Topic icon

उपयुक्तता

0

रेडीमेड शर्टसोबत जास्तीचे बटण देण्याची काही कारणे खालीलप्रमाणे आहेत:

  • बटण तुटल्यास: शर्ट वापरताना अनेकवेळा बटण तुटण्याची शक्यता असते. अशा वेळी, शर्टाला जुळणारे अतिरिक्त बटण असल्यास ते लावता येते आणि शर्ट फेकून देण्याची गरज नाही.
  • रंग आणि डिझाइनची जुळवाजुळव: कधीकधी, तयार कपड्यांचे बटण हरवल्यास किंवा खराब झाल्यास, बाजारात तसे रंग आणि डिझाइनचे बटण मिळणे कठीण होते. त्यामुळे, जास्तीचे बटण उपयोगी ठरते.
  • काळजीपूर्वक वापर: उत्पादक (Manufacturers) आपल्याला आठवण करून देतात की, तुमच्या आवडत्या वस्तूची (शर्ट) काळजी घ्या.

थोडक्यात, जास्तीचे बटण हे एक सोयीचे उपाय आहे ज्यामुळे शर्ट जास्त काळ वापरता येतो.

संदर्भ:

उत्तर लिहिले · 5/4/2025
कर्म · 980
3
तुमच्या गॅस सिलिंडरचे पुस्तक हरवले असेल आणि तुम्हाला नवीन सिलिंडर घ्यायचा असेल, तर तुम्ही मूळ सिलिंडरचा पुरवठा करणाऱ्या गॅस कंपनीशी संपर्क साधावा. ते तुम्हाला नवीन सिलिंडर देण्यास आणि त्यासाठी नवीन पुस्तक देण्यास सक्षम असावेत. नवीन सिलिंडर मिळविण्यासाठी, तुम्हाला मालकीचा किंवा ओळखीचा पुरावा द्यावा लागेल. तुम्ही नवीन सिलिंडर आणि पुस्तक मिळवण्याशी संबंधित कोणतेही शुल्क भरण्यास तयार असले पाहिजे.
उत्तर लिहिले · 7/1/2023
कर्म · 5510
2
घोंगडी अंथरायला,(अंगाखाली घ्यायला) हि वापरतात आणि पांढरा मला (अंगावर घ्यायला) हि वापरतात त्या घोंगडी मध्ये उन्हाळ्यात थंडावा मिळतो.*धनगरी घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे व धार्मिक महत्त्व!*
आज आधुनिकीकरणामूळे बहुतेकजणांना धनगरी घोंगडी काय असते ते कदाचित माहितही नसावे. नाशिक जिल्ह्यात या धनगरी घोंगडीला "जिन" म्हणतात असे पुसटसे आठवतेय!

सर्वप्रथम ही धनगरी घोंगडी कशी तयार होते यांच्या बद्दल थोडसं जाणून घेऊ…!

गावच्या किंवा रानामाळाच्या ठिकाणी तलाव, नदी, नाले, अशा ठिकाणी मेंढ्यांना स्वच्छ धुतलं जातं. नंतर स्वछ ठिकाणी त्यांच्या अंगावरील लोकर कातरली जाते. कातरलेली लोकर पिंजुन त्यातील काळी-पांढरी लोकर वेगळी केली जाते. त्यानंतर चरख्यावर लोकरीपासून सूत कातलं जातं. सुताला चांगला पीळ,मजबुती यावी आणि घोंगडी विणायला सोपं जावं यासाठी त्याला रात्रभर भिजवलेल्या चिंचोक्यांच्या खळीमदे भिजत ठेवलं जातं. त्यामध्ये हळद आणि आयुर्वेदिक वनस्पतींचा अर्क मिसळला जातो. साधारणपणे एक घोंगडी विणायला दोन ते तीन दिवस लागतात. पूर्वी १२ फूट लांबीची घोंगडी विणली जात असे, पण आता मात्र आपल्या मागणीनुसार हवी अशी बनवून दिली जाते. सर्वसाधारणपणे एक घोंगडी विणायला ३ ते ४ किलो लोकर लागते.. मेंढ्यांच्याच लोकरीपासून घोंगडी का बनवली जाते असे प्रश्न बर्‍याचदा आपल्या पडत असतील तर तर त्याचे उत्तर म्हणजे मानवी जीवनात घोंगडी हि एक औषधी आहे!

