3 उत्तरे
3
answers
जमीन मोजणीचे सूत्र काय?
7
Answer link
उदा. जमिनीची लांबी 500 फुट व रुंदी 200 फुट आहे असे समजू.
आता आपण क्षेत्रफळ काढूया त्यासाठी लांबी ×रुंदी = एकूण चौ.फुट क्षेत्रफळ हे सुत्र वापरु.म्हणजेच
500 × 200 = 100,000 चौरस फूट
आता या संख्येला एक गुंठा म्हणजेच 1089 चौ.फूट ने भाग देऊ.
100000 ÷ 1089 = 91.8273645546
40 गुंठे = 1 एकर म्हणून
2 एकर 11 गुंठे 827 चौ.फूट हे क्षेत्रफळ
जर लांबी व रुंदी व रुंदी एकसमान नसेल तर त्यासाठी एक उपाय आहे.
उदा. जमिनीच्या एका बाजूची लांबी 510 तर दुसर्या बाजूची लांबी 500 आहे व एका बाजूची रुंदी 212 व दुसर्या बाजूची रुंदी 200 आहे तर त्या एकसमान करुन घ्या खालीलप्रमाणे...
लांबी
510 + 500 = 1010
1010 ÷ 2 = 505 लांबी
रुंदी
200 + 212 = 412
412 ÷ 2 = 206 रुंदी
आता या लांबी व रुंदी यांचा गुणाकार करा व आलेल्या संख्येला 1089 ने भाग द्या तुम्हाला तुमचे उत्तर मिळेल.
जसे की,
505 × 206 = 104,030 चौ.फूट
104030 ÷ 1089 = 95.5280073462
हे आले क्षेत्रफळ गुंठे व चौ.फूट मध्ये.
1089 चौ.फूट = 1 गुंठा
43560 चौ.फूट = 40 गुंठे म्हणजेच 1 एकर
2
Answer link
जमीन कशी मोजावी ? जमीन मोजणीचे सूत्र काय ? अशी करा जमिनीची मोजणी जमीन मोजणीचे सूत्र काय जमिनीची मोजणी....आपल्याकडे स्वत:च्या मालकीची अथवा वडिलोपार्जीत जमीन असेल तर त्याची मोजणी ही आपल्याला करावीच लागते. जमिनीची मोजणी कशी केली जाते ? दिवसेंदिवस जमिनीचा होणारा विकास, शहरीकरण, औद्योगिकरण अन्य विकासाची कामे यासाठी होणारा जमिनीचा वापर, तसेच आपापसातील हद्दीचे वाद सोडविण्यासाठी त्या जमिनीची प्रथम मोजणी करुन मूळ नकाशाच्या आधारे हद्दीच्या खुणा कायम करुन भूमापकाकडून दाखले दिले जातात. .
पैसा गुंतविण्याचा उत्तम मार्ग म्हणजे जमीन विकत घेणे. म्हणतात ना, सोन्याची विक्री हातोहात होते तर जमिनीची विक्री रातोरात होते. सांगायचे तात्पर्य हेच की, दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून स्वत:च्या मालकीची जमीन असणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. माझी जमीन किती आणि कुठपर्यंत आहे ? याची प्रत्येकाला उत्सुकता असते. त्यासाठी आपण जमिनीची मोजणी करत असतो. मोजणीच्या अनुषंगाने विविध प्रकारचे अभिलेख तयार करुन त्यामध्ये मोजणीचे नकाशे तयार केले जातात त्यानंतर भूमी अभिलेख विभागाकडे त्यांचे संधारण केले जाते.
जमिनीच्या मालकी हक्काबाबतचे वादविवाद मिटविण्यासाठी भूमी अभिलेख व भूमापन अधिकारी यांच्या कार्यालयात जमीन मोजणीसाठी अर्ज करावा लागतो. जमीन मोजणीचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर आवश्यकतेनुसार मोजणी फी भरुन त्याची नोंद मोजणी नोंदवहीत घेतली जाते. संबंधितधारकांना आगावू नोटीसद्वारे कळवून मोजणीची तारीख निश्चित केली जाते. ठरलेल्या दिवशी भूमापक जागेवर येऊन प्रत्यक्ष कब्जेदाराच्या मोजणी अर्जदार, लगत कब्जेदार व पंचमंडळी यांच्या समक्ष मोजणी कामास सुरुवात केली जाते.
