शब्दाचा अर्थ झाडे व्याख्या लाकूड

लाकडाचा ओंडका म्हणजे काय?

3 उत्तरे
3 answers

लाकडाचा ओंडका म्हणजे काय?

5
लाकडाचा ओंडका म्हणजे ओबडधोबड असलेला लाकुड.
अगदी साधे आयुध म्सणजे लाकडाचा मोठा ओंडका.
माणुस जसजसा टोळ्याकडुन समाजाकडे विकसित होऊ लागला तशी सैन्याची रचना अधिक सुसंघटित होऊ लागली सामुदायिक प्रयत्न कामी येऊ लागल्याने संरक्षक प्रणाली विकसित होत गेल्या गावे शहरे यांच्या सुरक्षिततेसाठी भिंती,वेशी बांधल्या गेल्या
मोक्याच्या ठिकाणी किल्ले बांधले गेले साम्राजालाही तटबंदी बाधल्या गेल्या मग या सगळ्यावर मात करणारी शस्त्रे आणि आयुधे विकसित होऊ लागली.
यातील अगदी साधे आयुध म्सणजे लाकडाचा मोठा ओंडका तो अनेक सैनिक उचलून किल्ल्याच्या दरवाजावर किंवा भिंतीवर वारंवार आदळत ओंडक्याच्या बाजूला अन्य वजनदार वस्तु लावून त्याला चाकाच्या गाड्यावर बसवून ही वापरत असत त्याना बॅटरिग रॅम्स म्हटले जात असे.
हत्तीना दारावर टकर देण्यास मज्जाव करण्यासाठी वारंवार मोठे खिळे लावले जात वेढा घातलेल्या गावाभोवती कॅलट्राप्स नावाने ओळखली जाणारे खिळे मोठ्या संख्येने पसरले जात त्याची चार टोक चार बाजुंना असत आणि जमिनीवर कसेही पडले तरी त्याची किमान एक टोकदार बाजुवर राहत असे.
या काळात अद्याप बंदुकीचा दारुचा (गणपावडर) शोध लागला नव्हता तेव्हा तोफा वापरणे शक्य नव्हते त्याच्याऐवजी मोठे दगड तटबंदीवर किंवा तटावरुन किल्ल्यात किंवा नगरात भिरकवणारी मोठी य़ंत्रे विकसित केली होती या प्रकारच्या आयुधामध्ये लाकडी चौकटीवर दोर आणि खांब बसवलेले असत दोराने खेचुन पीळ देऊन खांबाला अडकवलेले दगड गलोलीने सोडल्या प्रमाणे हवेत भिरकावलेले मान त्यासाठी दगड ठेवल्याच्या चमचा सारखा खांबाला दुसरीकडे मोठे वजन बांधलेले अशे अशा मोठ्या दगडाचा तटबंदीवर मारा करुन ती फोडली जात असे काही वेळा या यंत्रानी पेटते गोळे ही किल्ल्या डागले जात एकाच वेळी अनेक बाण किंवा भाले लागणारी यंत्रे ही उपलब्द होती.
या साधनानी शत्रुची मोर्चे बंदी खिळी खिळी करुन जेरीस आणल्यानंतर सैन्य तटावरून किल्ल्यात उतरवण्यासाठी लाकडी फळ्या वापरून बांधलेली उंच मनोरे वापरले जात या उंच मनोऱ्याच्या मंचाव्या सारख्या वरच्या मजल्यावर सैनिक बसवले जात मनोऱ्यांना खाली चाक असत त्या आधारे ते अन्य सैनिक तटापर्यत ढकलत आणि नंतर वरील सैनिक तटावरून  चढून किल्ल्यात उतरत.
उत्तर लिहिले · 27/12/2019
कर्म · 20950
0
झाडाचे केलेले लहान लहान तुकडे म्हणजे ओंडका आहे म्हणतात.
उत्तर लिहिले · 27/12/2019
कर्म · 9405
0

लाकडाचा ओंडका म्हणजे झाडाचे खोड किंवा फांदी तोडल्यानंतर तयार झालेला लाकडी तुकडा.

ओंडक्याची काही वैशिष्ट्ये:

  • ओंडका हा लाकडी आणि जड असतो.
  • तो सरळ किंवा वाकडा असू शकतो.
  • ओंडक्याचा उपयोग जळणासाठी, बांधकामासाठी किंवा फर्निचर बनवण्यासाठी केला जातो.

ओंडक्याबद्दल अधिक माहितीसाठी, आपण विकिपीडिया पाहू शकता.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1620

Related Questions

शेतमजूर म्हणजे कोण? स्पष्ट करा.
I love you म्हणजे काय?
आम्ल, आम्लारी, क्षार, धातू, अधातू यांची व्याख्या आणि उदाहरण लिहा?
अनुरूप म्हणजे काय?
कलाकार म्हणजे काय ते सांगा?
अस्ताई चा अर्थ काय?
वाड्मयीन म्हणजे काय?