*धनगरी घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे-*

पाठदुखी, कंबरदुखी, वात, सांधेदुखीमध्ये यांपासून आराम मिळतो. यामध्ये जेण (घोंगडीचाच एक जाड प्रकार) वापरणे जास्त योग्य ठरते.

झोप येत नसणार्‍यांसाठी तर हे एक उत्तम औषधच आहे घोंगडीवर झोपल्याने शांत झोप लागते.

उच्च रक्तदाब नियंत्रणात येण्यास मदत होते.

कांजण्या, गोवर, तापातही घोंगडीचा वापर करतात.

घोंगडीवर झोपल्याने लहान मुलांचा अस्थमा दूर होतो. .

हिवाळ्यात ऊब तर उन्हाळ्यात थंडावा देते.

घोंडीवर झोपल्याने साप, विंचू, मुंगी, गोम, मधमाशा, ढेकूण जवळ येत नाहीत.

अर्धांगवायूचा धोका टळतो..आणि मधुमेह कमी होण्यास मदत होते.

धार्मिकदृष्ट्या पूर्वीपासून घोंगडी चे महत्व: 🕉️🛐🔱☮️
पूर्वी ध्यानधारणा करण्यासाठी , धार्मिक अनुष्ठान करण्या साठी घोंगडी वापराला अनन्य साधारण महत्व होत. तसा उल्लेखही पूर्वीचा माहितीत आढळतो. स्वतः शिव मल्हारांचा पेहरावा मध्ये घोंगडीचा वापर होता. 
घोंगडीचा वापरामुळे बॉडी टेम्प्रेचर आणि शारीरिक ऊर्जा कंट्रोल मध्ये राहत असल्यामुळे घोंगडीवर केलेल्या साधनेमुळे अत्युच्च समाधान मिळते. श्री गुरुलीलामृत, श्री गुरुचरित्र पारायण, श्री दुर्गा सप्तशती इ. तसच इतर सर्व साधना आणि मंत्रांचा अनुष्ठानासाठी घोंगडी चा उपयोग करु शकता. 
वारकरी संप्रदाय मध्येही घोंगडी वापरला अत्यंत महत्व आहे.घोंगडी वापराचे फायदे
उन्हाळ्यात थंडावा देते. घोंडीवर झोपल्याने साप, विंचू, मुंगी, गोम, मधमाशा, ढेकूण असे किटक व प्राणी जवळ सुद्धा येत नाहीत तसेच अर्धांगवायूचा धोका सुद्धा घोंगडीमुळे टळतो आणि मधुमेह कमी होण्यास मदत होते. असे अनेक फायद्याचे गुणधर्म असलेली घोंगडी अध्याच्या धावपळीच्या जीवनात दिसेनासी झाली









