उपयुक्तता
जीवनशैली
घोंगडी अंथरायला (अंगाखाली घ्यायला) वापरतात की पांघरायला (अंगावर घ्यायला) वापरतात?
5 उत्तरे
5
answers
घोंगडी अंथरायला (अंगाखाली घ्यायला) वापरतात की पांघरायला (अंगावर घ्यायला) वापरतात?
2
Answer link
घोंगडी अंथरायला,(अंगाखाली घ्यायला) हि वापरतात आणि पांढरा मला (अंगावर घ्यायला) हि वापरतात त्या घोंगडी मध्ये उन्हाळ्यात थंडावा मिळतो.*धनगरी घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे व धार्मिक महत्त्व!*
आज आधुनिकीकरणामूळे बहुतेकजणांना धनगरी घोंगडी काय असते ते कदाचित माहितही नसावे. नाशिक जिल्ह्यात या धनगरी घोंगडीला "जिन" म्हणतात असे पुसटसे आठवतेय!
सर्वप्रथम ही धनगरी घोंगडी कशी तयार होते यांच्या बद्दल थोडसं जाणून घेऊ…!
गावच्या किंवा रानामाळाच्या ठिकाणी तलाव, नदी, नाले, अशा ठिकाणी मेंढ्यांना स्वच्छ धुतलं जातं. नंतर स्वछ ठिकाणी त्यांच्या अंगावरील लोकर कातरली जाते. कातरलेली लोकर पिंजुन त्यातील काळी-पांढरी लोकर वेगळी केली जाते. त्यानंतर चरख्यावर लोकरीपासून सूत कातलं जातं. सुताला चांगला पीळ,मजबुती यावी आणि घोंगडी विणायला सोपं जावं यासाठी त्याला रात्रभर भिजवलेल्या चिंचोक्यांच्या खळीमदे भिजत ठेवलं जातं. त्यामध्ये हळद आणि आयुर्वेदिक वनस्पतींचा अर्क मिसळला जातो. साधारणपणे एक घोंगडी विणायला दोन ते तीन दिवस लागतात. पूर्वी १२ फूट लांबीची घोंगडी विणली जात असे, पण आता मात्र आपल्या मागणीनुसार हवी अशी बनवून दिली जाते. सर्वसाधारणपणे एक घोंगडी विणायला ३ ते ४ किलो लोकर लागते.. मेंढ्यांच्याच लोकरीपासून घोंगडी का बनवली जाते असे प्रश्न बर्याचदा आपल्या पडत असतील तर तर त्याचे उत्तर म्हणजे मानवी जीवनात घोंगडी हि एक औषधी आहे!
*धनगरी घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे-*
पाठदुखी, कंबरदुखी, वात, सांधेदुखीमध्ये यांपासून आराम मिळतो. यामध्ये जेण (घोंगडीचाच एक जाड प्रकार) वापरणे जास्त योग्य ठरते.
झोप येत नसणार्यांसाठी तर हे एक उत्तम औषधच आहे घोंगडीवर झोपल्याने शांत झोप लागते.
उच्च रक्तदाब नियंत्रणात येण्यास मदत होते.
कांजण्या, गोवर, तापातही घोंगडीचा वापर करतात.
घोंगडीवर झोपल्याने लहान मुलांचा अस्थमा दूर होतो. .
हिवाळ्यात ऊब तर उन्हाळ्यात थंडावा देते.
घोंडीवर झोपल्याने साप, विंचू, मुंगी, गोम, मधमाशा, ढेकूण जवळ येत नाहीत.
अर्धांगवायूचा धोका टळतो..आणि मधुमेह कमी होण्यास मदत होते.
धार्मिकदृष्ट्या पूर्वीपासून घोंगडी चे महत्व: 🕉️🛐🔱☮️
पूर्वी ध्यानधारणा करण्यासाठी , धार्मिक अनुष्ठान करण्या साठी घोंगडी वापराला अनन्य साधारण महत्व होत. तसा उल्लेखही पूर्वीचा माहितीत आढळतो. स्वतः शिव मल्हारांचा पेहरावा मध्ये घोंगडीचा वापर होता.
घोंगडीचा वापरामुळे बॉडी टेम्प्रेचर आणि शारीरिक ऊर्जा कंट्रोल मध्ये राहत असल्यामुळे घोंगडीवर केलेल्या साधनेमुळे अत्युच्च समाधान मिळते. श्री गुरुलीलामृत, श्री गुरुचरित्र पारायण, श्री दुर्गा सप्तशती इ. तसच इतर सर्व साधना आणि मंत्रांचा अनुष्ठानासाठी घोंगडी चा उपयोग करु शकता.
