संशोधन प्रायोगिक संशोधन

प्रायोगिक संशोधन पद्धति विषयी माहिती लिहा ?

2 उत्तरे
2 answers

प्रायोगिक संशोधन पद्धति विषयी माहिती लिहा ?

2
मागील प्रकरणात आपण संशोधनाच्या खालील पद्धतींचा विचार केलेला आहे.


ऐतिहासिक पद्धती:   माहिती ज्या वेळी लिखित स्वरूपात अस्तित्वात असते त्या वेळी या पद्धतीचा वापर करतात. वर्णनात्मक सर्वेक्षण पद्धती: या पद्धतीचा वापर निर्दिष्ट जनसंख्या वा न्यादर्श जनसंख्येपासून शाब्दिक स्वरूपात माहिती मिळविण्यासाठी करतात. विश्लेषणात्मक सर्वेक्षण पद्धती: जेव्हा निर्दिष्ट वा न्यादर्श जनसंख्येपासून सांख्यिकी स्वरूपात माहिती मिळवायची असेल तेव्हा या पद्धतीचा वापर करतात. काही वेळा अशी परिस्थिती निर्माण होते की, त्या वेळी वरील तिन्ही पद्धती अपुऱ्या ठरतात. प्राप्त परिस्थितीमध्ये तुम्ही एकापेक्षा अधिक घटकांचा प्रभाव, परिणाम विचारात घेऊ इच्छिता, अशा परिस्थितीमध्ये संशोधकाने परिस्थितीचे काटेकोरपणे नियंत्रण केले पाहिजे. उदाहरणार्थ, तुम्हाला एका विशिष्ट खताचा पिकाच्या वाढीवरील परिणाम पाहायचा आहे. सर्वप्रथम पिकाच्या वाढीवर

