तरी तिचा उपभोग आनंद किंवा सुख देणारा असतोच असे नाही .)
6. उपयोगिता व समाधान वेगवेगळे आहेत-
(योगिता व समाधान या जरी परस्पर संबंधीत संकल्पना असल्या , तरी त्यात फरक आहे. उपयोगिता म्हणजे मानवी गरज भागवण्याची क्षमता होय. तर समाधान म्हणजे व्यक्तीला होणारी सुखाची जाणीव होय. म्हणजेच उपयोगिता वस्तूशी संबंधित असते. तर समाधान हे व्यक्तीकडून अनुभवले जाते . उपयोगिता हे अपेक्षित असे समाधान असते. तर समाधान ही प्रत्यक्ष अनुभूती असते.)
7. मापण करणे कठीण -
( उपयोगिता ही मानसशास्त्रीय संकल्पना आहे. अदृष्य आणि अमूर्त आहे. तिचे संख्यात्मक म्हणजेच अंकांमध्ये मापन करता येत नाही. परंतु एखादी व्यक्ती अंदाजाने उपयोगिता मापन करू शकते)
8. गरजेच्या तीव्रते वर अवलंबून असते=( वस्तूची उपयोगिता ही व्यक्तीच्या गरजेची त्री वता किंवा निकड यावर अवलंबून असते. जेवढी गरजेची त्री वता तेवढी उपयोगिता अधिक असते. गरजेची त्रिवता कमी झाल्यास उपयोगिता कमी होते.)
9. मागणीचा आधार -
( उपयोगिता मागणीचा आधार आहे. एखाद्या वस्तूमध्ये उपयोगिता नसेल तर व्यक्ती त्या वस्तूसाठी मागणी करणार नाही. जर ती वस्तू उपयोगिता देणारी असेल तरच व्यक्ती त्या वस्तूसाठी मागणी करेल.)
उपयोगितेचे प्रकार
1. रूप उपयोगिता (जेव्हा एखाद्या अस्तित्वात असलेल्या वस्तूचे आकारमान किंवा स्वरूप बदलल्यामुळे उपयोगिता वाढते, तेव्हा त्यास रूप उपयोगिता असे म्हणतात)
2. स्थल उपयोगिता (जेव्हा वस्तूचा वापर करण्याच्या जागेत बदल झाल्यामुळे उपयोगिता वाढते तेव्हा त्यास स्थल उपयोगिता असे म्हणतात. )
3 . काल उपयोगिता( काळानुसार वस्तूमध्ये जि उपयोगिता निर्माण होते त्यास काल उपयोगिता म्हणतात.)
4. सेवा उपयोगिता( जेव्हा समाजातील विविध घटकांना द्वारे इतरांना व्यक्तिगत सेवा पुरविण्यात येतात. तेव्हा सेवा उपयोगिता निर्माण होते.)
5. ज्ञान उपयोगिता ( जेव्हा उपभोक्ता विशिष्ट वस्तूबद्दल ज्ञान प्राप्त करतो तेव्हा त्याची ज्ञान उपयोगिता वाढते.)
6. स्वामित्व उपयोगिता( वस्तूंची मालकी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे स्थलांतर होते तेव्हा स्वामित्व उपयोगिता निर्माण होते.)
1. व्यक्तिनिष्ठ संकल्पना (Subjective concept):
उपयोगिता ही व्यक्तिनिष्ठ असते, कारण ती एका व्यक्तीनुसार बदलते. एखाद्या वस्तूतून मिळणारी उपयोगिता प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळी असू शकते, हे आवडीनिवडी, गरजा आणि प्राधान्ये यावर अवलंबून असते.
2. सापेक्ष संकल्पना (Relative concept):
उपयोगिता वेळ आणि स्थळानुसार बदलते. एका विशिष्ट वेळी एखाद्या वस्तूची उपयोगिता जास्त असू शकते, तर दुसऱ्या वेळी ती कमी होऊ शकते. तसेच, एका ठिकाणी एखाद्या वस्तूची उपयोगिता जास्त असू शकते, तर दुसऱ्या ठिकाणी ती कमी असू शकते.
3. गरजेची तीव्रता (Intensity of need):
उपयोगिता वस्तूच्या गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते. ज्या वस्तूची गरज जास्त असते, त्या वस्तूची उपयोगिता जास्त असते. उदाहरणार्थ, तहानलेल्या व्यक्तीसाठी पाण्याची उपयोगिता जास्त असते.
4. उपयुक्तता आणि उपयोगिता भिन्न (Usefulness and Utility are different):
उपयोगिता म्हणजे वस्तू वापरण्याची क्षमता. एखादी वस्तू उपयुक्त नसली तरी, ती उपयोगी असू शकते. उदाहरणार्थ, सिगारेट आरोग्यासाठी उपयुक्त नसली तरी, व्यसन असणाऱ्या व्यक्तीसाठी ती उपयोगी असू शकते.
5. उपयोगिता मोजता येत नाही (Utility cannot be measured):
उपयोगिता ही एक मानसिक संकल्पना आहे, त्यामुळे ती आकडेवारीत मोजता येत नाही.utility फक्त अनुभवली जाऊ शकते.
6. उपयोगिता मागणी निर्माण करते (Utility creates demand):
ज्या वस्तूमध्ये उपयोगिता असते, त्या वस्तूला मागणी निर्माण होते.utility मागणीचा आधार आहे.