वारकरी संप्रदाय मध्येही घोंगडी वापरला अत्यंत महत्व आहे.घोंगडी वापराचे फायदे
उन्हाळ्यात थंडावा देते. घोंडीवर झोपल्याने साप, विंचू, मुंगी, गोम, मधमाशा, ढेकूण असे किटक व प्राणी जवळ सुद्धा येत नाहीत तसेच अर्धांगवायूचा धोका सुद्धा घोंगडीमुळे टळतो आणि मधुमेह कमी होण्यास मदत होते. असे अनेक फायद्याचे गुणधर्म असलेली घोंगडी अध्याच्या धावपळीच्या जीवनात दिसेनासी झाली
गावच्या किंवा रानामाळाच्या ठिकाणी तलाव, नदी, नाले, अशा ठिकाणी मेंढ्यांना स्वच्छ धुतलं जातं. नंतर स्वच्छ ठिकाणी त्यांच्या अंगावरील लोकर कातरली जाते. कातरलेली लोकर पिंजुन त्यातील काळी- पांढरी लोकर वेगळी केली जाते. त्यानंतर चरख्यावर लोकरीपासून सूत कातलं जातं. सुताला चांगला पीळ, मजबुती यावी आणि घोंगडी विणायला सोपं जावं यासाठी त्याला रात्रभर भिजवलेल्या चिंचोक्यांच्या खळीमध्ये भिजत ठेवलं जातं. त्यामध्ये हळद आणि आयुर्वेदिक वनस्पतींचा अर्क मिसळला जातो. साधारणपणे एक घोंगडी विणायला दोन ते तीन दिवस लागतात. पूर्वी १२ फूट लांबीची घोंगडी विणली जात असे, पण आता मात्र आपल्या मागणीनुसार हवी अशी बनवून दिली जाते. सर्वसाधारणपणे एक घोंगडी विणायला तीन ते चार किलो लोकर लागते. मेंढ्यांच्याच लोकरीपासून घोंगडी का बनवली जाते असे प्रश्न बर्याचदा आपल्याला पडत असतील तर त्याचे उत्तर म्हणजे मानवी जीवनात घोंगडी ही एक महत्वाची आहे.हेही वाचा - पीएम केअर फंडातून गुरु गोविंदसिंघ शासकीय रुग्णालयात होत असलेल्या आॅक्सिजन प्लांटची पाहणी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केलीधनगरी घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे-पाठदुखी, कंबरदु: खी, वात, सांधेदु: खीमध्ये यांपासून आराम मिळतो. यामध्ये जेण (घोंगडीचाच एक जाड प्रकार) वापरणे जास्त योग्य ठरते.झोप येत नसणार्यांसाठी तर हे एक उत्तम औषधच आहे. घोंगडीवर झोपल्याने शांत झोप लागते.उच्च रक्तदाब नियंत्रणात येण्यास मदत होते.कांजण्या, गोवर, तापातही घोंगडीचा वापर करतात.घोंगडीवर झोपल्याने लहान मुलांचा अस्थमा दूर होतो. हिवाळ्यात ऊब तर उन्हाळ्यात थंडावा देते.घोंगडीवर झोपल्याने साप, विंचू, मुंगी, गोम, मधमाशा, ढेकूण जवळ येत नाहीत.अर्धांगवायूचा धोका टळतो..आणि मधुमेह कमी होण्यास मदत होते.धार्मिकदृष्ट्या पूर्वीपासून घोंगडीचे महत्व:पूर्वी ध्यानधारणा करण्यासाठी, धार्मिक अनुष्ठान करण्यासाठी घोंगडी वापराला अनन्य साधारण महत्व होत. तसा उल्लेखही पूर्वीच्या माहितीत आढळतो. स्वतः शिव मल्हारांच्या पेहरावामध्ये घोंगडीचा वापर होता.घोंगडीच्या वापरामुळे बॉडी टेम्प्रेचर आणि शारीरिक ऊर्जा कंट्रोलमध्ये राहत असल्यामुळे घोंगडीवर केलेल्या साधनेमुळे अत्युच्च समाधान मिळते.मात्र सध्या जंगलक्षेत्र घटत चालल्याने मेंढी पालन व्यवसायावर गंडातर आले आहे. मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी बाळू मामाच्या मेंढ्या वास्तव्यास असतात. राजस्थानी मेंढपाळही आपल्या मेंढ्यांच्या कळपाला सोबत घेऊन या जंगलातून त्या जंगलात जातात. मेंढीची विष्ठा (लेंडी) ही शेतासाठी सेंद्रीय खत म्हणून चांगली असते. त्यामुळे अनेक शेतकरी मेंढ्याचा कळप आपल्या शेतात बसवतात. सरकारने मेंढीपालन व्यवसाय करणाऱ्यांना वनविभागाची जागा उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी मेंढपाळातून होत आहे.
0
Answer link
घोंगडी अंथरायला (अंगाखाली घ्यायला) आणि पांघरायला (अंगावर घ्यायला) दोन्ही प्रकारे वापरतात.