परिणाम करणाऱ्या सर्व चलांचा शोध घ्यावा लागेल. नंतर त्यापैकी कोणते चल पूर्णपणे नियंत्रित करता येतील ते शोधावे लागेल. तसेच कोणते चल एखाद्या विशिष्ट प्रमाणापर्यंतच नियंत्रित करता येतील हेही पाहावे लागेल, खत हा प्रायोगिक चल वापरून त्याचा पिकाच्या वाढीवरील परिणाम अचूकपणे सांगता येईल.
प्रायोगिक पद्धतीच्या सोप्या प्रकारामध्ये प्रयोज्य, अगर विषयवस्तूची अभ्यासपूर्ण चाचणी घेतली जाते. नंतर त्या विषयवस्तूवर काही क्रिया-प्रक्रिया केल्या जातात व झालेला फरक पाहण्यासाठी विषयवस्तू वा प्रयोज्याची परत चाचणी घेतली जाते. या पद्धतीला कार्यकारण निर्धारण पद्धती, प्रयोगशाळा पद्धती, एकलगट पूर्वचाचणी, अंतिम चाचणी अभ्यास असे म्हणतात. काही लोकांच्या मते ती शोधनपद्धती आहे, परंतु हा अशास्त्रीय दृष्टिकोन आहे. संशोधनासाठी वापरावयाची पद्धती माहितीच्या स्वरूपावर अवलंबून असते हे आपण यापूर्वीच पाहिले आहे.
नियंत्रण
प्रायोगिक पद्धतीमध्ये नियंत्रणाची संकल्पना मूलभूत आहे. संशोधक दोन गटांपासून सुरुवात करतो. (१) नियंत्रित गट (२) प्रायोगिक गट. या दोन गटांची निवड यादृच्छीकरण पद्धतीने केली जाते. त्या निवडीमध्ये विवक्षित जनसंख्या असलेल्या कोणत्याही शोध-अभ्यासातील मूलभूत तत्त्वाचा उपयोग केला जातो. एक गट दुसऱ्या गटाशी शक्य तितक्या जास्तीत जास्त गुणवैशिष्टय़ांशी समान राहील यांची दक्षता घेतली जाते. त्यामध्ये प्रामुख्याने वय, लिंग, आर्थिक स्थिती हे चटकन समजून येणारे निकष आहेत.
प्रायोगिक गट = नियंत्रित गट
प्रायोगिक गट = नियंत्रित गट प्रत्यक्ष वस्तुस्थितीमध्ये हे अगदी अशक्य आहे. म्हणून संशोधनामध्ये आपण बरोबरीचे वा तुल्यबळ गट असे म्हणतो. काही महत्त्वाच्या वैशिष्टय़ांबाबत गट संतुलित केलेले असतात. नियंत्रित गटामध्ये परिस्थिती काटेकोरपणे नियंत्रित केलेली असते. परंतु प्रायोगिक गटामध्ये परिस्थितीवर पूर्णत: नियंत्रण नसते. तो गट बाह्य परिणामाच्या प्रभावाला ग्रहणक्षम असतो. अशा प्रकारे दोन प्रकारची परिस्थिती असते. प्रथमत: आपण दोन्ही गटांची तुलना करण्याच्या उद्देशाने गटांचे परिक्षण करतो. प्रायोगिक गटामध्ये एखादा घटक वा चल बदलतो. त्यामध्ये बाह्यप्रभाव अंतर्भूत करतो. बाह्यप्रभावाचा परिणाम पाहण्यासाठी प्रत्येक स्थित्यंतराचे पूनर्मूल्यांकन करतो आणि झालेल्या बदलाची नोंद करतो. शेवटी हा जो बदल झाला तो बाह्यप्रभावामुळे झाला असा आपण निष्कर्ष काढू शकतो.
आश्रयी व स्वाश्रयी चल
आपण पाहिले की, प्रत्येक परिस्थितीला चल असतात. संशोधक जर एखाद्या चलावर पूर्णपणे नियंत्रण करू शकला व त्याचे अचूकपणे स्पष्टीकरण करू शकला तर अशा चलांना स्वाश्रयी चल असे म्हणतात. उलटपक्षी संशोधकाचे चलावर अगदीच अल्पसे नियंत्रण असेल आणि आश्रयी चलाच्या प्रभावामुळे त्यामध्ये बदल घडून येत असेल तर अशा प्रकारच्या चलाला आश्रयी चल म्हणतात.
प्रायोगिक अभ्यासाचे प्रकार
१) पूर्वप्रायोगिक अभिकल्प
२) वास्तव प्रायोगिक अभिकल्प
३) प्रयोगसदृश अभिकल्प
४) सहसंबंधात्मक आणि एक्स पोस्ट फॅक्टो अभिकल्प
प्रत्येक प्रकारची विस्ताराने माहिती पाहू. वरील प्रकारांचे चटकन आकलन होण्यासाठी आपण खालील सांकेतिक चिन्हांचा वापर करू.
= प्रायोगिक चल
ड= निरीक्षण
पूर्वप्रायोगिक अभिकल्प
एकक्षेप व्यक्ती अभ्यास
यामध्ये एक साधे निरीक्षण असते. अनियोजित निरीक्षणाच्या आधारावर कार्यकारण संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जातो. आपण मांजर आडवे जाताना पाहतो व ठरवितो की आज
