2 उत्तरे
2
answers
व्याघ्र प्रकल्प म्हणजे काय?
12
Answer link
व्याघ्र प्रकल्प म्हणजे वाघांच्या संवर्धनासाठी आखलेली योजना होय. वाघांची संख्या वाढणे हे एक प्रकारे चांगल्या वनसंवर्धनाचे द्योतक आहे. कारण वाघांची चांगली संख्या असण्यासाठी त्यांचा नैसर्गिक अधिवास उत्तम असणे आवश्यक आहे. म्हणजेच वाघांसाठी चांगले अन्न, निवारा असलेले जंगल असणे आवश्यक आहे. आणि यासाठी ठरावीक वर्षाला विविध जंगलातील प्रकल्पात सर्वेक्षण केले जाते. जंगलाचे क्षेत्रफळ, सर्वेक्षण दरम्यान असलेला वर्ष, वाघांची संख्या, वाघांचे संवर्धन अश्या अनेक गोष्टी व्याघ्रप्रकल्प मध्ये समाविष्ट असतात. वाघांची संख्या वाढावी म्हणून लोकांमध्ये जनजागृती केली जाते, व्याघ्र संवर्धनावर विशेष कार्यक्रम राबविण्यात येते.
0
Answer link
व्याघ्र प्रकल्प (इंग्रजी: Project Tiger) हा भारत सरकारचा वाघांना वाचवण्यासाठीचा एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे.
उद्देश:
- वाघांची संख्या वाढवणे.
- वाघांच्या नैसर्गिक अधिवासाचे संरक्षण करणे.
- स्थानिक लोकांना प्रकल्पात सहभागी करणे.
सुरुवात: हा प्रकल्प १ एप्रिल, इ.स. १९७३ रोजी सुरू झाला.
महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प:
- मेळघाट व्याघ्र प्रकल्प
- ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प
- पेंच व्याघ्र प्रकल्प
- सह्याद्री व्याघ्र प्रकल्प
- Bor Tiger Reserve (बोर व्याघ्र प्रकल्प)
- नवीन नागझिरा- नवेगाव व्याघ्र प्रकल्प