वेबसाईटमध्ये होस्टिंग म्हणजे काय असते?
वेब होस्टिंग म्हणजे काय?
या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी आपण एक उदाहरण पाहू. आपल्याला घर बांधायचे असेल तर नेमकी कशाची गरज पडते?
१. आपल्याला कोणतं लोकेशन योग्य आहे आपण ते ठरवतो.
२. हव्या असणाऱ्या लोकेशनवर जागा ठरवतो.
३. त्याची योग्य ती किंमत देऊन जागा विकत घेतो.
४. यानंतर त्या जागेवर घर बांधतो.
वेबसाईटच देखील असंच असतं. आपल्याला हवं असणार लोकेशन (पत्ता) म्हणजे डोमेन नेम. जागा म्हणजे होस्टिंग ज्यावर आपलं घर उभं असतं. आणि घर म्हणजेच होस्टिंग. आता आपल्याला तितकं मोठं घर हवं तितकी मोठी जागा देखील हवी. याचप्रमाणे जितकी मोठी वेबसाईट तितकी मोठी होस्टिंग त्यासाठी आवश्यक असते. आपल्या वेबसाईटवरील सर्व कोड, फोटो, लेख हे होस्टींगवर सेव्ह होत असतात.
होस्टिंगचे प्रामुख्याने ३ प्रकार पडतात.
१. शेअर्ड होस्टिंग
२. व्हीपीएस होस्टिंग
३. डेडीकेटेड होस्टिंग
वेब होस्टिंगचे प्रकार समजून घेण्यासाठी अजून एक सोपं उदाहरण पाहता येईल.
१. शेअर्ड होस्टिंग म्हणजे एक कुटुंब समजा. अशा वेळी तुम्हाला आवश्यक असणाऱ्या गोष्टी सर्व जण मिळून घेतात. यामुळे येणारा खर्च विभागला गेल्यामुळे प्रत्येकाच्या वाटेला कमी येतो. याच्या नावातच शेअर्ड आहे.
२. व्हीपीएस होस्टिंग म्हणजे एक अपार्टमेंट समजून घेता येईल. यात जागा अधिक मिळते परंतु यासाठी थोडी जास्त किंमत मोजावी लागते.
३. डेडीकेटेड होस्टिंग म्हणजे एक कॉलनी. यात खूप जास्त स्पेस असला तरी सर्व सुरळीत चालावं यासाठी जास्त मेहनत लागते. यामुळे यासाठी येणारा खर्च देखील अधिक असतो.
सौरभ दिवटे
CEO
कॉप्टरव्हीजन इन्फोकॉम प्रायव्हेट लिमिटेड
~ www.Qoptervzn.com ~
कंपनीचे बिजनेसेस -
www.ApnaSaman.com
ईकॉमर्स ( ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट )
www.GrowthApple.com
सॉफ्टवेयर, एप्लिकेशन्स, वेबसाईट्स डेव्हलपमेंट आणि डिजिटल मार्केटिंग ची वेबसाईट
www.GrowthApple.xyz
वेब होस्टिंग, डोमेन, VPS च्या सेवा देणारी वेबसाईट
वेबसाईट होस्टिंग: वेबसाईट होस्टिंग म्हणजे तुमच्या वेबसाईटवरील डेटा (फाईल्स, इमेजेस, व्हिडिओ इत्यादी) एका विशेष संगणकावर (सर्वरवर) साठवणे, जेणेकरून इंटरनेट वापरकर्ते तुमच्या वेबसाईटला 24 तास पाहू शकतील.
हे कसे काम करते:
- जेव्हा कोणी तुमच्या वेबसाईटच्या नावावर (डोमेन नेम) क्लिक करते, तेव्हा त्यांचे ब्राउजर होस्टिंग सर्व्हरला रिक्वेस्ट पाठवते.
- होस्टिंग सर्व्हर तुमच्या वेबसाईटवरील डेटा ब्राउजरला पाठवतो.
- त्यानंतर वापरकर्त्यांना तुमची वेबसाईट दिसते.
उदाहरण:
समजा, तुम्हाला एक दुकान उघडायचे आहे. त्यासाठी तुम्हाला एका जागेची गरज असते. त्याचप्रमाणे, वेबसाईट सुरु करण्यासाठी होस्टिंग म्हणजे इंटरनेटवर जागा घेणे.
विविध प्रकारचे होस्टिंग:
- शेअर्ड होस्टिंग (Shared Hosting): एकाच सर्व्हरवर अनेक वेबसाईट साठवल्या जातात. त्यामुळे हे स्वस्त असते.
- व्हीपीएस होस्टिंग (VPS Hosting): हे शेअर्ड होस्टिंगपेक्षा अधिक सुरक्षित आणि वेगवान असते.
- डेडिकेटेड होस्टिंग (Dedicated Hosting): यात तुमच्या वेबसाईटसाठी एक पूर्ण सर्व्हर असतो.
- क्लाउड होस्टिंग (Cloud Hosting): यात डेटा अनेक सर्व्हरवर साठवला जातो, ज्यामुळे वेबसाईट अधिक जलद आणि सुरक्षित राहते.
अधिक माहितीसाठी हे उपयुक्त स्रोत: