घर सरकारी योजना घरगुती उपाय ग्रामपंचायत गाव गॅस सिलेंडर

ग्रामपंचायतीमधून शेगडी सिलेंडर मिळतो का? सविस्तर माहिती सांगा आणि पैसे वगैरे घेतात का?

2 उत्तरे
2 answers

ग्रामपंचायतीमधून शेगडी सिलेंडर मिळतो का? सविस्तर माहिती सांगा आणि पैसे वगैरे घेतात का?

2
असे कोणतीही वस्तू ग्रामपंचायत मार्फत मिळत नाही
पण पूर्वी ग्रामपंचायत 15% मागासवर्गीय निधी खर्चातून गावातील मागासवर्गीय लोकांना वस्तू वाटप करायचे परंतु आता नियोजन विभागाकडील सुधारित शासन निर्णय क्रमाांकः डीसीटी 2316/प्र.क्र.133/का.1417 दिनांक : 05 डिसेंबर, 2016 नुसार मागासवर्गीय लोकांना वस्तू ग्रामपंचायत ने खरेदी न करता आता लाभार्थ्यांना जी आवश्यक  वाटेल ती वस्तू ग्रामस्थ खरेदी करून त्याची पावती संबंधित ग्रामपंचायतीस दिल्यांनतर त्या वस्तूचे ग्रामपंचायत तरतुदीनुसार लाभार्थ्यांना त्याचे पैसे मिळतात

दुसरा भाग म्हणजे ग्रामपंचायत मार्फत 14 वा वित्त आयोग - यामध्ये 1) 25% खर्च हा आरोग्य ,शिक्षण,उपजीविका 2)10% महिला व बालकल्याण 3)मागासवर्गीय खर्च - हा गावातील मागासवर्गीय लोकसंख्येच्या प्रमाणात 4)उर्वरित निधी हा विकासकामे यावर खर्च करावा लागतो असे याचे वर्गीकरण असते तर तुमच्या म्हणण्यानुसार जर लोकांना गॅस शेगडी दिली असेल तर ती मागासवर्गीय खर्च यामधून मागास वाडीला दिली असेल नाहीतर 10% खर्चातून अंगणवाडीस दिली असेल आणि पैसे वाटप केले असतील तर ग्रामपंचायत 15 % मधून या शासन निर्णयानुसार दिला असेल
तरी तुम्ही तुमच्या गावातील ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांना सविस्तर माहिती विचारा त्यांनी न सांगितल्यास तालुका स्तरीय कार्यालयातील गटविकास अधिकारी पंचायत समिती यांना भेटून ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक माहिती सांगत नसलेबाबत सांगा
उत्तर लिहिले · 17/11/2019
कर्म · 0
0

Grampanchayat मधून Shegdi Cylinder मिळतो का?

Grampanchayat मधून Shegdi Cylinder मिळतो की नाही हे सांगणे कठीण आहे, कारण Grampanchayat च्या योजना वेळोवेळी बदलत असतात. त्यामुळे, तुमच्या Grampanchayat मध्ये Shegdi Cylinder मिळतो की नाही, हे तुम्हाला Grampanchayat कार्यालयात जाऊन विचारणे योग्य राहील.

Grampanchayat मध्ये Shegdi Cylinder साठी पैसे लागतात का?

जर Grampanchayat मध्ये Shegdi Cylinder उपलब्ध असेल, तर त्यासाठी पैसे लागतात की नाही, हे Grampanchayat कार्यालयात विचारल्यानंतरच तुम्हाला समजेल. कारण काही योजनांमध्ये सरकार अनुदान देते, त्यामुळे Cylinder स्वस्त मिळतो.

अधिक माहितीसाठी:

  • तुमच्या Grampanchayat कार्यालयात संपर्क साधा.
  • Grampanchayat च्या वेबसाईटला भेट द्या.
उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 980

Related Questions

गॅस सिलेंडर पत्ता बदलण्यासाठी अर्ज कसा दाखल करावा व कसा लिहावा?
गॅस सिलेंडर पुस्तक हरवल्यास सिलेंडर कसा मिळवायचा?
गॅस सिलेंडर हरवला/गहाळ/चोरी झाल्यास परत नवा सिलेंडर कसा मिळवावा?
गॅस ट्रान्सफर करायचा आहे पण 4 वर्षांपूर्वीचे जुने गॅस सेंटरची बुकसह कागदपत्रे हरवले आहेत. तर मला गॅस ट्रान्स्फर करताना पुराव्याची काही अडचण तर येणार नाही ना?
गॅस किती पर्यंत भरून भेटतो?
गॅस सिलेंडर वर टॅग लावणे म्हणजे काय?
गॅस सिलेंडर हा नवी मुंबईत वेगळा आणि मुंबईत वेगळा असतो का? नवी मुंबईत, मुंबईतील सिलेंडर चालत नाही हे खरे आहे का?