2 उत्तरे
2 answers

सदनिका खरेदी करताना काय खबरदारी घ्याल?

4
*सदनिका खरेदी करताना पाहावयाची कागदपत्रे*🕘

एखाद्या व्यक्तीला सदनिका खरेदी करावयाची झाल्यास महाराष्ट्र अपार्टमेंट कायदा १९७० नुसार खालील कागदपत्रे पाहणे आवश्यक आहे.

१) ज्या व्यक्तीची सदनिका आपण खरेदी करणार आहोत, त्याच्या नावाचा भाग-दाखला (शेअर सर्टिफिकेट).

२) त्या इमारतीचा पूर्णत्वाचा दाखला (कंप्लिशन सर्टिफिकेट) तसेच भोगवटा प्रमाणपत्र (ऑक्युपेशन सर्टिफिकेट).

३) संपूर्ण इमारतीचा मंजूर नकाशा.

४) जमिनीची मूळ कागदपत्रे, ७/१२ उतारा, प्रॉपर्टी कार्ड, इ.

५) घोषणापत्राची प्रत (डीड ऑफ डिक्लरेशन)

६) अपार्टमेंटचा करारनामा (डीड ऑफ अपार्टमेंट) १००/- रु.च्या मुद्रांकावर नोंदणीकृत केलेला.

*घर खरेदी करताना घ्यायची काळजी*🕑

नवीन सदनिका ठेकेदार किंवा विकासकाकडून (बिल्डर-डेव्हलपर) खरेदी करतेवेळी महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट अॅक्ट (मोफा) हा कायदा लागू होतो.

- नवीन सदनिका ठेकेदार किंवा विकासकाकडून (बिल्डर-डेव्हलपर) खरेदी करतेवेळी महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट अॅक्ट (मोफा) हा कायदा लागू होतो.

त्यातील तरतुदींमध्ये बिल्डर आणि ग्राहक यांच्यामधील करार कसा असावा याची माहिती दिलेली आहे. त्यानुसार करारपत्र असावे. सदनिका खरेदी करताना त्याची रक्कम चटई क्षेत्रफळाच्या (कार्पेट एरियावर) आधारावर ठरविण्यात यावी, अशी तरतूद सुधारित कायद्यात आहे. त्यानुसारच सदनिकेचे मूल्य निश्चित केले असल्याची खात्री करून घेण्यात यावी. खरेदीदार या तरतुदींकडे दुर्लक्ष करतात. त्याचा फायदा बिल्डर लॉबी घेत आली आहे.

* नवीन सदनिका खरेदी करतेवेळी घ्यायची काळजी -

१. ज्या जमिनीवर इमारत आहे, ती जमीन (प्लॉट) शासनाची, वन खात्याची अथवा आदिवासींच्या मालकीची नसावी. ती बेकायदेशीरपणे अधिग्रहण केलेली नसावी. तर ती बोजाविरहित (फ्री होल्ड) किंवा भाडेतत्त्वावर (लीज होल्ड) यापैकी कशी आहे, याची खात्री करून घ्यावी. इमारत बांधलेली जमीन बिनशेती (एन.ए.) परवाना प्राप्त असावी.

२. ज्या जमिनीवर इमारत बांधलेली आहे अशा बांधकामाला आणि बांधकाम नकाशांना महानगरपालिका, नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच संबंधित प्राधिकरणांची रीतसर मंजुरी- परवानगी घेण्यात आली असल्याची खात्री करून घ्यावी. बांधकाम पूर्णत्वाचा दाखला (ऑक्युपेशन सर्टिफिकेट) व इमारतीचा ताबा घेण्यासाठी- राहण्यासाठी परिपूर्ण असल्याबाबतचा ना हरकत दाखला (एन.ओ.सी.) तपासून घ्यावा. त्याचप्रमाणे सदर जमिनीसंदर्भातील ७-१२ व इंडेक्स टूच्या उताऱ्यावरील नोंदीसुद्धा तपासून घ्याव्यात.

३. ठेकेदाराने किंवा बिल्डरने जाहिरातींमधून प्रसिद्ध केलेल्या व सदनिका खरेदीदारांना देऊ केलेल्या सदनिकेमधील व परिसरातील सुविधांसह सर्व सुखसोयींचा अंतर्भाव करारपत्रानुसार असल्याची खात्री करून घ्यावी.

४. सदनिकाधारकांची सहकारी गृहनिर्माण संस्था रीतसर स्थापन करून तिच्या संपूर्ण दप्तराचा ताबा त्या संस्थेच्या सभासदांकडे हस्तांतरित करतेवेळी जमिनीचे मालकी हक्कसुद्धा हस्तांतरित करण्याची (कन्व्हेयन्स) तरतूद करारनाम्यात केली असल्याची खात्री करून घ्यावी.

५. करारनाम्यातील तरतुदींनुसार व देऊ केलेल्या सोयीसुविधांनुसार बिल्डरने सर्व पूर्तता केली असेल तरच सदनिकेचा ताबा घ्या; अन्यथा अपूर्तता व अन्य तक्रारींच्या संदर्भात बिल्डरबरोबर (लेखी) पत्रव्यवहार करावा व त्याची पोहोच घ्यावी. जेणेकरून भविष्यात त्याचा पुरावा म्हणून उपयोग होऊ शकेल.

६. बिल्डर तथा ठेकेदाराने मालमत्ता कर, वीजबिले, पाणीपट्टी व इतर कर संबंधित प्राधिकरणाकडे वेळोवेळी भरली असल्याची म्हणजेच थकबाकी नसल्याची खात्री करून घ्यावी, अन्यथा मोठय़ा प्रमाणात थकबाकी निघाली तर त्याचा बोजा सदनिकाधारकांवर म्हणजेच ग्राहकांवर पडतो याची गांभीर्याने नोंद घ्यावी. त्याच वेळी सांडपाणी, वीज व पिण्यायोग्य पाण्याच्या जोडण्या इमारतीला रीतसर देण्यात आल्याची खात्री करून घ्यावी.

७. सदनिकेमध्ये अंतर्गत दिलेल्या सोयी-सुविधांचा दर्जा करारपत्रातील नोंदींनुसार असल्याची व तसेच ते कार्यान्वित असल्याची खात्री करून घेण्यात यावी.

८. सदनिकेच्या इमारतीसंदर्भात आर्किटेक्ट, इंजिनीयर आणि अॅडव्होकेटस् यांनी जमीन व त्यावरील बांधकामासंदर्भात तयार केलेले अहवाल काळजीपूर्वक वाचून ग्राहक हक्काला बाधा नसल्याची खात्री करून घ्यावी.

९. इमारतीमधील सदनिकांसंदर्भात भिंतींमधून- गच्चीवरून विहित कालावधीत गळती होणार नसल्याचे हमीपत्र आणि गळती झाल्यास त्याबाबतच्या स्वखर्चाने करावयाच्या दुरुस्तीबाबत हमीपत्रात तरतूद करण्यात आली असल्याची खात्री करून घ्यावी.

१०. बिल्डर तथा विकासकाकडून सदनिका खरेदी करतेवेळी पुरावा म्हणून धनादेशाने (चेकने) रकमा अदा कराव्यात. दिलेल्या रकमांच्या संदर्भातील पावत्या वेळीच तपासून घ्याव्यात व आपण निवड केलेल्या सदनिकेचा क्रमांक त्या पावतीवर तसेच करारनाम्यात नोंदलेला असल्याची खात्री करून घ्यावी.

*कोणत्या गोष्टी टाळाव्यात*🕕

* सदनिका खरेदीच्या बाबतीत घाई किंवा उतावीळपणा टाळावा. तसेच परिसरातील सोयी-सुविधांची fc खात्री करून घ्यावी.

* रोखीने व्यवहार (कॅश पेमेंट) टाळावेत. त्याचप्रमाणे नोंदणीकृत करार करण्याबाबत विलंब टाळावा.

* दिलेल्या रकमांच्या संदर्भात रेव्हेन्यू स्टॅम्प लावलेल्या व अधिकृत व्यक्तीच्या सह्या असलेल्या पावत्या वेळोवेळी घेण्यास विसरू नये.

* बिल्डर-विकासक आपल्याला फसवतीलच असा पूर्वग्रहदूषित विचार करून वागू नये, मात्र सावधगिरी बाळगावी.

