गणित नीती अर्थशास्त्र इतिहास

चाणक्याची ११ सूत्रे कोणती?

2 उत्तरे
2 answers

चाणक्याची ११ सूत्रे कोणती?

29
चाणक्यांची ११ सूत्रे जी आजही लागु पडतात 

https://bit.ly/2Sqgweg
        चाणक्यांनी नीती शास्त्रची निर्मितीही केली होती. त्यामध्ये त्यांनी जीवन सुखी व आनंददायी कसे करावे हे सांगितले आहे
जीवनात अशी किती तरी वळणे येतात, जिथे आपल्याला दुसऱ्याच्या सल्ल्याची गरज भासते, म्हणून आज आम्ही तुम्हाला चाणक्य यांनी सांगीतलेली काही अशी सूत्रे सांगणार आहोत, ज्यामुळे तुमच्या जीवनात चांगल्याच गोष्टी घडतील.
💠१) कोणत्याही व्यक्तीने गरजेपेक्षा जास्त प्रामाणिक राहू नये.
कारण सरळ असलेली झाडेच खूप कापली जातात, त्याचप्रमाणे जास्त प्रामाणिक व्यक्तीलाच जास्त कष्ट सोसावे लागतात.
💠२) चाणक्य मानायचे की जर आपल्याला काही आर्थिक नुकसान झाले, तर तसं चुकूनही कोणाला सांगू नये.
कारण कोणीही तुमचे आर्थिक नुकसान ऐकल्यावर तुमची मदत करणार नाही, उलट तुम्हाला मदत करावी लागेल म्हणून तिथून पळ काढतील.

💠३) आपल्याला भूतकाळात घडलेल्या घटनेविषयी पश्चाताप नसावा आणि भविष्याविषयी चिंता देखील नसावी. बुद्धिवादी मनुष्य नेहमी वर्तमानात जगतात.
💠४) पुरुषाचे ज्ञान आणि महिलांचे सौंदर्य ही जगातील सर्वात मोठी ताकद आहे.
आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट
💠 ५) प्रत्येक मैत्री मागे काही ना काही स्वार्थ असतोच. जगात अशी कोणतीच मैत्री नाही जिच्या मागे लोकांचे स्वता:चे हित नसेल, हे एक कटू सत्य आहे.
💠६) मुलांवर त्यांच्या वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत प्रेम करावे, नंतर दहा वर्षापर्यंत शिक्षा करावी, आणि जेव्हा ते सोळा वर्षांचे होतील तेव्हा त्यांचे चांगले मित्र बनावे.
💠७) गरिबी, आजारपण वगैरे गोष्टी माणसाच्या खऱ्या शत्रू नसतात.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,कारण भीती हीच कोणत्याही मनुष्याची सगळ्यात मोठी शत्रू आहे.
💠८) पैसा खूप कष्टाने मिळवला पाहिजे. आपल्या प्रमाणिकपणाचा त्याग करून अथवा शत्रूच्या पाया पडून पैसा मिळत असेल, तर असे धन कधीही स्वीकारु नये.
कारण पुढे ते खूप मोठे नुकसान घडवून आणते.
💠९) ज्ञान आपला सर्वात चांगला मित्र आहे. एका शिकलेल्या व्यक्तीला सगळीकडेच सन्मान मिळतो. शिक्षण हे नेहमीच सौंदर्य आणि तरुणाईचा पराभव करते.
💠१०) फुलांचा सुगंध फक्त वाऱ्याच्या दिशेने जातो, पण एका चांगल्या माणसाचा चांगुलपणा सर्वत्र पसरतो.
💠११) असंभव शब्दाचा प्रयोग तर भित्रे करतात, बुद्धिमान आणि धीट माणसे स्वत:चा रस्ता स्वतः तयार करतात.
अशी ही चाणाक्यांची ११ सूत्रे म्हणजे जीवन परिवर्तनाचा रामबाण उपाय म्हणावी लागतील!


0

चाणक्याची ११ सूत्रे

चाणक्य हे एक प्राचीन भारतीय शिक्षक, तत्त्वज्ञ आणि शाही सल्लागार होते. त्यांना कौटिल्य किंवा विष्णुगुप्त म्हणूनही ओळखले जाते. त्यांनी अर्थशास्त्र नावाचे एक प्रसिद्ध पुस्तक लिहिले, ज्यामध्ये राजनीती, अर्थशास्त्र आणि सामाजिक धोरणांवर विचार मांडले आहेत. चाणक्याने दिलेली काही महत्त्वाची सूत्रे खालीलप्रमाणे:

  1. धैर्य: अडचणींच्या वेळी धैर्याने आणि संयमाने वागावे.
  2. ज्ञान: सतत ज्ञान प्राप्त करत राहावे आणि आपल्या ज्ञानात भर घालत राहावी.
  3. एकाग्रता: आपले ध्येय साध्य करण्यासाठी एकाग्रतेने प्रयत्न करावे.
  4. निर्णय क्षमता: योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता असावी.
  5. नेतृत्व: लोकांचे नेतृत्व करण्याची क्षमता असावी.
  6. संवाद: प्रभावी संवाद साधण्याची कला अवगत असावी.
  7. योजना: कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी योजना तयार करावी.
  8. वेळेचे व्यवस्थापन: वेळेचा सदुपयोग करावा.
  9. आत्मविश्वास: स्वतःवर विश्वास ठेवावा.
  10. धैर्य आणि संयम: अडचणींच्या वेळी धैर्य आणि संयम बाळगावा.
  11. परिस्थितीचा अभ्यास: कोणतीही कृती करण्यापूर्वी परिस्थितीचा अभ्यास करावा.

चाणक्याची ही सूत्रे आजही उपयुक्त आहेत आणि व्यक्तीला यशस्वी जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन करतात.

टीप: चाणक्याच्या सूत्रांविषयी अधिक माहितीसाठी, आपण विविध पुस्तके आणि वेबसाइट्सचा संदर्भ घेऊ शकता.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1000

Related Questions

दुधाने तोंड पोळल्याने ताक फुंकून पिणे याचा अर्थ कोणता होतो?
मनीचा वाक्य: अति शहाना त्याचा बैल रिकामा या म्हणीचा अर्थ काय?
परिश्रमाशिवाय फळ मिळत नाही या सुविचाराचा अर्थ उदाहरणासह स्पष्ट करा?