आपले काम तडीस जाणार नाही. पुष्कळशा अंधश्रद्धा या प्रकारच्या निरीक्षणावर आधारित असतात. म्हणूनच या पद्धतीला पूर्वप्रायोगिक अभिकल्प म्हणतात. सांकेतिकरीत्या आपण खालीलप्रमाणे त्याचे स्पष्टीकरण करतो.
एकल गट पूर्व चाचणी, अंतिम चाचणी अभ्यास
समजा, तुम्हाला दूरदर्शनच्या कार्यक्रमाचा प्रभाव जाणून घ्यावयाचा असेल तर एक गट निवडा. पूर्व चाचणी देऊन त्याचे मापन करा. नंतर त्या गटाला दूरदर्शन कार्यक्रम पाहण्याची संधी द्या. अंतिम चाचणी देऊन त्यांच्या प्रावीण्याचे मापन करा. अशा प्रकारे यामध्ये प्रयोगपूर्व मूल्यमापन, नंतर चलाचा वापर व शेवटी प्रयोगानंतर मूल्यमापन असते. सांकेतिक चिन्हाच्या साह्याने खालीलप्रमाणे ते स्पष्ट करता येईल.
स्थितीज गट तुलना
ही नियंत्रित गट व प्रायोगिक गट पद्धती असते.
यादृच्छिक पद्धतीने निवडलेल्या दोन गटांना नियंत्रित व प्रायोगिक गट अशी नावे दिली जातात. संधी-समानतेनुसारही गट निवडता येतात. प्रायोगिक गट चल हे चिन्ह वापरतात, परंतु नियंत्रित गटाला ही संधी नसते. शेवटी चलाचा परिणाम पाहण्यासाठी दोन्ही गटांचे मूल्यमापन करून त्यांची तुलना केली जाते. प्रयोगपूर्व दोन्ही गटांची समानता आजमाविण्याचा प्रयत्न केला जात नाही. सांकेतिकदृष्टय़ा आपण खालीलप्रमाणे त्याची स्थिती दर्शवू शकतो.
गट १: --01
गट २: -02
गट दोन हा नियंत्रित गट असल्याचे तुम्हाला समजून येईल. तेथे कोणतेही चल वापरण्यात आलेले नाही. वरील तिन्ही तंत्रे रचनेच्या दृष्टीने थोडीशी मुक्त आहेत. त्यामुळेच त्यांना पूर्वप्रायोगिक अभिकल्प म्हटले आहे.
वास्तव प्रायोगिक अभिकल्प
या प्रकारच्या अभिकल्पात चलावर मोठय़ा प्रमाणात नियंत्रण असल्याचे दिसते. तसेच काटेकोर नियोजनबद्ध प्रक्रिया असते. यादृच्छीकरण हा सत्यतेचा महत्त्वाचा घटक असतो. (शेवटी निष्कर्ष विश्वसनीय आहेत का?) या सर्व अभिकल्पामध्ये यादृच्छीकरण अत्यंत महत्त्वाचा घटक असतो.
पूर्वचाचणी, अंतिम चाचणी नियंत्रित गट अभिकल्प
सर्वसाधारणपणे हे तंत्र मोठय़ा प्रमाणावर उपयोगात आणले जाते. यामध्ये एक प्रायोगिक गट असतो. (ज्यामध्ये आपण चल बदलू शकतो.) हा गट यादृच्छीकरण पद्धतीने निवडलेला असतो. नियंत्रित गटदेखील याच पद्धतीने निवडतात. प्रायोगिक गटाचे मूल्यमापन करतात. नंतर चलाचा वापर करून परत मूल्यमापन करतात. नियंत्रित गट चलापासून अलिप्त करतात व केवळ सुरुवातीला व प्रयोगाच्या शेवटी त्याचे मूल्यमापन करतात.
सालोमनचा चार गट अभिकल्प
नियंत्रित गट अभिकल्पाचा विस्तार म्हणजेच अशा प्रकारचे अभिकल्प होत. या अभिकल्पामध्ये बाह्यसत्यतेच्या संकल्पनेचा प्रामुख्याने विचार केलेला असतो. म्हणजेच प्रयोगाचे समान्यीकरण करता येईल? खाली दिलेले सांकेतिक प्रकटीकरण पाहा. गट ३ व गट ४ यांना पूर्वचाचणी नाही. कारण संशोधकाला जाणीव आहे की, पूर्वचाचणीचा प्रयोज्यावर कोचिंगसारखा परिणाम खंडित केला जातो. (गट २ व ४) गट १ व २ संबंधी जे निष्कर्ष काढले आहेत ते दुसऱ्या गटांना कसे लागू पडतील ते आपण पाहू शकतो.
केवळ अंतिम चाचणी नियंत्रित गट अभिकल्प
काही वेळा वास्तव परिस्थितीत पूर्व चाचणी देणे शक्य नसते. आपण विकसित मुलांना पूर्वचाचणी देऊ शकत नाही. याचे कारण घटना या एक वेळच घडत असतात.
उत्तर लिहिले · 17/3/2020
कर्म · 9435
0
प्रायोगिक संशोधन पद्धती (Experimental Research Method)