 गावच्या किंवा रानामाळाच्या ठिकाणी तलाव, नदी, नाले, अशा ठिकाणी मेंढ्यांना स्वच्छ धुतलं जातं. नंतर स्वच्छ ठिकाणी त्यांच्या अंगावरील लोकर कातरली जाते. कातरलेली लोकर पिंजुन त्यातील काळी- पांढरी लोकर वेगळी केली जाते. त्यानंतर चरख्यावर लोकरीपासून सूत कातलं जातं. सुताला चांगला पीळ, मजबुती यावी आणि घोंगडी विणायला सोपं जावं यासाठी त्याला रात्रभर भिजवलेल्या चिंचोक्यांच्या खळीमध्ये भिजत ठेवलं जातं. त्यामध्ये हळद आणि आयुर्वेदिक वनस्पतींचा अर्क मिसळला जातो. साधारणपणे एक घोंगडी विणायला दोन ते तीन दिवस लागतात. पूर्वी १२ फूट लांबीची घोंगडी विणली जात असे, पण आता मात्र आपल्या मागणीनुसार हवी अशी बनवून दिली जाते. सर्वसाधारणपणे एक घोंगडी विणायला तीन ते चार किलो लोकर लागते. मेंढ्यांच्याच लोकरीपासून घोंगडी का बनवली जाते असे प्रश्न बर्‍याचदा आपल्याला पडत असतील तर त्याचे उत्तर म्हणजे मानवी जीवनात घोंगडी ही एक महत्वाची आहे.हेही वाचा - पीएम केअर फंडातून गुरु गोविंदसिंघ शासकीय रुग्णालयात होत असलेल्या आॅक्सिजन प्लांटची पाहणी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केलीधनगरी घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे-पाठदुखी, कंबरदु: खी, वात, सांधेदु: खीमध्ये यांपासून आराम मिळतो. यामध्ये जेण (घोंगडीचाच एक जाड प्रकार) वापरणे जास्त योग्य ठरते.झोप येत नसणार्‍यांसाठी तर हे एक उत्तम औषधच आहे. घोंगडीवर झोपल्याने शांत झोप लागते.उच्च रक्तदाब नियंत्रणात येण्यास मदत होते.कांजण्या, गोवर, तापातही घोंगडीचा वापर करतात.घोंगडीवर झोपल्याने लहान मुलांचा अस्थमा दूर होतो. हिवाळ्यात ऊब तर उन्हाळ्यात थंडावा देते.घोंगडीवर झोपल्याने साप, विंचू, मुंगी, गोम, मधमाशा, ढेकूण जवळ येत नाहीत.अर्धांगवायूचा धोका टळतो..आणि मधुमेह कमी होण्यास मदत होते.धार्मिकदृष्ट्या पूर्वीपासून घोंगडीचे महत्व:पूर्वी ध्यानधारणा करण्यासाठी, धार्मिक अनुष्ठान करण्यासाठी घोंगडी वापराला अनन्य साधारण महत्व होत. तसा उल्लेखही पूर्वीच्या माहितीत आढळतो. स्वतः शिव मल्हारांच्या पेहरावामध्ये घोंगडीचा वापर होता.घोंगडीच्या वापरामुळे बॉडी टेम्प्रेचर आणि शारीरिक ऊर्जा कंट्रोलमध्ये राहत असल्यामुळे घोंगडीवर केलेल्या साधनेमुळे अत्युच्च समाधान मिळते.मात्र सध्या जंगलक्षेत्र घटत चालल्याने मेंढी पालन व्यवसायावर गंडातर आले आहे. मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी बाळू मामाच्या मेंढ्या वास्तव्यास असतात. राजस्थानी मेंढपाळही आपल्या मेंढ्यांच्या कळपाला सोबत घेऊन या जंगलातून त्या जंगलात जातात. मेंढीची विष्ठा (लेंडी) ही शेतासाठी सेंद्रीय खत म्हणून चांगली असते. त्यामुळे अनेक शेतकरी मेंढ्याचा कळप आपल्या शेतात बसवतात. सरकारने मेंढीपालन व्यवसाय करणाऱ्यांना वनविभागाची जागा उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी मेंढपाळातून होत आहे.





उत्तर लिहिले · 11/8/2021
कर्म · 121765
0
ज्याच्या नावावर घर आहे त्याच्याच नावावर विजेचे मीटर असते.
तुमच्या नावाचा घराचा ८अ व रहिवासी दाखला व वीज बिल घेऊन महावितरण कार्यालयात जा. ते मीटरचा मालक बदलून देतील.

उत्तर लिहिले · 19/1/2021
कर्म · 283280
5
👉उपयोगीता म्हणजे वस्तूंची उपयुक्तता होय .परंतू अर्थशास्त्रानूसार उपयोगिता म्हणजे वस्तूवरील गरज पूर्ण करण्याची शक्ती होय ."

उपयोगितेची वैशिष्ट्ये
1. सापेक्ष संकल्पना-
उपयोगिता ही स्थल कालाशी संबंधित  असते. म्हणजेच काळानुसार व स्थळानुसार उपयोगी तेत बदल होत असतो.)

2. व्यक्तिनिष्ठ संकल्पना-
एखाद्या वस्तूची उपयोगिता सर्व व्यक्तींसाठी सारखी नसते ती व्यक्तीनुसार बदलते कारण लोकांची रुची, पसंती, आवड - निवड यामध्ये फरक असतो.)

3. नैतिकदृष्ट्या तटस्थ -
उपयोगितेच्या संकल्पनेत नैतिकतेचा विचार केला जात नाही. उपयोगिता   नैतिक दृष्ट्या तटस्थ असते. ज्या वस्तूंमध्ये उपयोगिता असते ती कोणतीही गरज भागू शकते. ही उपयोगिता चांगले किंवा वाईट, नैतिक किंवा अनेतिक असा फरक करीत नाही.)

4. उपयोगीता हिंदी म्हणजे उपयुक्तता नव्हे-
उपयोगिता म्हणजे वस्तू मधील गरज भागवण्याची क्षमता होय . तर उपयुक्तता म्हणजे वस्तूंपासून उपभोक्त्याचे होणारे हीत  होय. उपयोगिता व्यक्तींच्या समाधानाची पातळी व्यक्त करते आणि उपयुक्तता वस्तूंचे उपयोग मूल्य दर्शवते. ज्या वस्तूंमध्ये उपयोगिता असते ती उपयुक्त असलेच असे नाही.)

5. उपयोगिता म्हणजे आनंद नव्हे-
उपयोगिता आणि आनंद या दोन्ही संकल्पना वेगवेगळे आहेत. वस्तूंमध्ये उपयोगिता असली तरी तिचा उपभोग आनंद किंवा सुख देणारा असतोच असे नाही .)

6. उपयोगिता व समाधान वेगवेगळे आहेत-
(योगिता व समाधान या जरी परस्पर संबंधीत संकल्पना असल्या , तरी त्यात फरक आहे. उपयोगिता म्हणजे मानवी गरज भागवण्याची क्षमता होय. तर समाधान म्हणजे व्यक्तीला होणारी सुखाची जाणीव होय. म्हणजेच उपयोगिता वस्तूशी संबंधित असते. तर समाधान हे व्यक्तीकडून अनुभवले जाते . उपयोगिता हे अपेक्षित असे समाधान असते. तर समाधान ही प्रत्यक्ष अनुभूती असते.)

7. मापण करणे कठीण -
( उपयोगिता ही मानसशास्त्रीय संकल्पना आहे. अदृष्य आणि अमूर्त आहे. तिचे संख्यात्मक म्हणजेच अंकांमध्ये मापन करता येत नाही. परंतु एखादी  व्यक्ती अंदाजाने उपयोगिता मापन करू शकते)

8. गरजेच्या तीव्रते वर अवलंबून असते=( वस्तूची उपयोगिता ही व्यक्तीच्या गरजेची त्री वता किंवा निकड यावर अवलंबून असते. जेवढी गरजेची त्री वता तेवढी उपयोगिता अधिक असते. गरजेची त्रिवता कमी झाल्यास उपयोगिता कमी होते.)

9. मागणीचा  आधार -
( उपयोगिता मागणीचा आधार आहे. एखाद्या वस्तूमध्ये उपयोगिता नसेल तर व्यक्ती त्या वस्तूसाठी मागणी करणार नाही. जर ती वस्तू उपयोगिता देणारी असेल तरच व्यक्ती त्या वस्तूसाठी मागणी करेल.)