वहिवाटीच्या खुणांवर निशाण लावून त्याआधारे प्लेन टेबलवर ठेवलेल्या नकाशा शीटवर वहिवाटीची आकृती नगरभूमापन मोजणीत 1.500 या परिमाणात तर शेतजमिनीची मोजणी 1.1000 या परिमाणात तयार होते. त्यानंतर मूळ अभिलेखाच्या आधारे वहिवाटीच्या नकाशावर सुपर इंपोज करुन नकाशावर हद्दीच्या खुणा निश्चित केल्या जातात आणि त्या नकाशाच्या आधारावर मूळ अभिलेखाप्रमाणे अर्जदारास हद्दीच्या खुणा कायम करुन प्रत्यक्ष जागेवर नव्याने दाखवल्या जातात. अशा प्रकारे जमिनीच्या मोजणीची प्रक्रिया पूर्ण होते.
यापुढे जेव्हा आपण जमिनीच्या मालकी हक्काबाबतचे वादविवाद मिटविण्यासाठी भूमी अभिलेख व भूमापन अधिकारी यांच्या कार्यालयात जमीन मोजणीचा अर्ज कराल तेव्हा, या लेखात सांगितलेल्या पायऱ्या पूर्ण झाल्या की आपली नोंदणी पूर्ण झाली असे समजावे. गुगल मॅप' या संकेतस्थळाचा वापर करून आपल्याला शेताचे अथवा प्लॉटचे क्षेत्रफळ मोजता येणे शक्य आहे. यात जमिनीचे क्षेत्रफळ वर्ग मीटर अथवा एकरमध्ये मिळते. याद्वारे कमीत कमी २५० चौ.फूट क्षेत्रफळ अचूक मोजता येते. गुगल मॅप हे संकेतस्थळ सर्वांना परिचित आहे. यामध्ये दिसणारी गावे, रस्ते, नदी, नाले व ओळखीचा परिसर अनेकांनी बघितला असेल. संकेतस्थळाद्वारे कमी वेळेत शेताचे अथवा प्लॉटचे क्षेत्रफळ मोजता येते, त्यामुळे हे संकेतस्थळ जमीन मोजणीसाठी अतिशय फायदेशीर आहे.
https://youtu.be/tq-LY4KczMs
राज्य सरकारने जमीन मोजणी पध्दतीत बदल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पूर्वीची साधी, तातडीची आणि अतितातडीची मोजणी कायमस्वरुपी बंद करून यापुढे एकाच प्रकारची मोजणी होणार आहे. तसे आदेश महसूल खात्याने निर्गमित केले आहेत.राज्य सरकारने जमीन मोजणी पध्दतीत बदल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पूर्वीची साधी, तातडीची आणि अतितातडीची मोजणी कायमस्वरुपी बंद करून यापुढे एकाच प्रकारची मोजणी होणार आहे. तसे आदेश महसूल खात्याने निर्गमित केले आहेत. ब्रिटीश काळापासूनच भूमी अभिलेख कार्यालयाकडे जमिनीची मोजणी करण्यासाठी साधी, तातडीची आणि अतितातडीची अशा तीन पारंपरिक पध्दती होत्या. जमीन मोजणी म्हणजे मोठा मनस्तापच असल्याची शेतकऱ्यांची भावना आहे. अर्ज भरल्यानंतर प्रत्येक मोजणीसाठी स्वतंत्र शुल्क भरावे लागते.

0
Answer link
जमीन मोजणीसाठी वापरले जाणारे सूत्र खालीलप्रमाणे:
जमिनीचे क्षेत्रफळ काढण्याचे सूत्र:
त्रिकोणी भूखंडासाठी:
क्षेत्रफळ = 1/2 * पाया * उंची
आयताकार भूखंडासाठी:
क्षेत्रफळ = लांबी * रुंदी
चौरसाकार भूखंडासाठी:
क्षेत्रफळ = बाजू * बाजू
अनियमित आकाराच्या भूखंडासाठी:
भूखंडाला लहान त्रिकोण आणि आयतांमध्ये विभाजित करा आणि नंतर प्रत्येक भागाचे क्षेत्रफळ मोजा.
एकूण क्षेत्रफळ = सर्व भागांचे क्षेत्रफळ
अचूकता: