
नीती
अर्थ: एकदा एखाद्या गोष्टीचा अनुभव वाईट आला की माणूस तोच अनुभव पुन्हा येऊ नये म्हणून अधिक सावधगिरी बाळगतो.
विश्लेषण:
- दूध आणि ताक: दूध हे गरम असते आणि ते तोंडाला चटका देऊ शकते, तर ताक हे थंड असते.
- अनुभव: ज्या व्यक्तीचे तोंड दुधाने पोळले आहे, ती ताक पिताना सुद्धा फुंकून पिते, कारण तिला पूर्वीच्या वाईट अनुभवामुळे भीती वाटते.
- शिकवण: या म्हणीतून हे शिकायला मिळते की भूतकाळातील वाईट अनुभवांमुळे आपण भविष्यकाळात अधिक दक्षता घ्यावी.
उदाहरण: एका व्यवसायात नुकसान झालेला माणूस दुसरा व्यवसाय सुरु करताना खूप विचारपूर्वक पाऊल टाकतो, कारण त्याचे 'दुधाने तोंड पोळल्याने तो ताक फुंकून पितो'.
अर्थ: अति शहाणपणा करायला गेला की माणूस अनेकदा आपले असलेले काम बिघडवून बसतो. जो माणूस जास्त हुशारी दाखवतो, तो स्वतःचे नुकसान करतो.
उदाहरण: रमेश नेहमी सगळ्या कामांमध्ये जास्त शहाणपणा करायला जातो आणि त्यामुळे त्याचे काम नेहमी अपूर्ण राहते. म्हणतात ना, अति शहाना त्याचा बैल रिकामा!
"परिश्रमाशिवाय फळ मिळत नाही" ह्या सुविचाराचा अर्थ असा आहे की जीवनात यश मिळवण्यासाठी किंवा ध्येय गाठण्यासाठी कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे. कोणतीही गोष्ट सहजपणे मिळत नाही, त्यासाठी प्रयत्न, dedication आणि चिकाटी लागते.
उदाहरण:
- अभ्यास: जर एका विद्यार्थ्याला परीक्षेत चांगले गुण मिळवायचे असतील, तर त्याला नियमितपणे अभ्यास करावा लागेल. Classes attend करावे लागतील, notes काढाव्या लागतील आणि teachers ने शिकवलेल्या गोष्टींचे मनन करावे लागेल. अभ्यास न करता चांगले गुण मिळवणे शक्य नाही.
- खेळ: एका खेळाडूला जर आपल्या खेळात प्रावीण्य मिळवायचे असेल, तर त्याला रोज training करणे, आपल्या कौशल्यांमध्ये सुधारणा करणे आणि coach च्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. सराव केल्याशिवाय यश मिळवणे शक्य नाही.
- नोकरी/व्यवसाय: जर एखाद्या व्यक्तीला आपल्या नोकरीत Promotion मिळवायचे असेल किंवा व्यवसायात यशस्वी व्हायचे असेल, तर त्याला कठोर परिश्रम करावे लागतील, dedication दाखवावे लागेल आणि आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल.
म्हणूनच, जीवनात काहीतरी मिळवण्यासाठी किंवा यशस्वी होण्यासाठी, आपल्याला कठोर परिश्रम करण्याची तयारी ठेवावी लागते. Hard work केल्याशिवाय फळ मिळत नाही.
https://bit.ly/2Sqgweg
चाणक्यांनी नीती शास्त्रची निर्मितीही केली होती. त्यामध्ये त्यांनी जीवन सुखी व आनंददायी कसे करावे हे सांगितले आहे
जीवनात अशी किती तरी वळणे येतात, जिथे आपल्याला दुसऱ्याच्या सल्ल्याची गरज भासते, म्हणून आज आम्ही तुम्हाला चाणक्य यांनी सांगीतलेली काही अशी सूत्रे सांगणार आहोत, ज्यामुळे तुमच्या जीवनात चांगल्याच गोष्टी घडतील.
💠१) कोणत्याही व्यक्तीने गरजेपेक्षा जास्त प्रामाणिक राहू नये.
कारण सरळ असलेली झाडेच खूप कापली जातात, त्याचप्रमाणे जास्त प्रामाणिक व्यक्तीलाच जास्त कष्ट सोसावे लागतात.
💠२) चाणक्य मानायचे की जर आपल्याला काही आर्थिक नुकसान झाले, तर तसं चुकूनही कोणाला सांगू नये.
कारण कोणीही तुमचे आर्थिक नुकसान ऐकल्यावर तुमची मदत करणार नाही, उलट तुम्हाला मदत करावी लागेल म्हणून तिथून पळ काढतील.
💠३) आपल्याला भूतकाळात घडलेल्या घटनेविषयी पश्चाताप नसावा आणि भविष्याविषयी चिंता देखील नसावी. बुद्धिवादी मनुष्य नेहमी वर्तमानात जगतात.
💠४) पुरुषाचे ज्ञान आणि महिलांचे सौंदर्य ही जगातील सर्वात मोठी ताकद आहे.
आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट
💠 ५) प्रत्येक मैत्री मागे काही ना काही स्वार्थ असतोच. जगात अशी कोणतीच मैत्री नाही जिच्या मागे लोकांचे स्वता:चे हित नसेल, हे एक कटू सत्य आहे.
💠६) मुलांवर त्यांच्या वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत प्रेम करावे, नंतर दहा वर्षापर्यंत शिक्षा करावी, आणि जेव्हा ते सोळा वर्षांचे होतील तेव्हा त्यांचे चांगले मित्र बनावे.
💠७) गरिबी, आजारपण वगैरे गोष्टी माणसाच्या खऱ्या शत्रू नसतात.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,कारण भीती हीच कोणत्याही मनुष्याची सगळ्यात मोठी शत्रू आहे.
💠८) पैसा खूप कष्टाने मिळवला पाहिजे. आपल्या प्रमाणिकपणाचा त्याग करून अथवा शत्रूच्या पाया पडून पैसा मिळत असेल, तर असे धन कधीही स्वीकारु नये.
कारण पुढे ते खूप मोठे नुकसान घडवून आणते.
💠९) ज्ञान आपला सर्वात चांगला मित्र आहे. एका शिकलेल्या व्यक्तीला सगळीकडेच सन्मान मिळतो. शिक्षण हे नेहमीच सौंदर्य आणि तरुणाईचा पराभव करते.
💠१०) फुलांचा सुगंध फक्त वाऱ्याच्या दिशेने जातो, पण एका चांगल्या माणसाचा चांगुलपणा सर्वत्र पसरतो.
💠११) असंभव शब्दाचा प्रयोग तर भित्रे करतात, बुद्धिमान आणि धीट माणसे स्वत:चा रस्ता स्वतः तयार करतात.
अशी ही चाणाक्यांची ११ सूत्रे म्हणजे जीवन परिवर्तनाचा रामबाण उपाय म्हणावी लागतील!