  उपयोगितेचे प्रकार
1. रूप उपयोगिता (जेव्हा एखाद्या अस्तित्वात असलेल्या वस्तूचे  आकारमान किंवा स्वरूप बदलल्यामुळे उपयोगिता वाढते, तेव्हा त्यास रूप उपयोगिता असे म्हणतात)



2. स्थल उपयोगिता (जेव्हा वस्तूचा वापर करण्याच्या  जागेत बदल झाल्यामुळे उपयोगिता वाढते तेव्हा त्यास  स्थल उपयोगिता असे म्हणतात. )


3 . काल उपयोगिता( काळानुसार वस्तूमध्ये जि उपयोगिता निर्माण होते त्यास काल उपयोगिता म्हणतात.)



4. सेवा उपयोगिता( जेव्हा समाजातील विविध घटकांना द्वारे इतरांना व्यक्तिगत सेवा पुरविण्यात येतात. तेव्हा सेवा उपयोगिता निर्माण होते.)


5. ज्ञान उपयोगिता ( जेव्हा उपभोक्ता विशिष्ट वस्तूबद्दल ज्ञान प्राप्त करतो तेव्हा त्याची ज्ञान उपयोगिता वाढते.)


6. स्वामित्व उपयोगिता( वस्तूंची मालकी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे स्थलांतर होते तेव्हा स्वामित्व उपयोगिता निर्माण होते.)
उत्तर लिहिले · 27/1/2020
कर्म · 16430
0

लाईट बिल बरोबर आहे का हे तपासण्यासाठी तुम्ही खालील गोष्टी करू शकता:

  1. मागील बिलांशी तुलना करा: तुमच्या मागील महिन्यांच्या बिलांशी तुलना करा. युनिट वापर, एकूण रक्कम आणि इतर तपशील तपासा. काही असामान्य आढळल्यास, पुढील तपासणी करा.
  2. मीटर रीडिंग तपासा: तुमच्या मीटरवर नोंदवलेले रीडिंग आणि बिलावरील रीडिंग जुळते आहे की नाही हे तपासा. मीटर रीडिंग कसे घ्यावे हे तुम्हाला माहित नसेल, तर तुमच्या वीज कंपनीच्या वेबसाइटवर किंवा त्यांच्या ग्राहक सेवा केंद्रावर माहिती मिळू शकते.
  3. टॅरिफ (दर) तपासा: तुमच्या वीज कंपनीने लावलेले दर योग्य आहेत की नाही हे तपासा. तुमच्या क्षेत्रासाठी लागू असलेले दर वीज कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध असतात.
  4. देयकाची अंतिम तारीख: देयकाची अंतिम तारीख तपासा आणि त्यापूर्वी बिल भरा.
  5. ऑनलाइन पोर्टल/ॲप: बहुतेक वीज कंपन्या त्यांच्या ग्राहकांना ऑनलाइन पोर्टल किंवा ॲपद्वारे बिल तपासण्याची आणि भरण्याची सुविधा देतात. तिथे तुम्ही तुमच्या बिलाची माहिती आणि मागीलhistory देखील तपासू शकता.
  6. ग्राहक सेवा: काही शंका असल्यास, तुमच्या वीज कंपनीच्या ग्राहक सेवा केंद्रावर संपर्क साधा.

उदाहरणार्थ, महावितरण (MSEDCL) च्या वेबसाइटवर तुम्ही तुमचे बिल ऑनलाइन पाहू शकता.

हे सर्व मुद्दे तुम्हाला तुमचे लाईट बिल तपासून ते बरोबर आहे का हे ठरवण्यात मदत करतील.

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 980
3
एवढा मोठा संसार आहे, मानवाला रोज अनेक वस्तूंची गरज असते. आता तुम्ही कुठल्या वस्तू बदल बोलत आहात ते सांगा.
उत्तर लिहिले · 14/1/2019
कर्म · 2270