* करारपत्रातील ग्राहकाचे तथा सदनिका खरेदीदाराचे हक्क अबाधित असल्याबाबत खात्री करण्याच्या बाबतीत दुर्लक्ष करू नये, जेणेकरून स्वत:चे नुकसान होणार नाही. तसेच मॉडेल अॅग्रीमेंटच्या विरोधात असेल असे करारपत्र करण्याचे टाळावे.
उत्तर लिहिले · 2/9/2019
कर्म · 569245
0
सदनिका (फ्लॅट) खरेदी करताना घ्यावयाची काळजी:

सदनिका खरेदी करताना अनेक गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे, जेणेकरून तुमची गुंतवणूक सुरक्षित राहील आणि तुम्हाला भविष्यात कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही. काही महत्त्वाच्या गोष्टी खालीलप्रमाणे:

  1. मालमत्तेची तपासणी:
    • सदनिकेचे शीर्षक (Title) स्पष्ट आणि कायदेशीरदृष्ट्या वैध आहे का ते तपासा.
    • सदनिकेवर कोणतेही कर्ज किंवा भार नाही याची खात्री करा.
    • सदनिकेचा नकाशा (Plan) आणि बांधकाम परवाना तपासा.
  2. विकसकाची (Builder) पार्श्वभूमी:
    • विकसकाची प्रतिष्ठा आणि मागील प्रकल्प तपासा.
    • बांधकाम वेळेवर पूर्ण करण्याची विकसकाची क्षमता तपासा.
    • विकसकावर कोणताही कायदेशीर खटला प्रलंबित नाही ना, याची खात्री करा.
  3. करार (Agreement):
    • खरेदी करार काळजीपूर्वक वाचा आणि सर्व नियम व शर्ती समजून घ्या.
    • करारामध्ये सदनिकेची किंमत, बांधकाम गुणवत्ता, ताबा (Possession) तारीख आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी स्पष्टपणे नमूद केल्या आहेत का ते तपासा.
  4. कर्ज (Loan):
    • तुम्ही गृहकर्ज घेणार असाल, तर विविध बँका आणि वित्तीय संस्थांकडून व्याजदर आणि इतर शुल्क तपासा.
    • तुमच्या आर्थिक क्षमतेनुसार कर्जाची निवड करा.
  5. स्थळ (Location):
    • सदनिकेचे स्थळ तुमच्या सोयीनुसार आहे का ते तपासा. शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, बाजारपेठ आणि इतर आवश्यक सुविधा जवळ आहेत का ते पहा.
    • परिवहन सुविधा (Transportation) जसे की बस, रेल्वे स्टेशन जवळ आहेत का ते तपासा.
  6. अतिरिक्त खर्च:
    • सदनिकेच्या किमतीव्यतिरिक्त मुद्रांक शुल्क (Stamp Duty), नोंदणी शुल्क (Registration Fees), आणि इतर खर्चांची माहिती घ्या.
    • मेंटेनन्स शुल्क आणि इतर नियमित खर्चांची माहिती घ्या.
  7. कायदेशीर सल्ला:
    • सदनिका खरेदी करण्यापूर्वी वकिलाचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. ते तुम्हाला कायदेशीर बाबींमध्ये मदत करू शकतात.
  8. रेरा (RERA):
    • REARA कायद्यानुसार, विकासकाने (builder) सर्व माहिती देणे बंधनकारक आहे. त्यामुळे रेरामध्ये नोंदणीकृत असलेल्या प्रकल्पातच गुंतवणूक करा. RERA website: maharera.mahaonline.gov.in

या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही सुरक्षितपणे सदनिका खरेदी करू शकता.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1040

Related Questions

रेरा कायद्याबद्दल माहिती द्या?
अ‍ॅमिनिटी स्पेस विकता येते का? विक्री झाल्यास त्यावर घर बांधता येते का?
ग्रीन प्रॉपर्टी, येलो प्रॉपर्टी यात काय फरक आहे?
एक एमक्‍यूबी म्हणजे किती?
विमान नगर व कल्याणी नगरमधील फ्लॅटचे भाडे का वाढले आहेत?
नवीन रो-हाऊस किंवा रो-बंगला विकत घेताना कोणती कागदपत्रे तपासावी?
अपार्टमेंट व हाउसिंग सोसायटीत नेमका भेद/फरक काय आहे?