अध्यात्म देव भगवतगीता धर्म

श्रीमद् भगवतगीता कोणी म्हटली आहे? विष्णू अवतार श्रीकृष्ण यांनी की परब्रह्म श्रीकृष्ण यांनी की ब्रह्म यांनी की पूर्णब्रह्म अक्षरारती श्रीकृष्ण यांनी की गोलोकवासी भगवान श्रीकृष्ण यांनी?

3 उत्तरे
3 answers

श्रीमद् भगवतगीता कोणी म्हटली आहे? विष्णू अवतार श्रीकृष्ण यांनी की परब्रह्म श्रीकृष्ण यांनी की ब्रह्म यांनी की पूर्णब्रह्म अक्षरारती श्रीकृष्ण यांनी की गोलोकवासी भगवान श्रीकृष्ण यांनी?

6
भगवान श्रीकृष्ण हे स्वयं ईश्वर अवतार असून ते कुणाचेही अवतार नाहीत..याचं वर्णन वेळोवेळी श्रीमद्भगवद्गीतेत आलेले आहे.
संदर्भ-१)उत्तम:पुरूष ...अध्याय १५ मध्ये १८ आणि १९ श्लोकात जो उत्तम पुरुष म्हणजे पुरुषोत्तम सांगितलं आहे तो भगवंत म्हणजेच ईश्वर आहे..जो संपूर्ण जगाचं भरन पोषण करतो.तिथं योगेश्वर स्वतःला कुणाचाही अवतार संबोधित करत नाही.

२)अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशयस्थितः।

अहमादिश्च मध्यं च भूतानामन्त एव च।।10.20।।
ह्या श्लोकामध्ये श्रीकृष्ण मी सगळ्यांचा आत्मा असं संबोधतात.मी सगळ्यांचा आदी आणि मध्य आहे..वगैरे..।
सारांश असा आहे की कृष्ण नक्की कोण आहे हे समजून घेण्यासाठी श्रीमद्भगवद्गीता आपल्याला वाचावी लागेल तथा चांगल्या एखाद्या कृष्णभक्त गुरूंकडून समजून घ्यावी लागेल..
उत्तर लिहिले · 16/1/2020
कर्म · 345
1
श्री कृष्ण यांनी अर्जुनाला युद्धाच्या वेळेस सांगितली.
अर्जुनाला युद्ध आपल्याच नातेवाईकांच्या बरोबर करायचं आहे, असं पाहिल्यानंतर अर्जुन युद्ध करायला धजावेना. म्हणून अर्जुनाला श्री कृष्णाने उपदेश (भगवत गीता) दिला.
उत्तर लिहिले · 16/1/2020
कर्म · 15490
0
श्रीमद् भगवतगीता भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितली. आता, श्रीकृष्ण कोण होते याबद्दल विविध मते आहेत:
  • विष्णू अवतार श्रीकृष्ण: वैष्णव परंपरेनुसार, श्रीकृष्ण हे विष्णूचे अवतार मानले जातात. भगवतगीतेमध्ये त्यांनी स्वतःला 'अवतारांमधील श्रेष्ठ' असे म्हटले आहे.
  • परब्रह्म श्रीकृष्ण: काही ठिकाणी, श्रीकृष्ण हे परब्रह्म म्हणजे अंतिम सत्य म्हणून ओळखले जातात. ते केवळ विष्णूचे अवतार नसून त्याहूनही उच्च आहेत, असे मानले जाते.
  • पूर्णब्रह्म अक्षरारती श्रीकृष्ण: ही संकल्पना काही विशिष्ट वैष्णव संप्रदायांमध्ये आढळते, जिथे श्रीकृष्ण हे पूर्ण ब्रह्म आणि अक्षर ब्रह्म दोन्ही आहेत.
  • गोलोकवासी भगवान श्रीकृष्ण: गोलोक हे कृष्णाचे शाश्वत निवासस्थान मानले जाते. त्यामुळे, गोलोकवासी श्रीकृष्ण म्हणजे भगवतगीतेतील उपदेशक आहेत, असे मानले जाते.
त्यामुळे, भगवतगीता कोणी म्हटली या प्रश्नाचे उत्तर श्रीकृष्ण आहे, परंतु ते विष्णूचे अवतार होते की परब्रह्म, याबद्दल मतांतर असू शकते.
उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 2820

Related Questions

भगवद्गीतेच्या अठरा अध्यायांचा नावासहित सारांश काय आहे?
भगवतगीता हा कोणत्या प्रकारचा ग्रंथ आहे?
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन स्पष्ट करा ?
भगवतगीतेवरती किती टीका आहेत?
भगवतगीता कोणी लिहिली?
भगवतगीतेमध्ये जे होते ते माझ्या इच्छेनुसार होते असा उल्लेख आहे, तर मग समाजात वाईट गोष्टी का घडतात?
भगवतगीता डाउनलोड करायची आहे, तरी मला PDF फाइल पाहिजे होती?