प्रायोगिक संशोधन पद्धती ही एक अशी संशोधन पद्धती आहे ज्यामध्ये संशोधक काही घटकांमध्ये फेरबदल करून इतर घटकांवर त्याचा काय परिणाम होतो हे पाहतो. या पद्धतीत, दोन गट तयार केले जातात: एक 'प्रायोगिक गट' (experimental group) आणि दुसरा 'नियंत्रण गट' (control group). प्रायोगिक गटाला विशिष्ट 'उपचार' (treatment) दिला जातो, तर नियंत्रण गटाला नाही. नंतर दोन्ही गटांचे निष्कर्ष तुलनात्मकदृष्ट्या तपासले जातात.

उदाहरण:

एखाद्या नवीन औषधाचा परिणाम पाहण्यासाठी, काही रुग्णांना ते औषध दिले जाते (प्रायोगिक गट), तर इतरांना नाही (नियंत्रण गट). यानंतर दोन्ही गटांतील रुग्णांच्या प्रकृतीत काय बदल झाला, हे पाहिले जाते.

प्रायोगिक संशोधनाची वैशिष्ट्ये:

  • नियंत्रण (Control): संशोधक बहुतेक घटकांवर नियंत्रण ठेवतो.
  • फेरबदल (Manipulation): काही घटकांमध्ये जाणीवपूर्वक बदल केला जातो.
  • यादृच्छिक निवड (Random Assignment): गटांमध्ये व्यक्तींची निवड यादृच्छिकपणे केली जाते.
  • कारणात्मक संबंध (Causal Relationship): या पद्धतीमुळे दोन घटकांमधील कार्यकारण संबंध शोधता येतो.

प्रायोगिक संशोधनाचे प्रकार:

  1. प्रयोगशाळा प्रयोग (Laboratory Experiment): हे प्रयोग नियंत्रित वातावरणात केले जातात.
  2. नैसर्गिक प्रयोग (Field Experiment): हे प्रयोग नैसर्गिक वातावरणात केले जातात.
  3. अर्ध-प्रयोग (Quasi-Experiment): यात पूर्ण नियंत्रण ठेवता येत नाही, कारण काही घटक नैसर्गिकरित्या बदलतात.

प्रायोगिक संशोधनाचे फायदे:

  • कारणात्मक संबंधांचे विश्लेषण करता येते.
  • परिणामांचे अचूक मापन करता येते.
  • इतर संशोधनांच्या तुलनेत अधिक वस्तुनिष्ठ निष्कर्ष मिळतात.

प्रायोगिक संशोधनातील मर्यादा:

  • प्रयोगशाळेतील कृत्रिम वातावरणामुळे नैसर्गिक वास्तवात उपयोगिता कमी असू शकते.
  • नैतिक मुद्दे (ethical issues) महत्त्वाचे असतात, कारण काही प्रयोगांमुळे व्यक्तींना त्रास होऊ शकतो.
  • खर्चिक आणि वेळखाऊ प्रक्रिया.

प्रायोगिक संशोधन पद्धती ही उपयुक्त आहे, परंतु संशोधकाने यातील मर्यादा आणि नैतिक विचार लक्षात घेणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 2400

Related Questions

प्रायोगिक संशोधन पद्धती विषयी माहिती सांगा?
प्रायोगिक संशोधन पद्धती विषयी माहिती लिहा?
प्रायोगिक संशोधन पद्धती विषयी माहिती?
प्रायोगिक संशोदन पद्धती विषयी माहिती liha?