पर्यावरण हवा

हवा कशाचे मिश्रण आहे?

2 उत्तरे
2 answers

हवा कशाचे मिश्रण आहे?

4
👉हवा
■हवेतील प्रमाण जवळजवळ स्थिर असलेल्या वायूंचा एक गट आहे. या गटातील वायू व त्यांचे हवेच्या घनफळातील शेकडा प्रमाण कंसात पुढे दिले आहे : नायट्रोजन (७८.०८४), ऑक्सिजन (२०.९४६), आर्गॉन (०.९३४), निऑन (०.००१८), हीलियम (०.०००५२४), मिथेन (०.०००२), क्रिप्टॉन (०.०००११४), हायड्रोजन (०.००००५), नायट्रस ऑक्साइड (०.००००५) आणि झेनॉन (०.०००००८७).

■ पाण्याची वाफ (०–७), कार्बन डाय-ऑक्साइड (०.०१–०.१ सरासरी सु. ०.०३२), ओझोन (०–०.१), सल्फर डाय-ऑक्साइड (०–०.०००१) आणि नायट्रोजन डाय-ऑक्साइड (०.०००००२). यांशिवाय हवेत अमोनिया व कार्बन मोनॉक्साइड हेही वायू अत्यल्प बदलत्या प्रमाणात असतात. अर्थात, हे वायू हवेत सापेक्षतः अल्प प्रमाणात आढळत असले, तरी भूपृष्ठावरील जीवसृष्टी टिकून राहण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत. जीवसृष्टी-साठी ऑक्सिजन, पाणी व अन्न या अत्यावश्यक गोष्टी असून यांपैकी ऑक्सिजन हवेतून मिळतो.
उत्तर लिहिले · 18/1/2020
कर्म · 16430
0

हवा अनेक वायूंचे मिश्रण आहे, त्यापैकी काही प्रमुख घटक खालीलप्रमाणे आहेत:

  • नायट्रोजन (Nitrogen): सुमारे ७८%
  • ऑक्सिजन (Oxygen): सुमारे २१%
  • आर्गॉन (Argon): सुमारे ०.९३%
  • कार्बन डायऑक्साईड (Carbon Dioxide): सुमारे ०.०४%
  • इतर वायू: अगदी कमी प्रमाणात हेलियम (Helium), निऑन (Neon), मीथेन (Methane), क्रिप्टॉन (Krypton) आणि हायड्रोजन (Hydrogen) इत्यादी वायू असतात.

याव्यतिरिक्त, हवेमध्ये पाण्याची वाफ आणि धূলिकण देखील असू शकतात.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 5400

Related Questions

सामाजिक वनीकरणाचे प्रकार स्पष्ट करा?
जंगलाचे प्रकार सविस्तर स्पष्ट करा?
निर्वाणीकरणाचे परिणाम विशद करा.
जंगलतोडीमुळे पर्यावरणावर कोणते परिणाम होतात ते स्पष्ट करा?
निरवणीकरणाची कारणे स्पष्ट करा?
सामाजिक वनीकरणाचे फायदे लिहा?
वॉटरशेड नियोजनाखाली कोणत्या गोष्टी येतात ते विशद करा?